Get it on Google Play
Download on the App Store

नामदार गोखले-चरित्र 58

'My Lord, in all civilized countries there is a well-under-stood and well- defined distinction between the Legislature and the Executive Government and the Legislative is regarded as higher than the Executive. In India unfortunately this distinction for the most part is of only a nominal character; for, with the present constitution of the Councils, the Executive Government can get what law they please passed by the  Legislative without the slightest difficult.  I submit, however, that it is not desirable, it is not wise, that this fact should be forced on the attention of the public in  so unpleasant a manner as on this occasion and I think the distinction becomes a farce if our legislature is to be thus at the   back and call of the Executive Government and if it is to be called upon to exercise its powers of legislation to remedy defects not in existing laws, but in executive action taken under those laws.''

गोखल्यांना या कौन्सिलांना फार्स म्हणावे लागले यातच या कौन्सिलांची रचना कशी आहे ते दिसते. सरकार नाटक मात्र नीट करून दाखविते. ठराव आणावयाचा; गंभीरपणाचा आव दाखवावयाचा; परिस्थितीचे भेसूर चित्र रेखाटावयाचे; लोकांचे कल्याण आहे हा मंत्र त्यात असावयाचा आणि हे सर्व 'शांति: शांति: शांति:'साठी आहे असे म्हणून कायदा पास करून टाकावयाचा. सरकारचे नाटक गोखल्यांच्या वरील भाषणावरून त्यांस समजत असे असे दिसते. पुन: पुन: सरकारास- मंद प्रकृतीच्या सरकारास जागे करण्यासाठी कानी कपाळी ओरडावयाचे. परंतु झोपेचे सोंग घेणा-यापुढे ओरडून काय होणार! त्यास चिमटे घेतले पाहिजेत असे म्हणणारा राष्ट्रीय पक्ष हिंदुस्तानात पुढे येत होता.

१९०५ साल म्हणजे गोखल्यांवर कामांचा डोंगर पाडणारे वर्ष होय. कौन्सिलच्या बैठकीचे दरवर्षाचे काम त्यांना करावे लागलेच. परंतु त्या बरोबर कित्येक नवीन कामे उत्पन्न झाली होती. त्या वर्षी त्यांस पुणे म्युनिसिपालिटीचे अध्यक्ष निवडण्यात आले. तेथेहि त्यांनी पुष्कळ सुधारणा केल्या. इंग्लंडात चालू असलेले जे इंडिया पत्र त्याला हिंदुस्तानात वर्गणीदार मिळवून देण्याचे काम त्यांनी आपल्या शिरावर घेतले होते. रानडे यांच्या स्मारकासाठी फंड गोळा करावयाचा होता. याच सुमारास म्हणजे १२ जून १९५० रोजी त्यांनी भारत सेवक समाज स्थापन केला. या समाजाचे जे पहिले सभासद होणार होते त्यांचा शपथविधी या दिवशी झाला. या समाजाची घटना कशी असावी, कायदे, नियम कोणते असावे, याची वाटाघाट पुढे दोन वर्षांनी करण्यात आली. सध्या मनात जी कल्पना घोळत होती तिला त्यांनी थोडे मूर्त स्वरूप देण्याचा उपक्रम केला. परंतु या सर्व कामांपेक्षा एक जास्त जबाबदारीचे काम त्यांच्यावर सोपविण्यात आले. ते म्हणजे इंग्लंडमध्ये शिष्टमंडळात जावयाचे.

नामदार गोखले

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
नामदार गोखले-चरित्र 1 नामदार गोखले-चरित्र 2 नामदार गोखले-चरित्र 3 नामदार गोखले-चरित्र 4 नामदार गोखले-चरित्र 5 नामदार गोखले-चरित्र 6 नामदार गोखले-चरित्र 7 नामदार गोखले-चरित्र 8 नामदार गोखले-चरित्र 9 नामदार गोखले-चरित्र 10 नामदार गोखले-चरित्र 11 नामदार गोखले-चरित्र 12 नामदार गोखले-चरित्र 13 नामदार गोखले-चरित्र 14 नामदार गोखले-चरित्र 15 नामदार गोखले-चरित्र 16 नामदार गोखले-चरित्र 17 नामदार गोखले-चरित्र 18 नामदार गोखले-चरित्र 19 नामदार गोखले-चरित्र 20 नामदार गोखले-चरित्र 21 नामदार गोखले-चरित्र 22 नामदार गोखले-चरित्र 23 नामदार गोखले-चरित्र 24 नामदार गोखले-चरित्र 25 नामदार गोखले-चरित्र 26 नामदार गोखले-चरित्र 27 नामदार गोखले-चरित्र 28 नामदार गोखले-चरित्र 29 नामदार गोखले-चरित्र 30 नामदार गोखले-चरित्र 31 नामदार गोखले-चरित्र 32 नामदार गोखले-चरित्र 33 नामदार गोखले-चरित्र 34 नामदार गोखले-चरित्र 35 नामदार गोखले-चरित्र 36 नामदार गोखले-चरित्र 37 नामदार गोखले-चरित्र 38 नामदार गोखले-चरित्र 39 नामदार गोखले-चरित्र 40 नामदार गोखले-चरित्र 41 नामदार गोखले-चरित्र 42 नामदार गोखले-चरित्र 43 नामदार गोखले-चरित्र 44 नामदार गोखले-चरित्र 45 नामदार गोखले-चरित्र 46 नामदार गोखले-चरित्र 47 नामदार गोखले-चरित्र 48 नामदार गोखले-चरित्र 49 नामदार गोखले-चरित्र 50 नामदार गोखले-चरित्र 51 नामदार गोखले-चरित्र 52 नामदार गोखले-चरित्र 53 नामदार गोखले-चरित्र 54 नामदार गोखले-चरित्र 55 नामदार गोखले-चरित्र 56 नामदार गोखले-चरित्र 57 नामदार गोखले-चरित्र 58 नामदार गोखले-चरित्र 59 नामदार गोखले-चरित्र 60 नामदार गोखले-चरित्र 61 नामदार गोखले-चरित्र 62 नामदार गोखले-चरित्र 63 नामदार गोखले-चरित्र 64 नामदार गोखले-चरित्र 65 नामदार गोखले-चरित्र 66 नामदार गोखले-चरित्र 67 नामदार गोखले-चरित्र 68 नामदार गोखले-चरित्र 69 नामदार गोखले-चरित्र 70 नामदार गोखले-चरित्र 71 नामदार गोखले-चरित्र 72 नामदार गोखले-चरित्र 73 नामदार गोखले-चरित्र 74 नामदार गोखले-चरित्र 75 नामदार गोखले-चरित्र 76 नामदार गोखले-चरित्र 77 नामदार गोखले-चरित्र 78 नामदार गोखले-चरित्र 79 नामदार गोखले-चरित्र 80 नामदार गोखले-चरित्र 81 नामदार गोखले-चरित्र 82 नामदार गोखले-चरित्र 83 नामदार गोखले-चरित्र 84 नामदार गोखले-चरित्र 85 नामदार गोखले-चरित्र 86 नामदार गोखले-चरित्र 87 नामदार गोखले-चरित्र 88 नामदार गोखले-चरित्र 89 नामदार गोखले-चरित्र 90 नामदार गोखले-चरित्र 91 नामदार गोखले-चरित्र 92 नामदार गोखले-चरित्र 93 नामदार गोखले-चरित्र 94 नामदार गोखले-चरित्र 95 नामदार गोखले-चरित्र 96 नामदार गोखले-चरित्र 97 नामदार गोखले-चरित्र 98 नामदार गोखले-चरित्र 99 नामदार गोखले-चरित्र 100 नामदार गोखले-चरित्र 101 नामदार गोखले-चरित्र 102 नामदार गोखले-चरित्र 103 नामदार गोखले-चरित्र 104 नामदार गोखले-चरित्र 105 नामदार गोखले-चरित्र 106 नामदार गोखले-चरित्र 107 नामदार गोखले-चरित्र 108 नामदार गोखले-चरित्र 109 नामदार गोखले-चरित्र 110 नामदार गोखले-चरित्र 111 नामदार गोखले-चरित्र 112 नामदार गोखले-चरित्र 113 नामदार गोखले-चरित्र 114 नामदार गोखले-चरित्र 115 नामदार गोखले-चरित्र 116 नामदार गोखले-चरित्र 117 नामदार गोखले-चरित्र 118 नामदार गोखले-चरित्र 119 नामदार गोखले-चरित्र 120 नामदार गोखले-चरित्र 121 नामदार गोखले-चरित्र 122 नामदार गोखले-चरित्र 123 नामदार गोखले-चरित्र 124 नामदार गोखले-चरित्र 125 नामदार गोखले-चरित्र 126 नामदार गोखले-चरित्र 127 नामदार गोखले-चरित्र 128 नामदार गोखले-चरित्र 129 नामदार गोखले-चरित्र 130 नामदार गोखले-चरित्र 131 नामदार गोखले-चरित्र 132 नामदार गोखले-चरित्र 133 नामदार गोखले-चरित्र 134 नामदार गोखले-चरित्र 135 नामदार गोखले-चरित्र 136 नामदार गोखले-चरित्र 137 नामदार गोखले-चरित्र 138