Get it on Google Play
Download on the App Store

पत्र पाचवे 4

जर्मनीनें कांही लाख ज्यू लोकांस बाहेर घालविलें. आपण आठ कोटी मुसलमानांस कसे बाहेर घालवणार? ते तर शेंकडो वर्षें घरेंदारें करुन येथें राहिले. हिंदुमुसलमान नव संस्कृति निर्मित होते. परस्पर प्रेमभाव शिकत होते. जर्मनीचें अनुकरण करणें म्हणजे वेडेपणा आहे. भारताची परिस्थिति निराळी, भारतीय राष्ट्राची परंपरा निराळी, इतिहास निराळा, आणि शेजा-यांस घालवण्यांत पुरुषार्थं नाही. त्यांच्याशीं मिळतें घेऊन सहकार्य करण्याची पराकाष्टा करणें यांत मोठेपणा आहे.

आपण मुसलमानांच्या शेजारी शेंकडों वर्षें रहात आहोंत. सहा हजार मैलांवरून आलेल्या इंग्रजांचे वाङमय आपण आत्मसात केलें. आपण इंग्रजीत बोलूंलिहूं. इंग्रजी ग्रंथातील उतारें देऊं. पाश्चिमात्य संस्कृति आपण पचनीं पाडली. मुसलमानबंधु इतकीं वर्षें आपल्याजवळ रहात आहेत, परंतु त्यांची भाषा शिकण्याची, त्यांची संस्कृति अभ्यासण्याची, त्यांच्या धर्मांतील चांगुलपणा पाहण्याची बुध्दि आपणांस झाली नाहीं. एक काळ असा होता कीं ज्या वेळेस हें आपण करीत होतो. हिंदुमुसलमान एकमेकांचे चांगले घेत होते. एकमेकांची भाषा बोलत होतो. परंतु ब्रिटिश आले आणि आपण परस्परांचे शत्रु बनलो. परसत्तेचे मात्र आपण पाय चाटीत बसलों.

मुसलमानी धर्म का केवळ वाईट? मुहंमद पैगंबरांचीहि आम्हीं कधीकधीं कुचेष्टा करतों. ज्या थोंर पुरुषानें वाळवंटातील लोकांत अशी ज्वाला पेटविली कीं जी क्षणांत स्पेनपासून चीनपर्यंत पसरली, तो पुरुष का क्षुद्र? तो पुरुष का रंगीला रसूल? जनता कोणाच्या भजनी लागते? जनता शील व चारित्र्य ओळखते. मुहंमद चारित्र्यहीन असते तर आज पंधराशें वर्षे पंचवीस तीस कोट लोक त्यांच्या नादीं कां राहतें? इंग्लंडमधींल विश्वविख्यात इतिहासकार गिबन यानें मुहंमदाची स्तुतिस्तोत्रें गायिलीं. गिबनला का कोणी लाच दिली होती? कार्लाईल या प्रसिध्द पंडिताने मुहंमदांवर स्तुतिसुमनांजलि वाहिली. कार्लाईलला का कळत नव्हतें?

मुहंमद पैगंबर एक ईश्वरी विभूति होते. त्यांना जेव्हां एकानें विचारलें, '' तुम्ही कांही चमत्कार करा. '' तेव्हां ते म्हणाले, '' वाळवंटात मधूनमधून झरे दिसतात. वाळवंटात गोड खजुरीचीं झाडें आढळतात. समुद्रावर लहानशा होडयाहि डौलानें नाचतात. माणसावरच्या प्रेमानें सायंकाळ होतांच त्यांची गाईगुरें घरीं परत येतात. असे हे चमत्कार सभोंवती भरले आहेत. आणि न शिकलेल्या मुहंमदांच्या तोंडून ईश्वर कुराण बोलवितो, हा का चमत्कार नाहीं? जग चमत्कारानें भरलेलें आहे. मी काय आणखी चमत्कार करूं?

मुहंमदांची राहणी साधीं. ते पाणी पीत व कोरडी भाकर खात. एकदां शत्रु त्यांच्या पाठीस लागला होता. मुंहमद थकून झाडाखाली झोपले. तो वैरी तेथें आला. त्यानें तलवार उपसली. मुहंमद जागे झाले. त्यांनी वै-याकडे पाहिलें. वै-याच्या हातची तलवार एकदम गळली. महंमदांनी ती झटकन उचलली व ते म्हणाले, '' आतां मी तुला मारु शकतों. परंतु मी मारीत नाहीं. जा. मला मारणा-याला मी प्रेम देतों. '' असें हें मुहंमदाचें अंतरंग.

श्यामची पत्रे

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
पत्र पहिले 1 पत्र पहिले 2 पत्र पहिले 3 पत्र पहिले 4 पत्र पहिले 5 पत्र पहिले 6 पत्र पहिले 7 पत्र दुसरे 1 पत्र दुसरे 2 पत्र दुसरे 3 पत्र दुसरे 4 पत्र दुसरे 5 पत्र दुसरे 6 पत्र दुसरे 7 पत्र दुसरे 8 पत्र तिसरे 1 पत्र तिसरे 2 पत्र तिसरे 3 पत्र तिसरे 4 पत्र तिसरे 5 पत्र तिसरे 6 पत्र तिसरे 7 पत्र तिसरे 8 पत्र तिसरे 9 पत्र चवथे 1 पत्र चवथे 2 पत्र चवथे 3 पत्र चवथे 4 पत्र चवथे 5 पत्र पाचवे 1 पत्र पाचवे 2 पत्र पाचवे 3 पत्र पाचवे 4 पत्र पाचवे 5 पत्र पाचवे 6 पत्र पाचवे 7 पत्र सहावे 1 पत्र सहावे 2 पत्र सहावे 3 पत्र सहावे 4 पत्र सहावे 5 पत्र सहावे 6 पत्र सातवे 1 पत्र सातवे 2 पत्र सातवे 3 पत्र सातवे 4 पत्र सातवे 5 पत्र सातवे 6 पत्र सातवे 7 पत्र आठवे 1 पत्र आठवे 2 पत्र आठवे 3 पत्र आठवे 4 पत्र आठवे 5 पत्र आठवे 6 पत्र आठवे 7 पत्र आठवे 8 पत्र आठवे 9 पत्र नववे 1 पत्र नववे 2 पत्र नववे 3 पत्र नववे 4 पत्र नववे 5 पत्र नववे 6 पत्र नववे 7 पत्र नववे 8 पत्र नववे 9 पत्र दहावे 1 पत्र दहावे 2 पत्र दहावे 3 पत्र दहावे 4 पत्र दहावे 5 पत्र दहावे 6 पत्र अकरावे 1 पत्र अकरावे 2 पत्र अकरावे 3 पत्र अकरावे 4 पत्र अकरावे 5 पत्र बारावे 1 पत्र बारावे 2 पत्र बारावे 3 पत्र बारावे 4 पत्र बारावे 5 पत्र बारावे 6 पत्र तेरावे 1 पत्र तेरावे 2 पत्र तेरावे 3 पत्र तेरावे 4 पत्र तेरावे 5 पत्र तेरावे 6 पत्र तेरावे 7 पत्र तेरावे 8 पत्र तेरावे 9 पत्र तेरावे 10 पत्र चवदावे 1 पत्र चवदावे 2 पत्र चवदावे 3 पत्र चवदावे 4 पत्र चवदावे 5 पत्र चवदावे 6 पत्र चवदावे 7