Get it on Google Play
Download on the App Store

"तुम्ही रामदास आहात, मी शिवाजी बनतो."

१८७३-७४
"तुम्ही रामदास आहात, मी शिवाजी बनतो."
श्री नाशिकहून निघाले ते सरळ इंदूरला गेले. तेथून काशीला आले. काशीहून पुढे थेट अयोध्येस गेले व नंरत नैमिषारण्यात गेले, तेथे जवळ जवळ दहा एक महिने राहिले व मग गोंदवल्यास परत आले. गोंदवल्यास श्रींना भेटण्यासाठी श्री वासुदेव बळवंत फडके गोंदवल्यास आले. इंग्रजांविरुद्ध क्रांतीचा उठाव करणार्‍यांमध्ये श्री. फडके अग्रगण्य होते. श्रीदत्त हे त्यांचे आराध्य दैवत होते. त्यांची पूजा केल्यावाचून ते अन्नग्रहण करीत नसत. दत्ताच्या नामाचा रोज पाच हजार जप करीत व नंतर ध्यान लावून बसत. श्री माणिकप्रभू, श्री काळबुवा या संतपुरुषांची त्यांनी दर्शने घेतली होती. परंतु त्यापैकी कोणीही इंग्रजसरकारविरुद्ध उठाव करण्याच्या त्यांच्या विचाराला दुजोरा दिला नाही. श्रीअक्कलकोट स्वामींकडे जाऊन त्यांनी नमस्कार केला. आपली तलवार त्यांच्यापुढे ठेवली व ते दूर जाऊन बसले. स्वामींनी आपल्या हातात तलवार द्यावी अशी त्यांची इच्छा होती. परंतु स्वामींनी सेवेकर्‍याला बोलावून ती तलवार जवळच्या एका झाडावर ठेवण्यास सांगितली. स्वामी काही बोलेनात तेव्हा फडके नाराज होऊन तलवार घेऊन तेथून निघून गेले. पुढे त्यांना काही चैन पडेना म्हणून गोंदवल्यास आले संध्याकाळच्या वेळी श्री शेतामध्ये उभे होते, वरवरचे बोलणे होऊन श्री त्यांना घरी घेऊन आले. मंडळींची निजानिज झाल्यावर श्रींनी रात्रभर श्री. फडके यांना बंडाच्या मार्गापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु काही केल्या त्यांची समजूत पटेना. दोघेही समवयस्क असल्याने श्रींनी त्यांना प्रेमाने वागविले व जीव तोडून उपदेश केला. निघताना श्री. फडके म्हणाले, "मी तयारी केली आहे, तुम्ही रामदास आहात, मी शिवाजी बनतो. मला तुम्ही मदत करा " त्यावर श्री म्हणाले, "छे छे ! मी रामदास आणि तुम्ही शिवाजीही होऊ शकणार नाही, सध्याचा काळ आपल्याला अनुकूल नाही, आपली शक्ति फुकट दवडू नका, तुम्ही दत्ताची उपासना करीत रहा, म्हणजे तुमच्या कार्याला जास्त जोर येईल. अनुकूल काल यायला जरा अवकाश आहे " श्रींचे हे बोलणे ऐकून वासूदेव बळवंत फडके फार चिडले आणि "आहा रे साधू !" म्हणून श्रींच्या पुढे हात ओवाळले आणि तडक पुण्यास चालते झाले. थोडयाच दिवसांत त्यांनी बंडाचे निशाण उभारले. जिकडे-तिकडे नाव गाजवून टाकले. सन १८७९ च्या जुलै महिन्यात सरकारने त्यांना विश्र्वासघाताने पकडून त्यांच्यावर खटला भरला. श्रींना हे कळलयावर श्री म्हणाले, "अरेरे ! आपल्या पैकी चांगल्या माणसाचा घात झाला. भगवंताने यापुढे त्यांचे फार हाल करू नयेत. चार वर्षांनी एडनच्या तुरुंगात त्यांचे निधन झाले.

श्रीब्रह्मचैतन्य महाराज चरित्र

संकलित
Chapters
श्रीशुक परिक्षितीला ब्रह्मदेवाची कथा सांगतात "शुद्ध बीजापोटी । फळे रसाळ गोमटी" तुला आईचा सहवास नेहमी पाहिजे काय ? श्रींचे चरित्र दैवी संपत्तीच्या गुणांनी भारलेले तैशी दशेची वाट न पाहता । वयसेचिया गांवा न येता । माझ्या राज्यात भिकारी असा कुणी राहू देणार नाही. नदीकाठी अगदी एकांत असतो, तेथे मन नामात लवकर रंगून जाते. अजून तरी त्याचे नाम घ्या. तो दयाळू आहे, तुमचे कल्याण करील. मी अगदी चांगली वागेन, पण तू नामाची लाखोली मात्र खरीच वाहिली पाहिजेस. सदगुरुवाचून जिवाची तळमळ शांत होत नाही. "याचे लग्न करून द्यावे म्हणजे हा घरी रमू लागेल." "तुझे काम माझ्याकडे नाही." "तू स्वतःचा खून कर, तू स्वतःला मारून टाक " "पूर्वी वसिष्ठांनी रामचंद्राला जे दिले, ते मी तुला या क्षणी देतो." "तुमच्या अंतकाळी मी हजर राहीन, हे माझे वचन घ्या." "रामनामाने भवरोग नाहीसा होतो, तर देहाचा रोग बरा होणार नाही का !" "तुम्ही सर्व मंडळींनी भगवंताला कधीही विसरू नये व आनंदात रहावे म्हणजे मला सर्व पोचले." "महाराज, आपण माझे बाप आहात, मला क्षमा करा. मी आपल्याला शरण आहे." त्याच्या तीन खुणा आहेत. तो दिसायला मोठा सुंदर आहे "तू नामस्मरण करीत रहा. रामेश्र्वराच्या दर्शनाला आम्ही तुला घेऊन जाऊ." "पंतांचा नातू मोठा साधू होऊन गोंदवल्यास परत आला आहे." "आई, या कामाचा आता मला कंटाळा आला आहे. शिवाय सदगुरूंना भेटूनही फार दिवस झाले." "गीतेचा नववा अध्याय वाचीत जा " "चल, तू आता तुकामाईंच्या दर्शनाला खरी लायक आहेस." वनवासात असताना पंचवटीत श्रीरामचंद्रांच्या संगतीत सीतेने आनंदात दिवस घालवले "तुम्ही रामदास आहात, मी शिवाजी बनतो." "आई, नवीन सून तुझ्याकडे डोळा वर करून कधी पहाणार नाही." इतक्या लोकांना कामावर लावून पोसणारा हा कोण राजा आहे ?" "माय, मला फार भूक लागली आहे, माझे पोट भरेल एवढे दूध दे." "मला सांभाळणारा राम समर्थ आहे, पण मी न मरता हे सर्प मेले तर तुमच्या मंत्राची व तुमची हानी होईल." "ज्या रामरायाने तुमच्या मुलाचे प्राण वाचविले, त्याचे नाम कधी विसरू नका. राम मुलाचे कल्याण करील." "मोठमोठया तपस्व्यांना कधी साधणार नाही, असा अंतकाळ त्याने साधला. सरकार जेव्हा राज्य करते तेव्हा सरकारांचा सरकार जो भगवंत त्याला विसरते ज्या ज्या माणसांचा श्रींशी संबंध आला त्या प्रत्येकाला त्यांनी रामनामाचा छंद लावला. विकल्प न बाळगता त्याला दत्तक जा. त्याची जहागीर तुला मिळेल. भारतभूमी ही अध्यात्मभूमी आहे. "भोग भोगून संपविला आहे, आता मऊ भात करून घाला." जगतामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट श्रीरामरायाच्या इच्छेनेच घडत असते. "आपण ज्याचे मंदिर बांधीत आहोत तो आपणहून येईल." एवढया मोठया समारंभात आणि जनसमुदायात सर्व लोकांच्या चित्ताचे केंद्र मुक्या जनावरांचेसुद्धा श्रींवर अकृत्रिम प्रेम होते. "महाराज ! आपण समर्थ आहात, या व्यसनापासून मला आता सोडवा." रामाचे देणेच तेवढे हिताचे असते. प्रापंचिक माणसाने घरातले सर्व देऊन टाकू नये. गादीखाली खूप पैसे ठेवले आहेत, वाटेल तेवढे तू दे." राम व शिव असा भेद मानू नये. स्नान करून झाल्यावर शिवमंत्र जपावा "महाराज ! राम, सीता, लक्ष्मण यांच्या डोळ्यांतून सारख्या अश्रुधारा वाहत आहेत." सामान्य माणसाने भगवंताला शरण जाऊन त्याच्या नामाचा आधार घट्ट धरावा अक्रोध, निर्लोभ चित्तात वृत्ती लीन करून उपासनेरूप जग पाहावे. "हरवलेल्या मुलाला आई भेटल्यावर जसे होते, तसे मला झाले." "ज्ञान श्रेष्ठ खरेच, पण ते भक्तीशिवाय जगू शकत नाही. भगवंतापासून जो विभक्त नसतो तो भक्त." जो नामात इतका रंगला, की त्याला स्वत:चा विसर पडला "घरदार, पैसा अडका, भांडीकुंडी आणि आपला देह देखील भगवंताला अर्पन करावा. यामुळे अपमृत्यू टळू शकतो." आपला देह आणि आपला प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो शंका फार चिवट असतात. नाम सतत घेत गेल्याने मन स्वच्छ होत जाते व सर्व शंका आपोआप विरुन जातात. मंदिरामध्ये उभा असणारा श्रीराम केवळ मूर्ती नसून प्रत्यक्ष परमात्मा आहे अशा भानेने श्री वागत. नाम सांगता जनासी। विष देऊ येती त्यासी । दास म्हणे काळगती । पहा युगाची प्रचिती ॥ ‘गुरुची आज्ञा पाळणे हाच खरा परमार्थ होय’ विश्वविद्यालय हे लौकिक विद्येचे केन्द्र असते "खर्‍या भजनाला ताल, सूर लागत नाही. त्याला प्रेम व भाव लागतो. प्रत्यक्ष परमात्मा समोर आहे ह्या भावनेने भजन म्हणावे." "कली फार माजेल तेव्हा नामाला सोडू नका. जो नाम घेईल त्याला मा भय नाही." भजनाचा शेवट आला । एक वेळ राम बोला । दीनदास सांगे निका । रामनाम स्वामी शिक्का ॥ श्रीब्रह्यचैतन्य महाराजांनी स्वतः सांगितलेली