Get it on Google Play
Download on the App Store

नामदार गोखले-चरित्र 107

गोपाळराव हे नेमस्तपक्षातले अग्रणी तर टिळक हे राष्ट्रीयपक्षाचे अध्वर्यू. दोघांच्या कामगि-या आमच्या दृष्टीने एकमेकांस पोषकच होत. गोखल्यांस निराशा कधी शिवत नसे; टिळकांना निराशेचीच आशा वाटे. कारण लोक निराश  झाले तरच त्यांच्या हातून काही तरी होण्याची आशा असते. परंतु रानड्यांच्या संगतीत मुरलेले व ते संस्कार हृत्पटलावर उठलेले गोखले सदैव आशावादी असत. परकी सरकारकडूनही प्रयत्नाने आपण हक्क मिळवू असे त्यांस खरोखरच वाटे. प्रसिध्द इंग्रज प्रधान वॉलपोल म्हणत असे की, 'I never heard that it is a crime to hope for the best.' हेच गोखल्यांचे सूत्र होते. आणि म्हणूनच ते निराशेने वेड बनून लोकांसही वेडे बना असे सांगावयास तयार नव्हते. टिळकांचे १९०८ च्या पूर्वीचे काम केवळ चळवळ करण्याचे होते. परंतु चळवळीपेक्षा तत्त्वे टिकाऊ असतात; कारण चळवळ हा बुडबुडा होय. लाला लजपतराय यांनी 'हिंदी राजकारण' या विषयावर १९०५ मध्ये एक लेख लिहिला होता. त्या वेळचा सर्व ठिकाणच्या चळवळीचा बडयाबडया शब्दांचा पूर पाहून ते म्हणतात :- 'I have come to the conclusion that the Indian political party has accepted the expression politics to be synonymous with Agitation.' राजकारण म्हणजे राष्ट्राची समुन्नती होय. राजकारणपटूची व्याख्या लजपतराय अशी करतात:- 'The politician is one to whom observation has shown the existence of a grave social grievance or immorality, to whom intelligence has shown a remedy, and to whom the voice of consecience enlightened by a religious conception of the human mission here below, has revealed the inexorable duty of devoting himself to the application of the remedy and extirpation of the evil. The aim of the politician is always to found; that of the other is to destroy. The first is a man of progress, the second of opposition.' या सुंदर व्याख्येप्रमाणे पाहिले तर गोखले राजकारणी ठरतात; टिळक चळवळ्ये ठरतात. गोखल्यांच्या पुढे मार्ग, ध्येय होते; टिळक फक्त खळबळ उडवीत. टिळकांनी मुंबईस स्पष्ट सांगितले होते, 'I do not think it is our duty to formulate constructive measures and help the Government which does not take us into its confidence by enabling us to share its highest offices, executive and administrative and bear the responsibilities of Government. Constructive measures are the duty of those who are responsible for the Government of the country and we are not responsible. 'या दोघांच्या मनांतील खात्रीमुळे दोघांनी दोन भिन्न भिन्न मार्ग अनुसरले. गोखल्यांनी सरकारशी शक्य तितकी सहकारिता करून सुधारणेचे पाऊल पुढे नेण्याचे काम अंगिकारले; टिळकांनी सरकारास चापण्यासाठी लोकमताचा जोर उत्पन्न करण्याचे काम अंगावर घेतले. यामुळे गोपाळरावांच्या कामगिरीस विधायक असे नाव मिळते आणि टिळकांची कामगिरी विध्वंसक असे सांगण्यात येते. परंतु जमीन खणणे म्हणजे विघातक असे कसे म्हणता येईल? कोरडया जमिनीवर बी पेरले तर ते उगवणार नाही, यासाठी बी पेरण्यासाठी जमीन खणणे हेही विधायक कामच आहे. टिळकांनी लोकांची मने खणली, त्यांच्या मनावर आलेले- जमलेले- निष्क्रियतेचे थर दूर करून हृदयांत सुप्त असलेला चैतन्याचा झरा त्यांस दाखविला. या कामगिरीस विध्वंसक कोण म्हणेल? फ्रेडरिक हॅरिसनसाहेबांनी क्रॉमवेलविषयी लिहिताना म्हटले आहे :- ''Destructive work in statesmanship, provided it be permanent, is ipso facto constructive, if it enables the new system to form and grow.'' पुन: ते अन्यत्र म्हणतात- 'No hard and fast line can be drawn between negative and positive act of the soldier and statesman; and it is misleading to attempt to distinguish negative from positive work. That destructive statesmanship should be constructive in result, requires important conditions. The destruction must be necessary and timely; it must be final.'

नामदार गोखले

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
नामदार गोखले-चरित्र 1 नामदार गोखले-चरित्र 2 नामदार गोखले-चरित्र 3 नामदार गोखले-चरित्र 4 नामदार गोखले-चरित्र 5 नामदार गोखले-चरित्र 6 नामदार गोखले-चरित्र 7 नामदार गोखले-चरित्र 8 नामदार गोखले-चरित्र 9 नामदार गोखले-चरित्र 10 नामदार गोखले-चरित्र 11 नामदार गोखले-चरित्र 12 नामदार गोखले-चरित्र 13 नामदार गोखले-चरित्र 14 नामदार गोखले-चरित्र 15 नामदार गोखले-चरित्र 16 नामदार गोखले-चरित्र 17 नामदार गोखले-चरित्र 18 नामदार गोखले-चरित्र 19 नामदार गोखले-चरित्र 20 नामदार गोखले-चरित्र 21 नामदार गोखले-चरित्र 22 नामदार गोखले-चरित्र 23 नामदार गोखले-चरित्र 24 नामदार गोखले-चरित्र 25 नामदार गोखले-चरित्र 26 नामदार गोखले-चरित्र 27 नामदार गोखले-चरित्र 28 नामदार गोखले-चरित्र 29 नामदार गोखले-चरित्र 30 नामदार गोखले-चरित्र 31 नामदार गोखले-चरित्र 32 नामदार गोखले-चरित्र 33 नामदार गोखले-चरित्र 34 नामदार गोखले-चरित्र 35 नामदार गोखले-चरित्र 36 नामदार गोखले-चरित्र 37 नामदार गोखले-चरित्र 38 नामदार गोखले-चरित्र 39 नामदार गोखले-चरित्र 40 नामदार गोखले-चरित्र 41 नामदार गोखले-चरित्र 42 नामदार गोखले-चरित्र 43 नामदार गोखले-चरित्र 44 नामदार गोखले-चरित्र 45 नामदार गोखले-चरित्र 46 नामदार गोखले-चरित्र 47 नामदार गोखले-चरित्र 48 नामदार गोखले-चरित्र 49 नामदार गोखले-चरित्र 50 नामदार गोखले-चरित्र 51 नामदार गोखले-चरित्र 52 नामदार गोखले-चरित्र 53 नामदार गोखले-चरित्र 54 नामदार गोखले-चरित्र 55 नामदार गोखले-चरित्र 56 नामदार गोखले-चरित्र 57 नामदार गोखले-चरित्र 58 नामदार गोखले-चरित्र 59 नामदार गोखले-चरित्र 60 नामदार गोखले-चरित्र 61 नामदार गोखले-चरित्र 62 नामदार गोखले-चरित्र 63 नामदार गोखले-चरित्र 64 नामदार गोखले-चरित्र 65 नामदार गोखले-चरित्र 66 नामदार गोखले-चरित्र 67 नामदार गोखले-चरित्र 68 नामदार गोखले-चरित्र 69 नामदार गोखले-चरित्र 70 नामदार गोखले-चरित्र 71 नामदार गोखले-चरित्र 72 नामदार गोखले-चरित्र 73 नामदार गोखले-चरित्र 74 नामदार गोखले-चरित्र 75 नामदार गोखले-चरित्र 76 नामदार गोखले-चरित्र 77 नामदार गोखले-चरित्र 78 नामदार गोखले-चरित्र 79 नामदार गोखले-चरित्र 80 नामदार गोखले-चरित्र 81 नामदार गोखले-चरित्र 82 नामदार गोखले-चरित्र 83 नामदार गोखले-चरित्र 84 नामदार गोखले-चरित्र 85 नामदार गोखले-चरित्र 86 नामदार गोखले-चरित्र 87 नामदार गोखले-चरित्र 88 नामदार गोखले-चरित्र 89 नामदार गोखले-चरित्र 90 नामदार गोखले-चरित्र 91 नामदार गोखले-चरित्र 92 नामदार गोखले-चरित्र 93 नामदार गोखले-चरित्र 94 नामदार गोखले-चरित्र 95 नामदार गोखले-चरित्र 96 नामदार गोखले-चरित्र 97 नामदार गोखले-चरित्र 98 नामदार गोखले-चरित्र 99 नामदार गोखले-चरित्र 100 नामदार गोखले-चरित्र 101 नामदार गोखले-चरित्र 102 नामदार गोखले-चरित्र 103 नामदार गोखले-चरित्र 104 नामदार गोखले-चरित्र 105 नामदार गोखले-चरित्र 106 नामदार गोखले-चरित्र 107 नामदार गोखले-चरित्र 108 नामदार गोखले-चरित्र 109 नामदार गोखले-चरित्र 110 नामदार गोखले-चरित्र 111 नामदार गोखले-चरित्र 112 नामदार गोखले-चरित्र 113 नामदार गोखले-चरित्र 114 नामदार गोखले-चरित्र 115 नामदार गोखले-चरित्र 116 नामदार गोखले-चरित्र 117 नामदार गोखले-चरित्र 118 नामदार गोखले-चरित्र 119 नामदार गोखले-चरित्र 120 नामदार गोखले-चरित्र 121 नामदार गोखले-चरित्र 122 नामदार गोखले-चरित्र 123 नामदार गोखले-चरित्र 124 नामदार गोखले-चरित्र 125 नामदार गोखले-चरित्र 126 नामदार गोखले-चरित्र 127 नामदार गोखले-चरित्र 128 नामदार गोखले-चरित्र 129 नामदार गोखले-चरित्र 130 नामदार गोखले-चरित्र 131 नामदार गोखले-चरित्र 132 नामदार गोखले-चरित्र 133 नामदार गोखले-चरित्र 134 नामदार गोखले-चरित्र 135 नामदार गोखले-चरित्र 136 नामदार गोखले-चरित्र 137 नामदार गोखले-चरित्र 138