Get it on Google Play
Download on the App Store

नामदार गोखले-चरित्र 108

टिळकांचे कार्य अशाच स्वरुपाचे होते. अगदी वेळेवर त्यांनी जनमनावर टोला हाणला व हृत्कपाटे फोडून आत प्रकाशाचा इतका जोराचा झोत सोडला की, मनातील सर्व किडे मरावे. अंत:करणाचा दरवाजा उघडून प्रकाशाने मनातील घाण नाहीशी करणे म्हणजे विघातक काम आहे काय? असेल तर तसलेच कार्य प्रथम पाहिजे. ज्या स्थितीत लोक समाधान मानीत होते, ती स्थिती खरी दु:खरूप आहे असे त्यांनी त्यास पटविले. 'आजूबाजूस चोहोंकडे टोळधाड आली आहे. निजता काय?' असा त्यांनी जोराने व सर्वांस स्पष्ट ऐकू जाईल अशा घनगर्जनेने इशारा दिला. नकली व खोटी संतोषवृत्ती लोक जी उराशी बाळगीत होते ती पार घालवून त्यांनी असंतोष निर्माण केला. संतोष असेल तर मनुष्य काहीएक करणार नाही. जो संतोष म्हणून मानण्यात येतो तो वस्तूत: बेगडी संतोष होय. तुम्ही प्रेतास जीव म्हणून कवटाळीत आहा हे जेव्हा लोकांना आपण पटवून देऊ तेव्हा ते उठतील. नवीन उद्योगास- अन्य कार्यास प्रवृत्त होतील. 'असंतोष: श्रियो मूलम' गोखले जर सुशिक्षित लोकांस उद्योग करा, देशाची स्थिती पहा असे न सांगते तर सुशिक्षितांस कशासाठी प्रयत्न करावयाचा हेच कोडे पडले असते. शिवाय सरकारजवळ सनदशीरपणाने हक्क मागण्यासाठी सर्व जनतेचा आपणास पाठिंबा पाहिजे. मवाळांचे किंवा नेमस्तांचे चुकते ते येथेच. ते चार सुशिक्षितांस उपदेश करितील; व्याख्याने देतील; नाही तर विलायतेत मुत्सद्दयांच्या मांडीशी मांडी लावण्याची लग्नघाई करतील. परंतु देशातील किती लोक स्वराज्य मागत आहेत असा प्रश्न जर प्रतिपक्षाकडून आला तर मूठभर सुशिक्षित लोक हे उत्तर देणे भाग पडते. ज्यांस साग्र वाचून देशाची स्थिती जाणता येते त्यांच्यासाठी हे प्रयत्न नव्हते. तर खेड्यापाड्यात राहणारे मावळ हेटकरी यांच्यासाठी हे प्रयत्न होते; कारण या लोकांना काही तरी भव्य, भडक पाहिजे असते. सर्व जनतेला शिकविण्यासाठी केसरी होता; केवळ नवीन विचारांच्या सुशिक्षितांस शिकविण्यासाठी नव्हता. आणि यामुळे टिळकांस सामाजिक बाबीत काही लिहिता येत नसे. जनमनात त्यांनी असंतोषाचे बीज पेरले हेच त्यांचे महत्त्वाचे देशकार्य होय. जो चिरोल साहेबांच्या मते दोष तेच टिळकांचे आयुष्य-कार्य होय. आणि याच्यावरच सर्व इमारत उठवावयाची असते. गोखल्यांचे काम 'आधी कळस मग पाया रे' अशा तऱ्हेचे होते! टिळकांनी पाया तयार केला. पाया जितका भक्कम असेल तितकी भव्य व टोलेजंग इमारत त्यावर उभारता येईल. पाया लहान बेताबाताचा असेल तर लहानशी बंगली बांधली म्हणजे झाले. लोकांच्या आकांक्षा व इच्छा पराकोटीस नेऊन पोचविल्या पाहिजेत. आपल्या देशास स्वत:चा कारभार चालविण्याचे सर्व हक्क पाहिजेत, असे म्हणण्यापर्यंत जनमनाला टिळकांनी ताणले. येवढा ताण बसतो तेव्हाच काही तरी होते. शंभर मार्कांची तयारी करावी, तेव्हा कोठे चाळीस पन्नास मिळतात. लोकांस जर आपणच सांगू लागलो, की सध्या हे दोन हक्क घेऊन तृप्त व्हा. तर मग का? छे! छे!! अतृप्त राहणे हेच पारतंत्र्यातील राष्ट्रास शिकवावे लागते. विशेषत: आपल्या राष्ट्रास तर हे शिकविणे फारच अगत्याचे आहे. परदेशात जाऊन काम करणा-यास स्वत:चा देश पाठीशी पाहिजे असतो. तो उभा करण्याचे काम टिळकांनी अंगावर घेतले होते.

काम करण्यासाठी योजावयाच्या या दोघांच्या भाषेतही फरक असे. टिळक अशक्य- त्यांस कदाचित ते शक्य दिसत असेल तर कोणास ठाऊक?- असे लिहीत व बोलत. गोखले अशक्य किंवा वावगा एक शब्दही बोलावयाचे नाहीत. हिंदुस्तान रिह्यू म्हणतो :- 'It is not the wordy ideals and impossible programmes of men of weak judgement and unrestrained emotion, but the carefully thought out ideas and proposals of powerful intellects and selfless patriots like Mr. Gokhale, whose emotion is restrained by his intellect at the same time that his intellect is tempered by his emotions that have to be deeply pondered over and acted upon by the younger generation among Indian public men.' गोखल्यांच्या मध्ये विचार व आवेश यांचा रमणीय संगम झाला होता. एकमेकांमुळे एकमेकांस शोभा आली होती. सरकारच्या पुढेही निरनिराळे कार्यक्रम, सूचना गोखले मांडावयाचे. टिळक सडेतोड असत; गोखले सावरून बोलत. याचे कारण स्वभावभेद होय. टिळकांचा स्वभाव तल्लख; संताप व आवेश त्यांच्या अंगात ताबडतोब संचारत. त्यांच्या आठवणीत अशा अनेक गोष्टी आहेत की जेव्हा सरकारच्या एखाद्या क्रूर कृत्याची हकीकत ते ऐकत तेव्हा चवताळून 'आमच्यात जोरच नाही का?' असे ताडकन बोलत. खरोखरच ते सिंह होते. भीती त्यांस शिवतही नसे. दुस-यावर टीका करण्यात सुध्दा त्यांचा असाच स्वभाव होता. ते स्वत: जात्या कठोर व तत्त्वप्रधान होते.

नामदार गोखले

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
नामदार गोखले-चरित्र 1 नामदार गोखले-चरित्र 2 नामदार गोखले-चरित्र 3 नामदार गोखले-चरित्र 4 नामदार गोखले-चरित्र 5 नामदार गोखले-चरित्र 6 नामदार गोखले-चरित्र 7 नामदार गोखले-चरित्र 8 नामदार गोखले-चरित्र 9 नामदार गोखले-चरित्र 10 नामदार गोखले-चरित्र 11 नामदार गोखले-चरित्र 12 नामदार गोखले-चरित्र 13 नामदार गोखले-चरित्र 14 नामदार गोखले-चरित्र 15 नामदार गोखले-चरित्र 16 नामदार गोखले-चरित्र 17 नामदार गोखले-चरित्र 18 नामदार गोखले-चरित्र 19 नामदार गोखले-चरित्र 20 नामदार गोखले-चरित्र 21 नामदार गोखले-चरित्र 22 नामदार गोखले-चरित्र 23 नामदार गोखले-चरित्र 24 नामदार गोखले-चरित्र 25 नामदार गोखले-चरित्र 26 नामदार गोखले-चरित्र 27 नामदार गोखले-चरित्र 28 नामदार गोखले-चरित्र 29 नामदार गोखले-चरित्र 30 नामदार गोखले-चरित्र 31 नामदार गोखले-चरित्र 32 नामदार गोखले-चरित्र 33 नामदार गोखले-चरित्र 34 नामदार गोखले-चरित्र 35 नामदार गोखले-चरित्र 36 नामदार गोखले-चरित्र 37 नामदार गोखले-चरित्र 38 नामदार गोखले-चरित्र 39 नामदार गोखले-चरित्र 40 नामदार गोखले-चरित्र 41 नामदार गोखले-चरित्र 42 नामदार गोखले-चरित्र 43 नामदार गोखले-चरित्र 44 नामदार गोखले-चरित्र 45 नामदार गोखले-चरित्र 46 नामदार गोखले-चरित्र 47 नामदार गोखले-चरित्र 48 नामदार गोखले-चरित्र 49 नामदार गोखले-चरित्र 50 नामदार गोखले-चरित्र 51 नामदार गोखले-चरित्र 52 नामदार गोखले-चरित्र 53 नामदार गोखले-चरित्र 54 नामदार गोखले-चरित्र 55 नामदार गोखले-चरित्र 56 नामदार गोखले-चरित्र 57 नामदार गोखले-चरित्र 58 नामदार गोखले-चरित्र 59 नामदार गोखले-चरित्र 60 नामदार गोखले-चरित्र 61 नामदार गोखले-चरित्र 62 नामदार गोखले-चरित्र 63 नामदार गोखले-चरित्र 64 नामदार गोखले-चरित्र 65 नामदार गोखले-चरित्र 66 नामदार गोखले-चरित्र 67 नामदार गोखले-चरित्र 68 नामदार गोखले-चरित्र 69 नामदार गोखले-चरित्र 70 नामदार गोखले-चरित्र 71 नामदार गोखले-चरित्र 72 नामदार गोखले-चरित्र 73 नामदार गोखले-चरित्र 74 नामदार गोखले-चरित्र 75 नामदार गोखले-चरित्र 76 नामदार गोखले-चरित्र 77 नामदार गोखले-चरित्र 78 नामदार गोखले-चरित्र 79 नामदार गोखले-चरित्र 80 नामदार गोखले-चरित्र 81 नामदार गोखले-चरित्र 82 नामदार गोखले-चरित्र 83 नामदार गोखले-चरित्र 84 नामदार गोखले-चरित्र 85 नामदार गोखले-चरित्र 86 नामदार गोखले-चरित्र 87 नामदार गोखले-चरित्र 88 नामदार गोखले-चरित्र 89 नामदार गोखले-चरित्र 90 नामदार गोखले-चरित्र 91 नामदार गोखले-चरित्र 92 नामदार गोखले-चरित्र 93 नामदार गोखले-चरित्र 94 नामदार गोखले-चरित्र 95 नामदार गोखले-चरित्र 96 नामदार गोखले-चरित्र 97 नामदार गोखले-चरित्र 98 नामदार गोखले-चरित्र 99 नामदार गोखले-चरित्र 100 नामदार गोखले-चरित्र 101 नामदार गोखले-चरित्र 102 नामदार गोखले-चरित्र 103 नामदार गोखले-चरित्र 104 नामदार गोखले-चरित्र 105 नामदार गोखले-चरित्र 106 नामदार गोखले-चरित्र 107 नामदार गोखले-चरित्र 108 नामदार गोखले-चरित्र 109 नामदार गोखले-चरित्र 110 नामदार गोखले-चरित्र 111 नामदार गोखले-चरित्र 112 नामदार गोखले-चरित्र 113 नामदार गोखले-चरित्र 114 नामदार गोखले-चरित्र 115 नामदार गोखले-चरित्र 116 नामदार गोखले-चरित्र 117 नामदार गोखले-चरित्र 118 नामदार गोखले-चरित्र 119 नामदार गोखले-चरित्र 120 नामदार गोखले-चरित्र 121 नामदार गोखले-चरित्र 122 नामदार गोखले-चरित्र 123 नामदार गोखले-चरित्र 124 नामदार गोखले-चरित्र 125 नामदार गोखले-चरित्र 126 नामदार गोखले-चरित्र 127 नामदार गोखले-चरित्र 128 नामदार गोखले-चरित्र 129 नामदार गोखले-चरित्र 130 नामदार गोखले-चरित्र 131 नामदार गोखले-चरित्र 132 नामदार गोखले-चरित्र 133 नामदार गोखले-चरित्र 134 नामदार गोखले-चरित्र 135 नामदार गोखले-चरित्र 136 नामदार गोखले-चरित्र 137 नामदार गोखले-चरित्र 138