वटवाघूळ
पूर्वी पंक्तिस केला भेद । नाही अंत:करण शुद्ध
झाले वटवाघूळ प्रसिद्ध ॥ १ ॥
वटवाघूळझाले बाई । करावे काई । उपाय नाही ॥ धृ. ॥
वटवाघळीचा जन्म घेऊन । घेतले उफराटे टांगून ।
तोंडी नरक भरला जाण ॥ २ ॥
वटवाघळीची यातना मोठी । भोगिल्या चौर्यांशी कोटी ।
जन्ममरणाच्या तुटल्या गाठी ॥ ३ ॥
एकाजनार्दनी वटवाघूळ झाले । सद्गुरुला शरण गेले ।
जन्ममरण चुकविले ॥ ४ ॥