Get it on Google Play
Download on the App Store

भारतीय संस्कृती 110

भारतीय स्त्रिया ध्येये पाळणा-या आहेत. समाजात जी जी नवीन ध्येये उत्पन्न होतील ती ती स्त्रियांपर्यंत गेली पाहिजेत. तरच ती अमर होतील. गायीचे माहात्म्य भारतात उत्पन्न झाले, स्त्रियांनी ते टिकविले. शुचिर्भूतपणाचे तत्त्व उत्पन्न झाले, त्यांनी ते पराकोटीला नेले. पातिव्रत्याचे ध्येय निघाले, त्यात पराकाष्ठा केली. दारात कोणीही येवो, त्याला मूठभर दाणे घातल्याशिवाय त्या राहणार नाहीत. “कोणी देवही असेल रूप घेऊन आलेला!” असे त्या म्हणतील. एकीकडे शुचिर्भूतपणाच्या ध्येयामुळे सोवळेपणाची कमाल, तर दुसरीकडे देव सर्वत्र आहे या तत्वाचा- कोणीही दारात येवो त्याला मूठभर द्या, असे म्हणण्यात प्रत्यक्ष आचार. एकादशी वगैरे उपवास त्यांनीच ठेविले आहे. नदीवर स्नानास जाणे, यात्रा करणे यांची त्यांनाच हौस असते.

स्त्रिया ध्येये कदाचित निर्माण करणार नाहीत, परंतु ती निर्माण झाली की त्यांना मरूही देणार नाहीत. ज्याप्रमाणे पुरुष बाहेरून धान्य वगैरे माल आणतो, परंतु घरात तो सांभाळणे, तो सांडू न देणे, घाण होऊन देणे हे स्त्रियांचे काम असते, त्याप्रमाणे समाजात जी जी ध्येये निर्माण होतील ती ती मरू न देणे हे स्त्रियांचे काम असते. मुले आजारी पडली तर सांभाळणे हे मुख्यत्वे त्यांचेच काम; तद्वत ध्येयबाळेही सुरक्षित ठेवणे हे त्यांचेच काम.

पुरुष पोटच्या पोरांची उपेक्षा करील, परंतु स्त्री करणार नाही. त्याप्रमाणेच पुरुषांनी केलेली ध्येये पुरुष सोडू पाहील, परंतु स्त्री सोडणार नाही. श्रियाळ राजा आयत्या वेळेस अतिथीबरोबर जेवावयास कुरकुरतो. त्याला धैर्य होत नाही. परंतु पतीचा हात धरून चांगुणा त्याला बसविते. ती ध्येयबाळाला मरू देणार नाही.

भारतीय स्त्रियांचा हा महान विशेष आहे. आणि तो लक्षात घेतला पाहिजे. जी जी नवीन ध्येये आज उत्पन्न होत आहेत ती ती स्त्रियांपर्यंत गेली पाहिजेत, तरच ती टिकतील. हरिजनसेवा, ग्रामोद्योग, खादी, स्वदेशी इत्यादी नवीन व्रते, हा नवीन दयामय व प्रेममय धर्म, हा सेवाधर्म त्यांच्या हृदयापर्यंत गेला पाहिजे. स्त्रियांच्या पेटीत जे जाईल ते नष्ट होणार नाही.

म्हणून माता या दृष्टीनेच भारतीय स्त्रियांचा अपार महिमा. त्या सांभाळणा-या आहेत. मुले सांभाळणा-या, पतीला सांभाळणा-या, ध्येयांना सांभाळणा-या! त्या कोणाला मरू देणार नाहीत. त्या सर्वांना प्रेम देतील, आशीर्वाद देतील, सेवा देतील. ईश्वराचेच रूप! ईश्वराला भक्तांनी माता हाच शब्द योजिला आहे. कारण ईश्वराचेच जे हे सांभाळण्याचे मुख्य कर्म. सर्वांवर पांघरूण घालण्याचे कर्म. ते या जगात माता करीत असतात. ईश्वराला आई म्हणून हाक मारणे याहून दुसरी थोर हाक नाही-अन्वर्थक हाक नाही! ईश्वराच्या प्रेमाची कल्पना आणून देणारी जर कोणती वस्तू असेल तर ही माता होय.

म्हणून भारतीय संस्कृती सर्वत्र मातृवंदन करीत आहे. उपनिषदांतील आचार्य ऐहिक देवतांची नावे सांगताना, प्रत्यक्ष संसारातील देवतांची नावे सांगताना प्रथम ‘मातृदेवो भव’ असे सांगतो. आधी माता, मग पिता. पति-पत्नींमध्ये आधी पती आहे. परंतु आई-बापांमध्ये आधी आई आहे! पतीला पिता व्हावयाचे आहे, पत्नीला माता व्हावयाचे आहे. आणि या दोन स्वरूपांत माता हे उदात्ततर, श्रेष्ठतर स्वरूप होय.

म्हणून शेवटी भारतीय संस्कृती मातृप्रधान संस्कृती आहे. मातेला तीन प्रदक्षिणा घालणे म्हणजे म्हणजे सर्व पृथ्वीला प्रदक्षिणा घालणे होय. आईबापांची सेवा करणे म्हणजे मोक्ष मिळविणे. “न मातु: परदैवतम्” – आईविना दैवत नाही. आईचे ऋण कधी फिटत नाही.

विठ्ठल म्हणजे आई, भारत म्हणजे आई, गाय म्हणजे आई,! भारतवर्षात सर्वत्र मातेचा महिमा आहे. आईला आधी वंदन. कोणताही मंगल विधी असो आधी आईचा आशीर्वाद, तिला नमस्कार.

भारतीय संस्कृती

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
भारतीय संस्कृती 1 भारतीय संस्कृती 2 भारतीय संस्कृती 3 भारतीय संस्कृती 4 भारतीय संस्कृती 5 भारतीय संस्कृती 6 भारतीय संस्कृती 7 भारतीय संस्कृती 8 भारतीय संस्कृती 9 भारतीय संस्कृती 10 भारतीय संस्कृती 11 भारतीय संस्कृती 12 भारतीय संस्कृती 13 भारतीय संस्कृती 14 भारतीय संस्कृती 15 भारतीय संस्कृती 16 भारतीय संस्कृती 17 भारतीय संस्कृती 18 भारतीय संस्कृती 19 भारतीय संस्कृती 20 भारतीय संस्कृती 21 भारतीय संस्कृती 22 भारतीय संस्कृती 23 भारतीय संस्कृती 24 भारतीय संस्कृती 25 भारतीय संस्कृती 26 भारतीय संस्कृती 27 भारतीय संस्कृती 28 भारतीय संस्कृती 29 भारतीय संस्कृती 30 भारतीय संस्कृती 31 भारतीय संस्कृती 32 भारतीय संस्कृती 33 भारतीय संस्कृती 34 भारतीय संस्कृती 35 भारतीय संस्कृती 36 भारतीय संस्कृती 37 भारतीय संस्कृती 38 भारतीय संस्कृती 39 भारतीय संस्कृती 40 भारतीय संस्कृती 41 भारतीय संस्कृती 42 भारतीय संस्कृती 43 भारतीय संस्कृती 44 भारतीय संस्कृती 45 भारतीय संस्कृती 46 भारतीय संस्कृती 47 भारतीय संस्कृती 48 भारतीय संस्कृती 49 भारतीय संस्कृती 50 भारतीय संस्कृती 51 भारतीय संस्कृती 52 भारतीय संस्कृती 53 भारतीय संस्कृती 54 भारतीय संस्कृती 55 भारतीय संस्कृती 56 भारतीय संस्कृती 57 भारतीय संस्कृती 58 भारतीय संस्कृती 59 भारतीय संस्कृती 60 भारतीय संस्कृती 61 भारतीय संस्कृती 62 भारतीय संस्कृती 63 भारतीय संस्कृती 64 भारतीय संस्कृती 65 भारतीय संस्कृती 66 भारतीय संस्कृती 67 भारतीय संस्कृती 68 भारतीय संस्कृती 69 भारतीय संस्कृती 70 भारतीय संस्कृती 71 भारतीय संस्कृती 72 भारतीय संस्कृती 73 भारतीय संस्कृती 74 भारतीय संस्कृती 75 भारतीय संस्कृती 76 भारतीय संस्कृती 77 भारतीय संस्कृती 78 भारतीय संस्कृती 79 भारतीय संस्कृती 80 भारतीय संस्कृती 81 भारतीय संस्कृती 82 भारतीय संस्कृती 83 भारतीय संस्कृती 84 भारतीय संस्कृती 85 भारतीय संस्कृती 86 भारतीय संस्कृती 87 भारतीय संस्कृती 88 भारतीय संस्कृती 89 भारतीय संस्कृती 90 भारतीय संस्कृती 91 भारतीय संस्कृती 92 भारतीय संस्कृती 93 भारतीय संस्कृती 94 भारतीय संस्कृती 95 भारतीय संस्कृती 96 भारतीय संस्कृती 97 भारतीय संस्कृती 98 भारतीय संस्कृती 99 भारतीय संस्कृती 100 भारतीय संस्कृती 101 भारतीय संस्कृती 102 भारतीय संस्कृती 103 भारतीय संस्कृती 104 भारतीय संस्कृती 105 भारतीय संस्कृती 106 भारतीय संस्कृती 107 भारतीय संस्कृती 108 भारतीय संस्कृती 109 भारतीय संस्कृती 110 भारतीय संस्कृती 111 भारतीय संस्कृती 112 भारतीय संस्कृती 113 भारतीय संस्कृती 114 भारतीय संस्कृती 115 भारतीय संस्कृती 116 भारतीय संस्कृती 117 भारतीय संस्कृती 118 भारतीय संस्कृती 119 भारतीय संस्कृती 120 भारतीय संस्कृती 121 भारतीय संस्कृती 122 भारतीय संस्कृती 123 भारतीय संस्कृती 124 भारतीय संस्कृती 125 भारतीय संस्कृती 126 भारतीय संस्कृती 127 भारतीय संस्कृती 128 भारतीय संस्कृती 129 भारतीय संस्कृती 130 भारतीय संस्कृती 131 भारतीय संस्कृती 132 भारतीय संस्कृती 133 भारतीय संस्कृती 134 भारतीय संस्कृती 135 भारतीय संस्कृती 136 भारतीय संस्कृती 137 भारतीय संस्कृती 138 भारतीय संस्कृती 139 भारतीय संस्कृती 140 भारतीय संस्कृती 141 भारतीय संस्कृती 142 भारतीय संस्कृती 143 भारतीय संस्कृती 144 भारतीय संस्कृती 145 भारतीय संस्कृती 146 भारतीय संस्कृती 147 भारतीय संस्कृती 148 भारतीय संस्कृती 149 भारतीय संस्कृती 150 भारतीय संस्कृती 151 भारतीय संस्कृती 152 भारतीय संस्कृती 153 भारतीय संस्कृती 154 भारतीय संस्कृती 155 भारतीय संस्कृती 156 भारतीय संस्कृती 157 भारतीय संस्कृती 158 भारतीय संस्कृती 159 भारतीय संस्कृती 160 मातृभोजन गीत भारतीय संस्कृती 162 भारतीय संस्कृती 163 भारतीय संस्कृती 164 भारतीय संस्कृती 165 भारतीय संस्कृती 166 भारतीय संस्कृती 167 भारतीय संस्कृती 168 भारतीय संस्कृती 169 भारतीय संस्कृती 170 भारतीय संस्कृती 171 भारतीय संस्कृती 172 भारतीय संस्कृती 173 भारतीय संस्कृती 174 भारतीय संस्कृती 175 भारतीय संस्कृती 176 भारतीय संस्कृती 177 भारतीय संस्कृती 178 भारतीय संस्कृती 179 भारतीय संस्कृती 180 भारतीय संस्कृती 181 भारतीय संस्कृती 182 वाघ मानव परस्पर सबंधं निबंध