नामदार गोखले-चरित्र 71
आपण नवीन जगात शिरत आहो. नवीन जगात येताना, नवीन कल्पना ग्रहण करिताना आपणास किंमतही जबर द्यावी लागणार आहे. औद्योगिक, व्यापारविषयक, अथवा शैक्षणिक व्यापारविषयक कोणतीची चळवळ असो, आपल्या प्रत्येक चळवळीत आपल्या प्रत्येक चळवळीत शिस्त, स्वार्थत्याग व कुशलता हे गुण प्रामुख्याने चमकले पाहिजेत. हे गुण नसल्यामुळेच आपणास अपयश येते. पुष्कळ वेळी आपणात सचोटी नाही असेही दिसून येते. गीतेत सांगितल्याप्रमाणे 'योग: कर्मसु कौशलम' योग्य त-हेने, कुशलतेने आपले कार्य तडीस नेणे म्हणजेच योगाचरण करणे होय. परंतु ही गोष्ट अद्याप आपणांस साधत नाही. या गोष्टी व त्यांच्या जोडीला आपणांस 'अधोध:' नेणा-या दुस-या शेकडो गोष्टी आहेत. डोळे उघडे ठेवावे, मन निर्विकार करून विचार करावा म्हणजे ही कारणे दिसून येतील.
आपणांवर विपत्ती कोसळत आहे. यामुळे गोखले खचून जात नसत किंवा निराश होत नसत; निराश होणे त्यांना माहीतच नव्हते. आपण हालअपेष्टांतूनच पुढे गेले पाहिजे. मोठ्या कष्टाने, श्रमाने जे आपण मिळवू त्यालाच किंमत आहे. आपली मिळकत ''Hollowed by sacrifice and Sanctified by suffering.''अशी असावी. वसाहतींचा दर्जा प्राप्त करून घेणे हे आपले ध्येय आहे, आणि सर्व सनदशीर मार्गांनी आपण ते मिळविण्यासाठी- हे ध्येय गाठण्यासाठी झटले पाहिजे.
वरीलप्रमाणे गोखल्यांनी आपल्या व्याख्यानांत ठिकठिकाणी उपदेश केला. टिळकांनीही या वेळेस आपणास 'वसाहतीचे स्वराज्य मिळवावयाचे आहे' असे लिहिले होते. अलाहाबादच्या व्याख्यानात गोखल्यांनी या गोष्टीचा आनंदाने उल्लेख केला. याच व्याख्यानात त्यांनी दुस-याही काही महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लख केला. याच व्याख्यानात त्यांनी दुस-याही काही महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख केला आहे. युध्द, परकी राष्ट्राबरोबर युध्दविषयक संधान, बंड आणि अत्याचार या चार गोष्टी वगळून जे काही आपण करू ते सर्व सनदशीर आहे. सरकारास अर्ज व विनंत्या करणे या गोष्टीपासून तो थेट कर न देणे या गोष्टीपर्यंत सर्व काही सनदशीर आहे. कर न देणे हे कायदेशीर आहे असे या व्याख्यानात गोखल्यांनी स्पष्टच म्हटले आहे. परंतु त्यांचे एक म्हणणे असे की Everything that was constitutional was not necessarily wise and expedient ' म्हणजे जे जे सनदशीर आहे ते ते सर्व शहाणपणाचे किंवा आज जरुरीचे आहे असे नाही. आम्हांस अमुक द्या असे सरकारला सांगण्यापेक्षा, प्रथम या सर्व कल्पनांचा जनतेत फैलाव केला पाहिजे. आपल्या मागे सर्व जनता उभी आहे असे सरकारला समजले पाहिजे म्हणजे मग आपल्या न्याय्य आकांक्षा सरकार अगदीच लाथाडील असे नाही.