Get it on Google Play
Download on the App Store

नामदार गोखले-चरित्र 64

"This fair province has been dismembered to destroy growing solidarity of the people check their national aspirations and weaken their power of co-operating for national ends,  to lesson the influence of their  educated classes  with their countrymen and reduce the political importance of Calcutta.''

१६ आक्टोबर १९०५ रोजी फक्त सरकारी सभासद हजर असता हा फायदा पास करण्यात आला, आणि तो दिवस बंगालमध्ये सुतकासारखा पाळण्यात आला. परंतु या काळयातूनही पांढरे बाहेर पडले. या कडू कवंडलामध्येही एक अमृताची बी सापडली.

"For the first time since British rule began, all sections of the Indian community, without distinction to caste or creed have been moved by a common impulse and without the stimulus of external pressure, to act together in offering resistance to a common wrong.- The most astounding fact of the situation is that the public life of this country has received an accession of strength of great importance and for this all India owes a deep debt of gratitude of Bengal. ''

नंतर गोपाळराव स्वदेशी आणि बहिष्कार यांकडे वळले. त्यांनी सांगितले की, ज्याप्रसंगी सर्व लोक एका झेंड्याखाली जमा होतात, अशा वेळी बहिष्कार हा कायदेशीर आहे. स्वदेशीमधील पवित्र भावना आणि आर्थिक फायदाही त्यांनी स्पष्ट केला. नंतर आपले ध्येय काय असावे याची त्यांनी मीमांसा केली. लोकांस जास्त जास्त हक्क दिल्याशिवाय ते हक्कांस लायक होत नाहीत. 'केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे.' ''It is liberty alone which fits men for liberty,'' हे ग्लॅडस्टनचे सूत्र आहे. परंतु तुम्ही आधी घरात पोहावयास शिका म्हणजे मग आम्ही तुम्हांस सागरात नेऊ अशा प्रकारचे आमच्या अधिका-यांचे म्हणणे असते. हिंदुस्तानास दिलेल्या वचनांचा वेळोवेळी कसा भंग केला गेला हे जगजाहीरच आहे. गोड गोड थापा मारून वेळ मारून नेणे हे सरकारचे काम आणि ते त्याने यथायोग्य केले. नोकरशाही लोकांत मिसळण्यास पुढे येत नाही: लोकांनी भीत भीत नमून त्यांच्या पुढे वागले पाहिजे, अशी स्थिती आली आहे. ही स्थिती पालटली पाहिजे. आपणांस ताबडतोब काही हक्क तरी मिळाले  पाहिजेत. ते कोणचे असावेत या गोष्टीचेही त्यांनी स्पष्टीकरण केले. जिल्हाबोर्डाची त्यांनी फार जरूरी दाखविली. हिंदुस्तानचा बराचसा राज्यकारभार डिस्ट्रिक्ट अधिका-यांकडून हाकला जातो. त्यांस सल्ला देण्यास आणि पुढे त्यांच्यावर ताबा ठेवण्यास या जिल्हाबोर्डांचा फार उपयोग होईल, असे रानड्यांस वाटत असे. ही महत्त्वाची सुधारणा गोपाळरावांनी लोकांपुढे मांडली. इंग्लंडमधील परिस्थितीही आपणांस अनुकूल आहे: स्टेट सेक्रेटरी, अंडर सेक्रेटरी हिंदुस्तानच्या भवितव्यतेविषयी उदार धोरण बाळगणारे आहेत असे त्यांनी दाखविले. विशेषत: मोर्ले साहेबांविषयी गोखल्यांनी फारच आदर दाखविला. पण पुष्कळदा या जगात जसे दिसते तसे नसते. मोर्ले तत्त्वज्ञ असले, राज्यकारभार बराचसा लोकांच्या हातात पाहिजे असे  बर्कच्या अध्ययनाने व ग्लॅडस्टनच्या शिकवणुकीने जरी त्यांचे मत बनले असले तरी सेक्रेटरीच्या  जागेवर येताच, या जागेला चिकटलेले संकुचितपणा, मतकृपणता, अनुदारता हे दुर्गुण त्यांना येऊन चिकटले. हे दुर्गुण दूर लोटण्याचे त्यांस सामर्थ्य नव्हते. बदललेल्या परिस्थितीत जो आपले स्वत:चे उदार विचार कायम ठेवून तदनुरूप कृती करण्याची खटपट करितो तोच महापुरुष होय. मोर्ले अर्थात या कोटीतले नव्हते. ते पुस्तकी पंडित होते. त्यांना वांगी फक्त पुराणाचे वेळी निषिध्ध होती. परंतु गोखले भोळे! त्यांना मोर्ले साहेबांविषयी फार आशा वाटत होती. आपल्या देशास हा काही तरी भरभक्कम सुधारणा देईल, असे गोपाळरावांस वाटत होते. त्यांचे हृदय खालीवर होत होते:-

"And as regards the new Secretary of State for India, what shall I say? Large numbers of educated men in this country feel towards Mr. Morley as towards Mr. Morley as towards a Master; and the heart hopes and yet it trembles, as it had never hoped or trembled before.  He,  the reverent student of Burke, the disciple of Mill, the friend and biographer of Gladstone- will he courageously apply their principles and his own to the Government of this country, or will he too succumb to the influences of the Indian office around him, and thus cast a cruel blast on hopes, which his own writings have done so much to foster? We shall see. ''

नामदार गोखले

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
नामदार गोखले-चरित्र 1 नामदार गोखले-चरित्र 2 नामदार गोखले-चरित्र 3 नामदार गोखले-चरित्र 4 नामदार गोखले-चरित्र 5 नामदार गोखले-चरित्र 6 नामदार गोखले-चरित्र 7 नामदार गोखले-चरित्र 8 नामदार गोखले-चरित्र 9 नामदार गोखले-चरित्र 10 नामदार गोखले-चरित्र 11 नामदार गोखले-चरित्र 12 नामदार गोखले-चरित्र 13 नामदार गोखले-चरित्र 14 नामदार गोखले-चरित्र 15 नामदार गोखले-चरित्र 16 नामदार गोखले-चरित्र 17 नामदार गोखले-चरित्र 18 नामदार गोखले-चरित्र 19 नामदार गोखले-चरित्र 20 नामदार गोखले-चरित्र 21 नामदार गोखले-चरित्र 22 नामदार गोखले-चरित्र 23 नामदार गोखले-चरित्र 24 नामदार गोखले-चरित्र 25 नामदार गोखले-चरित्र 26 नामदार गोखले-चरित्र 27 नामदार गोखले-चरित्र 28 नामदार गोखले-चरित्र 29 नामदार गोखले-चरित्र 30 नामदार गोखले-चरित्र 31 नामदार गोखले-चरित्र 32 नामदार गोखले-चरित्र 33 नामदार गोखले-चरित्र 34 नामदार गोखले-चरित्र 35 नामदार गोखले-चरित्र 36 नामदार गोखले-चरित्र 37 नामदार गोखले-चरित्र 38 नामदार गोखले-चरित्र 39 नामदार गोखले-चरित्र 40 नामदार गोखले-चरित्र 41 नामदार गोखले-चरित्र 42 नामदार गोखले-चरित्र 43 नामदार गोखले-चरित्र 44 नामदार गोखले-चरित्र 45 नामदार गोखले-चरित्र 46 नामदार गोखले-चरित्र 47 नामदार गोखले-चरित्र 48 नामदार गोखले-चरित्र 49 नामदार गोखले-चरित्र 50 नामदार गोखले-चरित्र 51 नामदार गोखले-चरित्र 52 नामदार गोखले-चरित्र 53 नामदार गोखले-चरित्र 54 नामदार गोखले-चरित्र 55 नामदार गोखले-चरित्र 56 नामदार गोखले-चरित्र 57 नामदार गोखले-चरित्र 58 नामदार गोखले-चरित्र 59 नामदार गोखले-चरित्र 60 नामदार गोखले-चरित्र 61 नामदार गोखले-चरित्र 62 नामदार गोखले-चरित्र 63 नामदार गोखले-चरित्र 64 नामदार गोखले-चरित्र 65 नामदार गोखले-चरित्र 66 नामदार गोखले-चरित्र 67 नामदार गोखले-चरित्र 68 नामदार गोखले-चरित्र 69 नामदार गोखले-चरित्र 70 नामदार गोखले-चरित्र 71 नामदार गोखले-चरित्र 72 नामदार गोखले-चरित्र 73 नामदार गोखले-चरित्र 74 नामदार गोखले-चरित्र 75 नामदार गोखले-चरित्र 76 नामदार गोखले-चरित्र 77 नामदार गोखले-चरित्र 78 नामदार गोखले-चरित्र 79 नामदार गोखले-चरित्र 80 नामदार गोखले-चरित्र 81 नामदार गोखले-चरित्र 82 नामदार गोखले-चरित्र 83 नामदार गोखले-चरित्र 84 नामदार गोखले-चरित्र 85 नामदार गोखले-चरित्र 86 नामदार गोखले-चरित्र 87 नामदार गोखले-चरित्र 88 नामदार गोखले-चरित्र 89 नामदार गोखले-चरित्र 90 नामदार गोखले-चरित्र 91 नामदार गोखले-चरित्र 92 नामदार गोखले-चरित्र 93 नामदार गोखले-चरित्र 94 नामदार गोखले-चरित्र 95 नामदार गोखले-चरित्र 96 नामदार गोखले-चरित्र 97 नामदार गोखले-चरित्र 98 नामदार गोखले-चरित्र 99 नामदार गोखले-चरित्र 100 नामदार गोखले-चरित्र 101 नामदार गोखले-चरित्र 102 नामदार गोखले-चरित्र 103 नामदार गोखले-चरित्र 104 नामदार गोखले-चरित्र 105 नामदार गोखले-चरित्र 106 नामदार गोखले-चरित्र 107 नामदार गोखले-चरित्र 108 नामदार गोखले-चरित्र 109 नामदार गोखले-चरित्र 110 नामदार गोखले-चरित्र 111 नामदार गोखले-चरित्र 112 नामदार गोखले-चरित्र 113 नामदार गोखले-चरित्र 114 नामदार गोखले-चरित्र 115 नामदार गोखले-चरित्र 116 नामदार गोखले-चरित्र 117 नामदार गोखले-चरित्र 118 नामदार गोखले-चरित्र 119 नामदार गोखले-चरित्र 120 नामदार गोखले-चरित्र 121 नामदार गोखले-चरित्र 122 नामदार गोखले-चरित्र 123 नामदार गोखले-चरित्र 124 नामदार गोखले-चरित्र 125 नामदार गोखले-चरित्र 126 नामदार गोखले-चरित्र 127 नामदार गोखले-चरित्र 128 नामदार गोखले-चरित्र 129 नामदार गोखले-चरित्र 130 नामदार गोखले-चरित्र 131 नामदार गोखले-चरित्र 132 नामदार गोखले-चरित्र 133 नामदार गोखले-चरित्र 134 नामदार गोखले-चरित्र 135 नामदार गोखले-चरित्र 136 नामदार गोखले-चरित्र 137 नामदार गोखले-चरित्र 138