Get it on Google Play
Download on the App Store

नामदार गोखले-चरित्र 28

राजकीय आयुष्यक्रम

रानडयांच्या पाठशाळेत गेल्यावर गोखल्यांस हे नवीन धडे शिकावे लागले. राष्ट्रीय सभेची त्यांस ओळख झाली. नवीन बैठकीस कोणते प्रश्न सोडवावे लागतील त्यांचा रानडयांबरोबर त्यांस विचारविनिमय करावा लागे. १८८५ सालापर्यंत गोखल्यांना सार्वजनिक काम म्हणजे काय व कशाशी खातात हे माहीत नव्हते. १८८५ साली पुण्यात असताना सुध्दा त्यांस रानडे कोण हे माहीत नव्हते. हिराबागेतील सभेच्या वेळी रानडयांस तिकीट नाही म्हणून त्यांनी अडविले होते. तेच गोखले १८८९ सालच्या काँग्रेसमधील पुष्कळ कामाचा बोजा अंगावर घेते झाले. ही बैठक मुंबईस झाली व फार महत्त्वाची अशी झाली. रानडयांच्या सहवासात असल्यामुळे या सभेचे बरेचसे काम गोखल्यांस करावे लागले. या सभेस प्रख्यात प. वा. चार्लस ब्रॅड्लॉ हे आले होते. ब्रॅडलॉ साहेब हे उदारमतवादी होते. त्यांचे भाषण फार स्फूर्तिदायक झाले. त्यातील एक- दोन वाक्ये येथे दिल्याशिवाय राहवत नाही.

“Those who first enterprised them, were called seditious and sometimes sent to jail as criminals, but the speech and thought live on.  No imprisonment ca crush a truth, it may hinder it for a moment, it may delay it for an hour but it gets an electric elasticity inside the dungeon walls and  it grows and moves the whole world when it comes out.''

जे देशासाठी प्रथम झगडतात त्यांस सरकार द्रोही ठरवील तर ठरवो; परंतु त्यांचे कार्य शेवटी यशस्वी होतेच. हा दिव्य संदेश त्यांनी येथील लोकांस सांगितला. असेच स्फूर्तिदायक उद्गार पुढे टिळकांस शिक्षा झाली तेव्हा त्यांनी काढिले. अशा प्रकारे राष्ट्रीय सभेच्या प्रांगणात १८८९ साली गोखल्यांचा प्रवेश झाला. १८९० साली त्यांनी अर्थशास्त्राचा अभ्यास जोराने सुरू केला. अर्थशास्त्रात आकडेशास्त्र पार महत्त्वाचे असते. महाराष्ट्रात रा. ब. गणेश व्यंटेश जोशी हे एक नावाजलेले आकडेशास्त्रज्ञ होते. रानडयांची व त्यांची मैत्री होती. रानडयांनी त्यांस लिहिले की, गोखले यांस या विषयाचा अभ्यास करावयाचा आहे. तुम्ही त्यांस मदत करा. १८९० फेब्रुवारी १६ च्या पत्रात रानडे जोशी यांस लिहितात :-

“During the last six Months that he has been working with me.  I have formed a very high opinion of his great powers and abilities, his readiness to do his best under all circumstance.  He is essentially an honest - intellectually as well as morally - student, and I am sure, you will find in him a worthy collaborator.''

नामदार गोखले

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
नामदार गोखले-चरित्र 1 नामदार गोखले-चरित्र 2 नामदार गोखले-चरित्र 3 नामदार गोखले-चरित्र 4 नामदार गोखले-चरित्र 5 नामदार गोखले-चरित्र 6 नामदार गोखले-चरित्र 7 नामदार गोखले-चरित्र 8 नामदार गोखले-चरित्र 9 नामदार गोखले-चरित्र 10 नामदार गोखले-चरित्र 11 नामदार गोखले-चरित्र 12 नामदार गोखले-चरित्र 13 नामदार गोखले-चरित्र 14 नामदार गोखले-चरित्र 15 नामदार गोखले-चरित्र 16 नामदार गोखले-चरित्र 17 नामदार गोखले-चरित्र 18 नामदार गोखले-चरित्र 19 नामदार गोखले-चरित्र 20 नामदार गोखले-चरित्र 21 नामदार गोखले-चरित्र 22 नामदार गोखले-चरित्र 23 नामदार गोखले-चरित्र 24 नामदार गोखले-चरित्र 25 नामदार गोखले-चरित्र 26 नामदार गोखले-चरित्र 27 नामदार गोखले-चरित्र 28 नामदार गोखले-चरित्र 29 नामदार गोखले-चरित्र 30 नामदार गोखले-चरित्र 31 नामदार गोखले-चरित्र 32 नामदार गोखले-चरित्र 33 नामदार गोखले-चरित्र 34 नामदार गोखले-चरित्र 35 नामदार गोखले-चरित्र 36 नामदार गोखले-चरित्र 37 नामदार गोखले-चरित्र 38 नामदार गोखले-चरित्र 39 नामदार गोखले-चरित्र 40 नामदार गोखले-चरित्र 41 नामदार गोखले-चरित्र 42 नामदार गोखले-चरित्र 43 नामदार गोखले-चरित्र 44 नामदार गोखले-चरित्र 45 नामदार गोखले-चरित्र 46 नामदार गोखले-चरित्र 47 नामदार गोखले-चरित्र 48 नामदार गोखले-चरित्र 49 नामदार गोखले-चरित्र 50 नामदार गोखले-चरित्र 51 नामदार गोखले-चरित्र 52 नामदार गोखले-चरित्र 53 नामदार गोखले-चरित्र 54 नामदार गोखले-चरित्र 55 नामदार गोखले-चरित्र 56 नामदार गोखले-चरित्र 57 नामदार गोखले-चरित्र 58 नामदार गोखले-चरित्र 59 नामदार गोखले-चरित्र 60 नामदार गोखले-चरित्र 61 नामदार गोखले-चरित्र 62 नामदार गोखले-चरित्र 63 नामदार गोखले-चरित्र 64 नामदार गोखले-चरित्र 65 नामदार गोखले-चरित्र 66 नामदार गोखले-चरित्र 67 नामदार गोखले-चरित्र 68 नामदार गोखले-चरित्र 69 नामदार गोखले-चरित्र 70 नामदार गोखले-चरित्र 71 नामदार गोखले-चरित्र 72 नामदार गोखले-चरित्र 73 नामदार गोखले-चरित्र 74 नामदार गोखले-चरित्र 75 नामदार गोखले-चरित्र 76 नामदार गोखले-चरित्र 77 नामदार गोखले-चरित्र 78 नामदार गोखले-चरित्र 79 नामदार गोखले-चरित्र 80 नामदार गोखले-चरित्र 81 नामदार गोखले-चरित्र 82 नामदार गोखले-चरित्र 83 नामदार गोखले-चरित्र 84 नामदार गोखले-चरित्र 85 नामदार गोखले-चरित्र 86 नामदार गोखले-चरित्र 87 नामदार गोखले-चरित्र 88 नामदार गोखले-चरित्र 89 नामदार गोखले-चरित्र 90 नामदार गोखले-चरित्र 91 नामदार गोखले-चरित्र 92 नामदार गोखले-चरित्र 93 नामदार गोखले-चरित्र 94 नामदार गोखले-चरित्र 95 नामदार गोखले-चरित्र 96 नामदार गोखले-चरित्र 97 नामदार गोखले-चरित्र 98 नामदार गोखले-चरित्र 99 नामदार गोखले-चरित्र 100 नामदार गोखले-चरित्र 101 नामदार गोखले-चरित्र 102 नामदार गोखले-चरित्र 103 नामदार गोखले-चरित्र 104 नामदार गोखले-चरित्र 105 नामदार गोखले-चरित्र 106 नामदार गोखले-चरित्र 107 नामदार गोखले-चरित्र 108 नामदार गोखले-चरित्र 109 नामदार गोखले-चरित्र 110 नामदार गोखले-चरित्र 111 नामदार गोखले-चरित्र 112 नामदार गोखले-चरित्र 113 नामदार गोखले-चरित्र 114 नामदार गोखले-चरित्र 115 नामदार गोखले-चरित्र 116 नामदार गोखले-चरित्र 117 नामदार गोखले-चरित्र 118 नामदार गोखले-चरित्र 119 नामदार गोखले-चरित्र 120 नामदार गोखले-चरित्र 121 नामदार गोखले-चरित्र 122 नामदार गोखले-चरित्र 123 नामदार गोखले-चरित्र 124 नामदार गोखले-चरित्र 125 नामदार गोखले-चरित्र 126 नामदार गोखले-चरित्र 127 नामदार गोखले-चरित्र 128 नामदार गोखले-चरित्र 129 नामदार गोखले-चरित्र 130 नामदार गोखले-चरित्र 131 नामदार गोखले-चरित्र 132 नामदार गोखले-चरित्र 133 नामदार गोखले-चरित्र 134 नामदार गोखले-चरित्र 135 नामदार गोखले-चरित्र 136 नामदार गोखले-चरित्र 137 नामदार गोखले-चरित्र 138