Get it on Google Play
Download on the App Store

नामदार गोखले-चरित्र 101

अखेर

गोखले यावेळेस आजारी होते. या भांडणांचा त्यांना जास्त वीट आला असेल. त्यांनी हे सर्व सरळ दृष्टीने केले असेल; पुढे धोके येऊ नयेत म्हणून केले असेल; परंतु त्यायोगे नुकत्याच कष्टद स्थितीतून आलेल्या वीराचे हृदय दुखविले गेले आणि गोखल्यांच्या अनुयायांनी तर क्रौर्याची सीमाच केली. त्यांनी टीकेची परमावधी केली. टिळकांच्या गैरहजेरीत आपल्या मोह-यावर झालेल्या अश्लील टीकेचा सूडच ते टिळकांवर घेत आहेत असे वाटले, परंतु त्या वेळेस टिळक गैरहजर होते. ते सरकारचा पाहुणचार घेत होते; ते स्वातंत्र्यमंदिरात- कारागृहात होते. म्हणून आपल्या अनुयायांस आवरणे त्यांना शक्य नव्हते. परंतु या वेळेस गोखले आजारी असले तरी आपल्या अनुयायांना त्यांनी आवरले पाहिजे होते. परंतु ते त्यांच्याकडून झाले नाही असे दिसते; असो.

महाराष्ट्रात पुन: खडाजंगी होईल का? आता जगात लढाईस सुरुवात झाली आहे. अशा नाजूक प्रसंगी देशात बंडाची प्रवृत्ती तर नाही होणार असाही त्यांस संशय आला असेल! देशाचे कसे होईल? ही नौका पैलतीराला सुरक्षित जाऊन पोहोचेल, का खडकावर आदळून शतश: विदीर्ण होईल त्याची त्यांस चिंता लागून राहिली असावी. ते खंगत चालले होते. अनंत श्रमांनी थकलेल्या त्यांच्या देहाला जास्तच थकवा आला. आता त्यांस विशेष श्रम होत नसत. रात्रीच्या वेळी मनाची करमणूक व्हावी म्हणून त्यांची मित्रमंडळी पत्ते वगैरे खेळावयास जमत. हेतू हा की त्यायोगे तरी  त्रासलेल्या जीवास विरंगुळा व्हावा. एक दिवस सहज खेळताना त्यांचे आप्त दत्तोपंत वेलणकर त्यांस म्हणाले : 'ज्या पत्रामुळे येवढे रण माजून राहिले आहे ते करा ना एकदा प्रसिध्द!' तेव्हा गोखले म्हणाले : 'मी जर ते प्रसिध्द केले तर टिळकांवर जास्तच गहजब होईल, व ते जास्तच अडचणीत सापडतील. पत्र प्रसिध्द करावयाचे, की नाही ते मला समजते. तुम्हांला तितका डावपेच, मुत्सद्देगिरी माहीत नाही. ('You have no political wisdom') अशा रीतीने दिवस चालले. शरीर रोडावत चालले. गोखल्यांची अंगलट साधारण ब-यापैकी होती. त्यांचा वर्ण गौर असून चेह-यावर एक प्रकारचे मार्दव असे. डोळ्यांत स्निग्धता व पावित्र्य असे. त्यांची मूर्ती मोहक होती; टिळकांप्रमाणे भेदक नव्हती. त्यांची रमणीय देहयष्टी आता सुकत चालली. तेज हरपले; रक्त आटले; मांस नाहीसे झाले. अशा रीतीने गोखले शरपंजरी असता १२ फेब्रुवारीस गांधीजी पुण्यास आले. १९१४ मध्ये इंग्लंडमध्ये गोखले आजारी असतानाही गांधीजी आपल्या गुरूस भेटण्यास आफ्रिकेतून तातडीने तेथे गेले होते. गांधी पायात काही न घालता तेथे त्यांच्या भेटीस येत. परंतु गोखल्यांनी निर्वाणीने 'थंडी आहे, पायात बूट व मोजे घालीत जा.' असे जेव्हा सांगितले तेव्हा ते घालू लागले. गोपाळरावांबद्दल गांधींस केवढा आदर व प्रेम वाटे!

गांधीजींचे पुण्यात टोलेजंग स्वागत झाले. त्यांस भारतसेवक समाजातही आमंत्रण देण्यात आले होते. गांधी समाजाच्या ठिकाणी गेले. त्यांस फलाहार देण्यात आला. ते यावयाच्या आधीच गोखले यांस जबर मर्च्छना आली होती. गांधीजींनी तेथील प्रचंड लायब्ररी पाहिली आणि ते विस्मित झाले. ते म्हणाले, 'अगदी निवडक ५-५० पुस्तके ठेवावी; हे भाराभार ग्रंथ कशासाठी?' गांधीजींचे मार्ग निराळे; मते निराळी. देशसेवा हे दोघांचे ध्येय, येवढीच उभयतात साम्यता! आपल्या पाठीमागे गांधीजी हे भारतसेवक समाजाचे पहिले मेंबर, प्रणेते, अध्यक्ष व्हावे अशी गोखल्यांची फार  इच्छा होती. पण गांधीजी तयार होईनात. शेवटी गोपाळराव म्हणाले, 'तुम्ही देशात सर्वत्र हिंडा; देशस्थिती अजमावा आणि तुमची काय मते होतील ती पाहा. जर तुमची मते सोसायटीच्या मताशी जुळली तरच तुम्ही अध्यक्ष व्हा.' गांधीजींनी देशभर दौरा काढण्याचे ठरविले. आणि गोखल्यांचा निरोप घेऊन ते निघून गेले.

गोपाळराव नुकतेच मर्च्छनेतून उठले होते. यामुळे आता डॉक्टरांस त्यांची विशेष काळजी वाटू लागली. त्यांचा रोजचा कार्यक्रम चालूच होता. बुधवारी १७ तारखेस रात्रौ त्यांनी एक महत्त्वाचे लिखाण संपविले. हा राजकीय हक्कांचा मसुदा होता व तो ना. आगाखानांनी पुढे प्रसिध्द केला. गुरुवारी त्यांनी सर्वांस पत्रे लिहिली. शुक्रवारी सकाळी त्यांची प्रकृती जास्त ढासळली आहे असे डॉक्टरांस दिसले. स्वत: गोपाळरावांस वाटू लागले, की आपण आता चारदोन तासांचेच सोबती आहो. कुटुंबातली सर्व मंडळी बिछान्यासभोवती जमली होती. मित्रमंडळीही खिन्न वदनाने बसली होती. दोनतीन दिवसांपूर्वीचीच गोष्ट. ते हरिभाऊ आपट्यांजवळ मरणासंबंधी बोलत होते. हरिभाऊ त्यांचे परमस्त्रेही. 'तुम्हास आजपर्यंत कोणाच्या मृत्यूने विशेष दु:ख झाले?' हरिभाऊंस गोपाळरावांनी विचारले. 'माझ्या मुलीच्या मृत्यूने' असे हरिभाऊ म्हणाले. गोपाळराव म्हणाले, 'एखाद्या स्नेह्याचे नाव सांगा.' हरिभाऊंनी माधवराव नामजोशी यांचे नाव सांगितले. हरिभाऊंस आपल्या मरणाने लवकरच दु:ख होईल या हेतूने ते बोलत होते.

नामदार गोखले

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
नामदार गोखले-चरित्र 1 नामदार गोखले-चरित्र 2 नामदार गोखले-चरित्र 3 नामदार गोखले-चरित्र 4 नामदार गोखले-चरित्र 5 नामदार गोखले-चरित्र 6 नामदार गोखले-चरित्र 7 नामदार गोखले-चरित्र 8 नामदार गोखले-चरित्र 9 नामदार गोखले-चरित्र 10 नामदार गोखले-चरित्र 11 नामदार गोखले-चरित्र 12 नामदार गोखले-चरित्र 13 नामदार गोखले-चरित्र 14 नामदार गोखले-चरित्र 15 नामदार गोखले-चरित्र 16 नामदार गोखले-चरित्र 17 नामदार गोखले-चरित्र 18 नामदार गोखले-चरित्र 19 नामदार गोखले-चरित्र 20 नामदार गोखले-चरित्र 21 नामदार गोखले-चरित्र 22 नामदार गोखले-चरित्र 23 नामदार गोखले-चरित्र 24 नामदार गोखले-चरित्र 25 नामदार गोखले-चरित्र 26 नामदार गोखले-चरित्र 27 नामदार गोखले-चरित्र 28 नामदार गोखले-चरित्र 29 नामदार गोखले-चरित्र 30 नामदार गोखले-चरित्र 31 नामदार गोखले-चरित्र 32 नामदार गोखले-चरित्र 33 नामदार गोखले-चरित्र 34 नामदार गोखले-चरित्र 35 नामदार गोखले-चरित्र 36 नामदार गोखले-चरित्र 37 नामदार गोखले-चरित्र 38 नामदार गोखले-चरित्र 39 नामदार गोखले-चरित्र 40 नामदार गोखले-चरित्र 41 नामदार गोखले-चरित्र 42 नामदार गोखले-चरित्र 43 नामदार गोखले-चरित्र 44 नामदार गोखले-चरित्र 45 नामदार गोखले-चरित्र 46 नामदार गोखले-चरित्र 47 नामदार गोखले-चरित्र 48 नामदार गोखले-चरित्र 49 नामदार गोखले-चरित्र 50 नामदार गोखले-चरित्र 51 नामदार गोखले-चरित्र 52 नामदार गोखले-चरित्र 53 नामदार गोखले-चरित्र 54 नामदार गोखले-चरित्र 55 नामदार गोखले-चरित्र 56 नामदार गोखले-चरित्र 57 नामदार गोखले-चरित्र 58 नामदार गोखले-चरित्र 59 नामदार गोखले-चरित्र 60 नामदार गोखले-चरित्र 61 नामदार गोखले-चरित्र 62 नामदार गोखले-चरित्र 63 नामदार गोखले-चरित्र 64 नामदार गोखले-चरित्र 65 नामदार गोखले-चरित्र 66 नामदार गोखले-चरित्र 67 नामदार गोखले-चरित्र 68 नामदार गोखले-चरित्र 69 नामदार गोखले-चरित्र 70 नामदार गोखले-चरित्र 71 नामदार गोखले-चरित्र 72 नामदार गोखले-चरित्र 73 नामदार गोखले-चरित्र 74 नामदार गोखले-चरित्र 75 नामदार गोखले-चरित्र 76 नामदार गोखले-चरित्र 77 नामदार गोखले-चरित्र 78 नामदार गोखले-चरित्र 79 नामदार गोखले-चरित्र 80 नामदार गोखले-चरित्र 81 नामदार गोखले-चरित्र 82 नामदार गोखले-चरित्र 83 नामदार गोखले-चरित्र 84 नामदार गोखले-चरित्र 85 नामदार गोखले-चरित्र 86 नामदार गोखले-चरित्र 87 नामदार गोखले-चरित्र 88 नामदार गोखले-चरित्र 89 नामदार गोखले-चरित्र 90 नामदार गोखले-चरित्र 91 नामदार गोखले-चरित्र 92 नामदार गोखले-चरित्र 93 नामदार गोखले-चरित्र 94 नामदार गोखले-चरित्र 95 नामदार गोखले-चरित्र 96 नामदार गोखले-चरित्र 97 नामदार गोखले-चरित्र 98 नामदार गोखले-चरित्र 99 नामदार गोखले-चरित्र 100 नामदार गोखले-चरित्र 101 नामदार गोखले-चरित्र 102 नामदार गोखले-चरित्र 103 नामदार गोखले-चरित्र 104 नामदार गोखले-चरित्र 105 नामदार गोखले-चरित्र 106 नामदार गोखले-चरित्र 107 नामदार गोखले-चरित्र 108 नामदार गोखले-चरित्र 109 नामदार गोखले-चरित्र 110 नामदार गोखले-चरित्र 111 नामदार गोखले-चरित्र 112 नामदार गोखले-चरित्र 113 नामदार गोखले-चरित्र 114 नामदार गोखले-चरित्र 115 नामदार गोखले-चरित्र 116 नामदार गोखले-चरित्र 117 नामदार गोखले-चरित्र 118 नामदार गोखले-चरित्र 119 नामदार गोखले-चरित्र 120 नामदार गोखले-चरित्र 121 नामदार गोखले-चरित्र 122 नामदार गोखले-चरित्र 123 नामदार गोखले-चरित्र 124 नामदार गोखले-चरित्र 125 नामदार गोखले-चरित्र 126 नामदार गोखले-चरित्र 127 नामदार गोखले-चरित्र 128 नामदार गोखले-चरित्र 129 नामदार गोखले-चरित्र 130 नामदार गोखले-चरित्र 131 नामदार गोखले-चरित्र 132 नामदार गोखले-चरित्र 133 नामदार गोखले-चरित्र 134 नामदार गोखले-चरित्र 135 नामदार गोखले-चरित्र 136 नामदार गोखले-चरित्र 137 नामदार गोखले-चरित्र 138