धडपडणारी मुले 126
नामदेव व रघुनाथ हे स्वामींबरोबर येऊ शकले नाहीत. नामदेवाचे रायबा जरा आजारी होते. रघुनाथला घरची व्यवस्था पाहावयाची होती. रघुनाथ आणश्रमांतहि जाई. गावांतील लोकांना सायंप्रार्थनेनंतर निरनिराळे विचार सांगे.
विचार सांगे. शेतकरी व कामकरी यांनी संघटना केली पाहिजे वैगरे गोष्टी तो बोले.
“अरे रघुनाथ ! हा इंग्रज काही बाबा जायचा नाही. घुसला तो कायमचा. आणील एक तोफ व देईल फुंकून सा-यांना,” गावांतील एक वृद्ध गृहस्थ म्हणाले.
“जी भाऊ! आपणांजवळ शस्त्रात्रे नाहीत ही गोष्ट खरी. परंतु म्हणून का हातपाय नाही चालवायचे ! सर्व हिदूस्थानावर संघटना झाली, जर निर्भयता आली, अपमानाचे मिंधे जिणे न जगण्याचा जनतेने निश्चय केला, तर सरकारी तोफा बंद पडतील. राष्ट्राच्या सर्वव्यापी संघाने स्वराज्य मिळेल. सारे हिदुस्थान इंग्रज का मारील ? त्यालाही जगायचे आहे. पस्तीस कोट लोकांचा आवाज कोण दडपील? जे सरकार कोट्यावधी लोकाच्या हृद्यांतील स्वात्रंत्र्याची ज्वाला दडपू पाहील, ते सरकार धुळीला मिळेल धडपड करीत मर्दासारखें उठले पाहिजे,” रघुनाथ सांगे.
“अरे सरकारापेक्षा सावकार छळतो. आपल्या गावचा शेतसारा चार हजार आहे, परंतु सावकाराचे व्याज त्यापेक्षा जास्त आहे. सावकार कसा दूर होणार ?” दुस-या एकाने विचारले.
“पोटापुरते खायला ठेवून मग सावकार व सरकार तृप्त करावे. आधी नीट जगले पाहिजे. आपण सरकार व सावकार यांना सांगितले पाहिजे, ‘महाराज ! तुमचे देणे आहे खरे. ते मी नाकबूल करीत नाही. परंतु ते देण्यासाठी मी जिवंत तर राहिले पाहिजे? मला आधी जगू दे. माझी पोरे बाळें जगू दे. उरले तर तुला दिल्याशिवाय राहणार नाही,’” रघुनाथ म्हणाला.
“जप्ती आणील, लिलाव करील,” पाटील म्हणाले.
“आपम एकजूट करून उठले पाहिजे. प्रयत्न हवा. हातपाय गाळून जी भाऊ कसे होईल?” रघुनाथ म्हणाला.
त्या दिवशी रघुनाथची आई त्याला म्हणाली, “रघुनाथ ! वेणूचे लग्न नको का करायला ? कोण बर पाहाणार, कोण काळजी करणार? ते इकडे ढूकूंनहि पाहात नाहीत. एकदा मध्ये आले होते. या घरांतून आम्हाला हाकलीत होते. परंतू पंचांनी समजूत घालून त्यांना लावून दिले.”