Get it on Google Play
Download on the App Store

नामदार गोखले-चरित्र 117

There are also times when it rushes along at a giddy space covering the track of centuries in a year. There are such times. Six weeks ago Russia was an autocracy. She is now one of the most advanced democracies in the world.'' लोकमत तयार करून त्याच्या जोरावर आपले हक्क प्रस्थापित करण्याचा समय आता आला आहे. गोखले व टिळक यांच्या संमिश्रणाने आपला मार्ग आता आखावयाचा आहे. लोकमत तयार करावयाचे आणि राष्ट्रसंघापुढे मांडावयाचे. खुद्द गोखले यांनी मृत्युसमयी जो सुधारणांचा मसुदा तयार केला होता. तो त्यांस लढाईमुळे होणारी विचारक्रांती पाहून बदलावा लागला असता. ना. आगाखान हे गोखल्यांचे स्नेही; त्यांनी १९१७ ऑगस्टमध्ये हा मसुदा प्रसिध्द केला ही चूक झाली. कारण गोखल्यांनी त्या वेळच्या परिस्थितीचे तानमान पाहून जे लिहिले ते माँटेग्यु सुधारणांच्या वेळी प्रसिध्द करणे ही घोडचूक होय. कारण जे द्यावयास नको त्यासाठी सरकारास गोखल्यांच्या मसुद्यात पुरावा सापडणार आणि भाषावार प्रांतरचनेसारखी जा मागणी गोखल्यांनी लिहिली तिकडे मात्र सरकार कानाडोळा करणार. या मसुद्यात प्रांतिक स्वायत्तता मागितली आहे. ती आपणास कितीशी मिळाली आहे? याबाबतीत सरकार किंचित पुढे गेले आहे खरे. परंतु आपल्या कल्पना लढाईने झालेल्या संक्रमणामुळे फार पुढे गेल्या असल्यामुळे गोखल्यांचे विचार, त्यांच्या मागण्या आता- मवाळाससुध्दा फिक्या वाटतील. तेव्हा सरकारच्या मात्र फायद्यासाठी हे पत्रक प्रसिध्द झाले असे म्हणण्यास हरकत नाही. मॉडर्न रिव्ह्यूने या कृत्यावर टीका केली. तो म्हणतो, 'With all his devotion and statesmanship, Gokhale never was fit to be the non- official dictator of India.' गोखले जर जगते तर १९१६ मध्ये काँग्रेसने व मॉस्लेमलीगने जो मसुदा तयार केला, त्यास त्यांनी संमती दिली असती. कारण खरोखरच विचारांत प्रचंड बदल होत चालला आहे. ज्या गोष्टीने जगातल्या बारीकसारीक राष्ट्रांतही चैतन्य उत्पन्न केले त्याने हिंदुस्तानातही होणारच, इंग्लंडची दृष्टीही निवळली पाहिजे. कारण बेल्जमच्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी लढणा-या इंग्लंडने हिंदुस्तानास खुशाल डोळे मिटून ऐटीने तुडवावे हे त्यास जगांत खाली मान घालण्यास लावील. गांधींनी तर स्पष्ट म्हटले आहे की, जर्मनीने लढाईत जे धोरण स्वीकारले तेच इंग्लंडचे होते. मोठेपणाची फुकटची फुशारकी इंग्लंडला मिरवण्याची जरूरी नाही. जर इंग्लंडला हे खोटे करावयाचे असेल तर आयर्लंड, इजिप्त, हिंदुस्तान यासही इंग्लंडने हक्क दिले पाहिजेत. तीस कोटी लोकांस दास्यात ठेवणे हे अघोर पातक आहे. आणि सदैव असे मोठे राष्ट्र दास्यांत राहणारही नाही असे रानडयांनी म्हटले आहे. 'युध्द आणि त्यातून सुटका' या पुस्तकात लॉबेस डिकिन्सन म्हणतो. - 'Let no community be coerced under British rule, that wants to be self- governing. we have had the courage though late, to apply this principle to South- Africa and Ireland.  There remains our greatest act of courage and wisdom to apply it to India.' इंग्लिश लेखकही असे लिहू लागले आहेत. परंतु लॉइड जॉर्जसारखे मुत्सद्दी मात्र अद्याप सनदी नोकरांस 'लोखंडी चौकटच' म्हणत आहेत. परंतु ही 'लोखंडी चौकट' आता भंगून टाकली पाहिजे. या चौकटीतून आता बाहेर आले पाहिजे. आपल्या लोकांनी आता धैर्य दाखविले पाहिजे. सरकार जर जनतेच्या आकांक्षा तॉप्त करणार नाही तर दडपेगिरीच्या कायद्यांचा डोंगर रचून देखील क्रांतिकारक चळवळ दडपून टाकता येणार नाही. आपले पुढारी आता जास्त धीट झाले आहेत. एके काळी नेमस्त असणारे नेहरू, मालवीय याच्यासारखे पुढारी 'अन्याय्य कायदे मोडू' असे ठासून सरकारास बजावीत आहेत. भर कौन्सिलमध्ये जिनांसारखे तेजस्वी लोक काय सांगत आहेत पाहा : 'ज्याप्रमाणे इंग्लंडांतल्या नागरिकांनी जन्मसिध्द हक्कांसाठी आपले रक्त सांडले, त्याप्रमाणेच प्रसंग आल्यास मी देखील याच हक्कांपायी आपल्या रक्ताची आहुती देण्यास तयार आहे.' कौन्सिल लोकनायक सरकारास असे स्पष्ट बजावीत आहेत; धोक्याची सूचना, इशारत देत आहेत. जनतेने त्यांच्या मागे उभे राहावे म्हणून कौसिलच्या बाहेर राहणा-या लोकांनी टिळकांचे लोकजागृतीचे काम करावे. म्हणजे कौन्सिले व लोक यांच्या जोरावर आपल्या म्हणण्यास सामर्थ्य येईल; दुप्पट जोमाने कार्य होईल. लोकांत संघटना करणे पाप नव्हे. संघटना म्हणजेच जीव. संघटना सनदशीर आहे, पुण्यकारक आहे. राष्ट्रे संघटना व सहकार्य करण्यासाठीच आहोत असे एलिझाबेथने सोळाव्या शतकात झामोरिनला लिहिले होते. म्हणून ज्या वेळेस सर्व विश्वातील लोक झपाट्याने पुढे जात आहेत, अशा सध्याच्या वेळी आपण जुन्या पुढा-यांच्या मार्गांचे एकत्रीकरण केले पाहिजे.

नामदार गोखले

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
नामदार गोखले-चरित्र 1 नामदार गोखले-चरित्र 2 नामदार गोखले-चरित्र 3 नामदार गोखले-चरित्र 4 नामदार गोखले-चरित्र 5 नामदार गोखले-चरित्र 6 नामदार गोखले-चरित्र 7 नामदार गोखले-चरित्र 8 नामदार गोखले-चरित्र 9 नामदार गोखले-चरित्र 10 नामदार गोखले-चरित्र 11 नामदार गोखले-चरित्र 12 नामदार गोखले-चरित्र 13 नामदार गोखले-चरित्र 14 नामदार गोखले-चरित्र 15 नामदार गोखले-चरित्र 16 नामदार गोखले-चरित्र 17 नामदार गोखले-चरित्र 18 नामदार गोखले-चरित्र 19 नामदार गोखले-चरित्र 20 नामदार गोखले-चरित्र 21 नामदार गोखले-चरित्र 22 नामदार गोखले-चरित्र 23 नामदार गोखले-चरित्र 24 नामदार गोखले-चरित्र 25 नामदार गोखले-चरित्र 26 नामदार गोखले-चरित्र 27 नामदार गोखले-चरित्र 28 नामदार गोखले-चरित्र 29 नामदार गोखले-चरित्र 30 नामदार गोखले-चरित्र 31 नामदार गोखले-चरित्र 32 नामदार गोखले-चरित्र 33 नामदार गोखले-चरित्र 34 नामदार गोखले-चरित्र 35 नामदार गोखले-चरित्र 36 नामदार गोखले-चरित्र 37 नामदार गोखले-चरित्र 38 नामदार गोखले-चरित्र 39 नामदार गोखले-चरित्र 40 नामदार गोखले-चरित्र 41 नामदार गोखले-चरित्र 42 नामदार गोखले-चरित्र 43 नामदार गोखले-चरित्र 44 नामदार गोखले-चरित्र 45 नामदार गोखले-चरित्र 46 नामदार गोखले-चरित्र 47 नामदार गोखले-चरित्र 48 नामदार गोखले-चरित्र 49 नामदार गोखले-चरित्र 50 नामदार गोखले-चरित्र 51 नामदार गोखले-चरित्र 52 नामदार गोखले-चरित्र 53 नामदार गोखले-चरित्र 54 नामदार गोखले-चरित्र 55 नामदार गोखले-चरित्र 56 नामदार गोखले-चरित्र 57 नामदार गोखले-चरित्र 58 नामदार गोखले-चरित्र 59 नामदार गोखले-चरित्र 60 नामदार गोखले-चरित्र 61 नामदार गोखले-चरित्र 62 नामदार गोखले-चरित्र 63 नामदार गोखले-चरित्र 64 नामदार गोखले-चरित्र 65 नामदार गोखले-चरित्र 66 नामदार गोखले-चरित्र 67 नामदार गोखले-चरित्र 68 नामदार गोखले-चरित्र 69 नामदार गोखले-चरित्र 70 नामदार गोखले-चरित्र 71 नामदार गोखले-चरित्र 72 नामदार गोखले-चरित्र 73 नामदार गोखले-चरित्र 74 नामदार गोखले-चरित्र 75 नामदार गोखले-चरित्र 76 नामदार गोखले-चरित्र 77 नामदार गोखले-चरित्र 78 नामदार गोखले-चरित्र 79 नामदार गोखले-चरित्र 80 नामदार गोखले-चरित्र 81 नामदार गोखले-चरित्र 82 नामदार गोखले-चरित्र 83 नामदार गोखले-चरित्र 84 नामदार गोखले-चरित्र 85 नामदार गोखले-चरित्र 86 नामदार गोखले-चरित्र 87 नामदार गोखले-चरित्र 88 नामदार गोखले-चरित्र 89 नामदार गोखले-चरित्र 90 नामदार गोखले-चरित्र 91 नामदार गोखले-चरित्र 92 नामदार गोखले-चरित्र 93 नामदार गोखले-चरित्र 94 नामदार गोखले-चरित्र 95 नामदार गोखले-चरित्र 96 नामदार गोखले-चरित्र 97 नामदार गोखले-चरित्र 98 नामदार गोखले-चरित्र 99 नामदार गोखले-चरित्र 100 नामदार गोखले-चरित्र 101 नामदार गोखले-चरित्र 102 नामदार गोखले-चरित्र 103 नामदार गोखले-चरित्र 104 नामदार गोखले-चरित्र 105 नामदार गोखले-चरित्र 106 नामदार गोखले-चरित्र 107 नामदार गोखले-चरित्र 108 नामदार गोखले-चरित्र 109 नामदार गोखले-चरित्र 110 नामदार गोखले-चरित्र 111 नामदार गोखले-चरित्र 112 नामदार गोखले-चरित्र 113 नामदार गोखले-चरित्र 114 नामदार गोखले-चरित्र 115 नामदार गोखले-चरित्र 116 नामदार गोखले-चरित्र 117 नामदार गोखले-चरित्र 118 नामदार गोखले-चरित्र 119 नामदार गोखले-चरित्र 120 नामदार गोखले-चरित्र 121 नामदार गोखले-चरित्र 122 नामदार गोखले-चरित्र 123 नामदार गोखले-चरित्र 124 नामदार गोखले-चरित्र 125 नामदार गोखले-चरित्र 126 नामदार गोखले-चरित्र 127 नामदार गोखले-चरित्र 128 नामदार गोखले-चरित्र 129 नामदार गोखले-चरित्र 130 नामदार गोखले-चरित्र 131 नामदार गोखले-चरित्र 132 नामदार गोखले-चरित्र 133 नामदार गोखले-चरित्र 134 नामदार गोखले-चरित्र 135 नामदार गोखले-चरित्र 136 नामदार गोखले-चरित्र 137 नामदार गोखले-चरित्र 138