Get it on Google Play
Download on the App Store

भारतीय संस्कृती 18

भारतीय संस्कृती प्रत्येक पाऊल बुद्धिपूर्वक टाकावयास सांगत आहे. “दृष्टीपूतं न्यसेत्पादम् वस्त्रपूतं पिबेज्जलम्!” –विचार करून वागा, पाहून पाऊल टाका, गाळून पाणी प्या. भारतीय संस्कृती सांगते की विचार सर्वत्र घेऊन जा. धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे प्रत्येक क्रिया डोळसपणे करणे. सकाळी सात वाजता स्नान करून संध्या करणे, एवढाच धर्म या शब्दाचा अर्थ नव्हे. धर्म म्हणजे चोवीस तास होणारी कर्मे. जन्मभर होणारी कर्मे. धर्म का देवघरापुरता असतो? धर्म सर्वत्र आहे. हवा ज्याप्रमाणे आपण जेथे जेथे जाऊ तेथे तेथे पाहिजे, त्याप्रमाणे धर्म सर्वत्र हवा. तुम्ही विधिमंडळात जा, स्वयंपाकघरात जा, कारखान्यात जा, कोठेही जा, जे जे कर्म कराल ते ते धर्ममय पाहिजे.

धर्ममय पाहिजे म्हणजे वेदमय पाहिजे, विचारमय पाहिजे. याचाच अर्थ प्रत्येक कर्म बुद्धिपूर्वक करा. परंतु बुद्धी शुद्ध व्हावयास हृदयाची जरूर असते. हृदय व बुद्धी यांच्या एकतानतेतून जो महाविचार निर्माण निर्माण होईल तो धर्म होय! अशी एकतानता ज्याची होते; त्यालाच आपण धर्मस्थापक म्हणतो. समर्थांनी एकच धर्मस्थापक सांगितला नाही.

“धर्मस्थापनेचे नर। झाले आहेत, पुढें होणार”

त्या त्या काळातील परिस्थितीचा खोल विचार करून, त्या त्या काळातील बहुजनसमाजाच्या सुखदु:खांचा एकरूपतेने विचार करून, महापुरुष त्या त्या काळातील युगधर्म देत असतो. त्या त्या काळाला नवीन दृष्टी देतो, नवीन विचार देतो. अशा रीतीने धर्म वाढत जातो.

भारतीय धर्म हा वर्धिष्णू धर्म आहे. नवीन नवीन तो घेईल व पुढे जाईल. नवीन नवीन क्षेत्रांत घुसेल. सारे ज्ञान आपलेसे करून समाजाचे धारण करू पाहील. विचाराशिवाय समाजाची धारण कसे होणार? ज्ञान ही शक्ती आहे. खरा सनातन धर्म ते ज्ञान घेतल्याशिवाय कसा राहील? मारुती ज्याप्रमाणे लाल दिसणा-या सूर्याला धरावयाला उडाला, त्याप्रमाणे भारतीय संस्कृती क्षितिजावर दिसणा-या भव्य, दिव्य, नव्य विचारांना कवटाळू पाहील. भारतीय संस्कृती ही स्थाणूंची स्थाणुसंस्कृती नाही. ती गतिशील आहे, पुढे जाणारी आहे. ती कधी थांबणार नाही. सत्याची नवनवीन दर्शने घ्यावयास भारतीय आत्मा तडफडेल. सत्याचा संशोधक “आता बस झाले” असे कधी म्हणणार नाही. अनंत क्षेत्र त्याच्या डोळ्यासमोर उघडे असते. आज महात्मा गांधीच पाहा. जीवनाचे असे एकही क्षेत्र नाही, की ज्या क्षेत्रात ते बुद्धीचा दीप घेऊन शिरले नाहीत! राजकारणाच्या क्षेत्रात नवीन प्रयोग त्यांनी चालविलेच आहेत. उद्योगधंद्यांची गोष्ट घ्या, त्यातही ते शिरतीलच. राष्ट्रीय शिक्षण असो, राष्ट्रभाषा असो, समाजसुधारणा असो, धार्मिक प्रश्न असो, आरोग्य असो, खाण्यापिण्याचे प्रयोग असोत, ब्रह्मचर्यादी मानसिक प्रश्न असोत, प्रत्येक क्षेत्रात ते शिरतील. ते बुद्धीचे उपासक आहेत. शुद्ध हृदयाची शुद्ध बुद्धीला जोड देऊन ते प्रयोग करीत असतात. ख-या सनातनी वेदधर्माचे ते खरे अनुयायी आहेत.

बुद्धिवादी मनुष्य निर्भय असतो. तो कोणाचे तुणतुणे वाजवीत बसणार नाही. तो आपल्या विशंकतेने पुढे पाऊल टाकील. जुने लोक कलियुग, कलियुग म्हणतात. नवीन लोक यंत्रयुग, यंत्रयुग म्हणतात. गांधी म्हणतील, “मी माझे युग निर्माण करीन. मी चरख्याचे युग आणीन. ग्रामोद्योगाचे युग आणीन.” बुद्धिमान मनुष्य री ओढीत बसणार नाही. तो स्वत:च्या विचारांचे युग आपल्याभोवती निर्माण करू पाहतो.

जगात स्वतंत्र बुद्धि फार थोडी असते. सनातनी लोक दहा हजार वर्षांपूर्वीच्या ऋषींचे गुलाम होतात, तर नवीन लोक पाश्चिमात्य पंडितांचे गुलाम होतात! परंतु भारतीय संस्कृती स्वतंत्र दिवा लावावयास सांगत आहे. तुमच्या देशाच्या स्थितीचा विचार करा, परंपरेचा विचार करा. आजूबाजूच्या देशांचाही विचार करा. आणि स्वत:च्या समाजाला काय हितकर ते बघा.

भारतीय संस्कृती

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
भारतीय संस्कृती 1 भारतीय संस्कृती 2 भारतीय संस्कृती 3 भारतीय संस्कृती 4 भारतीय संस्कृती 5 भारतीय संस्कृती 6 भारतीय संस्कृती 7 भारतीय संस्कृती 8 भारतीय संस्कृती 9 भारतीय संस्कृती 10 भारतीय संस्कृती 11 भारतीय संस्कृती 12 भारतीय संस्कृती 13 भारतीय संस्कृती 14 भारतीय संस्कृती 15 भारतीय संस्कृती 16 भारतीय संस्कृती 17 भारतीय संस्कृती 18 भारतीय संस्कृती 19 भारतीय संस्कृती 20 भारतीय संस्कृती 21 भारतीय संस्कृती 22 भारतीय संस्कृती 23 भारतीय संस्कृती 24 भारतीय संस्कृती 25 भारतीय संस्कृती 26 भारतीय संस्कृती 27 भारतीय संस्कृती 28 भारतीय संस्कृती 29 भारतीय संस्कृती 30 भारतीय संस्कृती 31 भारतीय संस्कृती 32 भारतीय संस्कृती 33 भारतीय संस्कृती 34 भारतीय संस्कृती 35 भारतीय संस्कृती 36 भारतीय संस्कृती 37 भारतीय संस्कृती 38 भारतीय संस्कृती 39 भारतीय संस्कृती 40 भारतीय संस्कृती 41 भारतीय संस्कृती 42 भारतीय संस्कृती 43 भारतीय संस्कृती 44 भारतीय संस्कृती 45 भारतीय संस्कृती 46 भारतीय संस्कृती 47 भारतीय संस्कृती 48 भारतीय संस्कृती 49 भारतीय संस्कृती 50 भारतीय संस्कृती 51 भारतीय संस्कृती 52 भारतीय संस्कृती 53 भारतीय संस्कृती 54 भारतीय संस्कृती 55 भारतीय संस्कृती 56 भारतीय संस्कृती 57 भारतीय संस्कृती 58 भारतीय संस्कृती 59 भारतीय संस्कृती 60 भारतीय संस्कृती 61 भारतीय संस्कृती 62 भारतीय संस्कृती 63 भारतीय संस्कृती 64 भारतीय संस्कृती 65 भारतीय संस्कृती 66 भारतीय संस्कृती 67 भारतीय संस्कृती 68 भारतीय संस्कृती 69 भारतीय संस्कृती 70 भारतीय संस्कृती 71 भारतीय संस्कृती 72 भारतीय संस्कृती 73 भारतीय संस्कृती 74 भारतीय संस्कृती 75 भारतीय संस्कृती 76 भारतीय संस्कृती 77 भारतीय संस्कृती 78 भारतीय संस्कृती 79 भारतीय संस्कृती 80 भारतीय संस्कृती 81 भारतीय संस्कृती 82 भारतीय संस्कृती 83 भारतीय संस्कृती 84 भारतीय संस्कृती 85 भारतीय संस्कृती 86 भारतीय संस्कृती 87 भारतीय संस्कृती 88 भारतीय संस्कृती 89 भारतीय संस्कृती 90 भारतीय संस्कृती 91 भारतीय संस्कृती 92 भारतीय संस्कृती 93 भारतीय संस्कृती 94 भारतीय संस्कृती 95 भारतीय संस्कृती 96 भारतीय संस्कृती 97 भारतीय संस्कृती 98 भारतीय संस्कृती 99 भारतीय संस्कृती 100 भारतीय संस्कृती 101 भारतीय संस्कृती 102 भारतीय संस्कृती 103 भारतीय संस्कृती 104 भारतीय संस्कृती 105 भारतीय संस्कृती 106 भारतीय संस्कृती 107 भारतीय संस्कृती 108 भारतीय संस्कृती 109 भारतीय संस्कृती 110 भारतीय संस्कृती 111 भारतीय संस्कृती 112 भारतीय संस्कृती 113 भारतीय संस्कृती 114 भारतीय संस्कृती 115 भारतीय संस्कृती 116 भारतीय संस्कृती 117 भारतीय संस्कृती 118 भारतीय संस्कृती 119 भारतीय संस्कृती 120 भारतीय संस्कृती 121 भारतीय संस्कृती 122 भारतीय संस्कृती 123 भारतीय संस्कृती 124 भारतीय संस्कृती 125 भारतीय संस्कृती 126 भारतीय संस्कृती 127 भारतीय संस्कृती 128 भारतीय संस्कृती 129 भारतीय संस्कृती 130 भारतीय संस्कृती 131 भारतीय संस्कृती 132 भारतीय संस्कृती 133 भारतीय संस्कृती 134 भारतीय संस्कृती 135 भारतीय संस्कृती 136 भारतीय संस्कृती 137 भारतीय संस्कृती 138 भारतीय संस्कृती 139 भारतीय संस्कृती 140 भारतीय संस्कृती 141 भारतीय संस्कृती 142 भारतीय संस्कृती 143 भारतीय संस्कृती 144 भारतीय संस्कृती 145 भारतीय संस्कृती 146 भारतीय संस्कृती 147 भारतीय संस्कृती 148 भारतीय संस्कृती 149 भारतीय संस्कृती 150 भारतीय संस्कृती 151 भारतीय संस्कृती 152 भारतीय संस्कृती 153 भारतीय संस्कृती 154 भारतीय संस्कृती 155 भारतीय संस्कृती 156 भारतीय संस्कृती 157 भारतीय संस्कृती 158 भारतीय संस्कृती 159 भारतीय संस्कृती 160 मातृभोजन गीत भारतीय संस्कृती 162 भारतीय संस्कृती 163 भारतीय संस्कृती 164 भारतीय संस्कृती 165 भारतीय संस्कृती 166 भारतीय संस्कृती 167 भारतीय संस्कृती 168 भारतीय संस्कृती 169 भारतीय संस्कृती 170 भारतीय संस्कृती 171 भारतीय संस्कृती 172 भारतीय संस्कृती 173 भारतीय संस्कृती 174 भारतीय संस्कृती 175 भारतीय संस्कृती 176 भारतीय संस्कृती 177 भारतीय संस्कृती 178 भारतीय संस्कृती 179 भारतीय संस्कृती 180 भारतीय संस्कृती 181 भारतीय संस्कृती 182 वाघ मानव परस्पर सबंधं निबंध