Get it on Google Play
Download on the App Store

नामदार गोखले-चरित्र 105

गोखल्यांचे तेज कौन्सिलमध्ये फार पडले. इतर सर्व सभासद त्यांच्यापुढे दिपून जात. कारण गोखले केवळ सरकारवर टीका करण्याचेच काम करून थांबत नसत, तर रयतेला सुख व्हावे म्हणून दरवर्षी नाना उपाय ते सुचवीत असत. मिठावरील कर, प्राप्तीवरील कर, आरोग्य, शेतकी- सुधारणा या बाबतींत त्यांचे म्हणणे थोडेफार सरकारने ऐकले. सरकारने ऐकले नाही तरी दरवर्षी तेच तेच सांगण्यास ते कधी मागेपुढे पाहत नसत किंवा लाजही मानीत नसत. शिक्षणाच्या बाबतीतही त्यांच्या कारकीर्दीत जास्त खर्च होऊ लागला.  शेवटली तीन वर्षे तर सक्तीच्या व मोफत प्राथमिक शिक्षणाच्या बिलावर त्यांचा सर्व भर होता. हा शिक्षणाचा खर्च कोठून आणावयाचा? त्यासाठी आयात मालावरील जकात शेकडा ५ आहे ती ७॥ करावी, काही दुसरे कर बसवावे, आणि लष्करासारख्या लाडक्या खात्यातील उधळपट्टी कमी करावी असे त्यांनी सुचविले. हे सक्तीचे शिक्षण प्रारंभी मुलांपुरतेच असावे असे गोखल्यांचे मत बनले होते. Mr. Gokhale himself has abandoned the idea of making  primary education compulsory for girls as well as for boys. असे चिरोल सांगतात. गोखल्यांच्या कौन्सिलमधील कामास हिंदुस्तानात तोड नाही. १९१३ च्या मार्चच्या १४ तारखेस अंदाजपत्रकावरील वाद-विवादाचा समारोप करतेवेळी सर फ्लीटवुड वुइल्सन म्हणाले, ''It is difficult for those who served in previous councils to express to those who are new to this council, what a great blank Mr. Gokhale's absence creates. It seems to be the play of Hamlet without Hamlet, and I think we all agree in wishing him a return to good health and a return to the council next year.'' कौन्सिलामधील त्यांची भाषणे, त्यांनी सुचविलेले निरनिराळे उपाय, शेतकरी वगैरे वर्गांस सुख व्हावे यासाठी त्यांस वाटत असलेली तळमळ, त्यांच्यावर करांचे ओझे कमी पडावे म्हणून ते करीत असलेली अव्याहत खटपट हे सर्व पाहिले म्हणजे ते आपल्याकडील ग्लॅडस्टन होत असे वाटते. वरील सर्व विवेचनात दिसून न येणारा परंतु अत्यंत महत्त्वाचा गुण म्हणजे त्यांनी कौन्सिलमधील वादांस एक प्रकारचे नैतिक स्वरूप दिले. याच नीतिमत्तेच्या विचाराने अफूचा व्यापार बंद करा व ते नुकसान हिंदुस्तानासच सोसू द्या. त्याबद्दल विलायतेतील पैही घेणे म्हणजे पातक आहे असे ते बोलले. ग्लॅडस्टनविषयी असेच म्हणत की, 'He brought to our debates a genius which compelled attention' आणि 'he was guided in all the steps he took, in all the efforts  that he made, by a high  moral ideal.' हेच गोखल्यांच्या बाबतीत अक्षरश: लागू पडते. त्यांच्या म्हणण्याचा विचार करण्याशिवाय गत्यंतर नसे. त्यांची टीका नैतिक पायावर अधिष्ठित असे. त्यांच्या कौन्सिलमधील व खासगीही भाषणांनी आपणास फार लाभ झाला असे मिंटो साहेबही म्हणतात:- 'I have had the honour to serve with Gokhale during the years I have been in India, to whom I have listened in the Imperial Legislative Council and to whom I am deeply indebted for the counsel and advice which he has so readily given and than whom no one was more capable of representing the interests of his country.'

ते दुस-याची खुशामत करीत नसत; आणि आपल्या लोकांवर कौन्सिलमध्ये कोणी निष्कारण शिंतोडा उडविला तर ते त्यास ताबडतोब उत्तर देत. एकदा जेंकिन्स साहेबांनी कौन्सिलमध्ये एतद्देशीय सभासदांबद्दल अपमानास्पद शब्द उच्चारले. त्याचा त्यांनी ताबडतोब उठून निषेध केला.

गोखल्यांच्या मृत्यूनंतर त्यांची रिकामी जागा जेव्हा सेटलवाड हे भरून काढणार असे जाहीर झाले तेव्हा केसरीत एक स्फुट आले होते. केसरीकार लिहितात, 'नामदार गोखले यांचे हातून वरिष्ठ कायदे- कौन्सिलातील काम इतक्या उत्कृष्ट रीतीने झाले याचे एक कारण त्यांची बुध्दिमत्ता हे तर आहेच. परंतु त्यांचे लक्ष जगाच्या बहुमतापेक्षा कर्तव्याकडे अधिक होते. हे कारण पहिल्याहून अधिक महत्त्वाचे आहे असे आम्हांस वाटते. कायदे-कौन्सिलातील काम इतक्या उत्कृष्ट रीतीने झाले याचे एक कारण त्यांची बुध्दिमत्ता हे तर आहेच. परंतु  त्यांचे लक्ष जगाच्या बहुमतापेक्षा कर्तव्याकडे अधिक होते. हे कारण पहिल्यापासून अधिक महत्त्वाचे आहे असे आम्हांस वाटते. कायदे- कौन्सिलात जाणे म्हणजो केवळ सरकारची मर्जी आपणावर बसावी यासाठी जावयाचे अशी त्यांची बुध्दी नव्हती.' हे उद्गार अक्षरश: खरे आहेत. मधावर ज्याप्रमाणे माशा बसतात, मुंग्या चिकटतात, त्याप्रमाणे मानाला भुलणारे गोखले नव्हते. केवळ सरकारची मोहबत आपणावर व्हावी यासाठी धडपडणारे, लोकमताची पर्वा न करणारे, आणि कौन्सिलच्या बैठकीसही हजर न राहणारे या वर्गातले गोखले नव्हते. ते 'होयबा' नव्हते; अगर 'जी सरकार' करणारेही नव्हते. म्हणूनच त्यांच्या हातून कौन्सिलात अमोल कामगिरी घडली.

नामदार गोखले

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
नामदार गोखले-चरित्र 1 नामदार गोखले-चरित्र 2 नामदार गोखले-चरित्र 3 नामदार गोखले-चरित्र 4 नामदार गोखले-चरित्र 5 नामदार गोखले-चरित्र 6 नामदार गोखले-चरित्र 7 नामदार गोखले-चरित्र 8 नामदार गोखले-चरित्र 9 नामदार गोखले-चरित्र 10 नामदार गोखले-चरित्र 11 नामदार गोखले-चरित्र 12 नामदार गोखले-चरित्र 13 नामदार गोखले-चरित्र 14 नामदार गोखले-चरित्र 15 नामदार गोखले-चरित्र 16 नामदार गोखले-चरित्र 17 नामदार गोखले-चरित्र 18 नामदार गोखले-चरित्र 19 नामदार गोखले-चरित्र 20 नामदार गोखले-चरित्र 21 नामदार गोखले-चरित्र 22 नामदार गोखले-चरित्र 23 नामदार गोखले-चरित्र 24 नामदार गोखले-चरित्र 25 नामदार गोखले-चरित्र 26 नामदार गोखले-चरित्र 27 नामदार गोखले-चरित्र 28 नामदार गोखले-चरित्र 29 नामदार गोखले-चरित्र 30 नामदार गोखले-चरित्र 31 नामदार गोखले-चरित्र 32 नामदार गोखले-चरित्र 33 नामदार गोखले-चरित्र 34 नामदार गोखले-चरित्र 35 नामदार गोखले-चरित्र 36 नामदार गोखले-चरित्र 37 नामदार गोखले-चरित्र 38 नामदार गोखले-चरित्र 39 नामदार गोखले-चरित्र 40 नामदार गोखले-चरित्र 41 नामदार गोखले-चरित्र 42 नामदार गोखले-चरित्र 43 नामदार गोखले-चरित्र 44 नामदार गोखले-चरित्र 45 नामदार गोखले-चरित्र 46 नामदार गोखले-चरित्र 47 नामदार गोखले-चरित्र 48 नामदार गोखले-चरित्र 49 नामदार गोखले-चरित्र 50 नामदार गोखले-चरित्र 51 नामदार गोखले-चरित्र 52 नामदार गोखले-चरित्र 53 नामदार गोखले-चरित्र 54 नामदार गोखले-चरित्र 55 नामदार गोखले-चरित्र 56 नामदार गोखले-चरित्र 57 नामदार गोखले-चरित्र 58 नामदार गोखले-चरित्र 59 नामदार गोखले-चरित्र 60 नामदार गोखले-चरित्र 61 नामदार गोखले-चरित्र 62 नामदार गोखले-चरित्र 63 नामदार गोखले-चरित्र 64 नामदार गोखले-चरित्र 65 नामदार गोखले-चरित्र 66 नामदार गोखले-चरित्र 67 नामदार गोखले-चरित्र 68 नामदार गोखले-चरित्र 69 नामदार गोखले-चरित्र 70 नामदार गोखले-चरित्र 71 नामदार गोखले-चरित्र 72 नामदार गोखले-चरित्र 73 नामदार गोखले-चरित्र 74 नामदार गोखले-चरित्र 75 नामदार गोखले-चरित्र 76 नामदार गोखले-चरित्र 77 नामदार गोखले-चरित्र 78 नामदार गोखले-चरित्र 79 नामदार गोखले-चरित्र 80 नामदार गोखले-चरित्र 81 नामदार गोखले-चरित्र 82 नामदार गोखले-चरित्र 83 नामदार गोखले-चरित्र 84 नामदार गोखले-चरित्र 85 नामदार गोखले-चरित्र 86 नामदार गोखले-चरित्र 87 नामदार गोखले-चरित्र 88 नामदार गोखले-चरित्र 89 नामदार गोखले-चरित्र 90 नामदार गोखले-चरित्र 91 नामदार गोखले-चरित्र 92 नामदार गोखले-चरित्र 93 नामदार गोखले-चरित्र 94 नामदार गोखले-चरित्र 95 नामदार गोखले-चरित्र 96 नामदार गोखले-चरित्र 97 नामदार गोखले-चरित्र 98 नामदार गोखले-चरित्र 99 नामदार गोखले-चरित्र 100 नामदार गोखले-चरित्र 101 नामदार गोखले-चरित्र 102 नामदार गोखले-चरित्र 103 नामदार गोखले-चरित्र 104 नामदार गोखले-चरित्र 105 नामदार गोखले-चरित्र 106 नामदार गोखले-चरित्र 107 नामदार गोखले-चरित्र 108 नामदार गोखले-चरित्र 109 नामदार गोखले-चरित्र 110 नामदार गोखले-चरित्र 111 नामदार गोखले-चरित्र 112 नामदार गोखले-चरित्र 113 नामदार गोखले-चरित्र 114 नामदार गोखले-चरित्र 115 नामदार गोखले-चरित्र 116 नामदार गोखले-चरित्र 117 नामदार गोखले-चरित्र 118 नामदार गोखले-चरित्र 119 नामदार गोखले-चरित्र 120 नामदार गोखले-चरित्र 121 नामदार गोखले-चरित्र 122 नामदार गोखले-चरित्र 123 नामदार गोखले-चरित्र 124 नामदार गोखले-चरित्र 125 नामदार गोखले-चरित्र 126 नामदार गोखले-चरित्र 127 नामदार गोखले-चरित्र 128 नामदार गोखले-चरित्र 129 नामदार गोखले-चरित्र 130 नामदार गोखले-चरित्र 131 नामदार गोखले-चरित्र 132 नामदार गोखले-चरित्र 133 नामदार गोखले-चरित्र 134 नामदार गोखले-चरित्र 135 नामदार गोखले-चरित्र 136 नामदार गोखले-चरित्र 137 नामदार गोखले-चरित्र 138