पाईक
हरीचे दास जगी बळीवंत । नाहीं भीत कळिकाळा ॥ १ ॥
मुखीं रामनाम शस्त्र । करुणा पात्र पोटीं बहु ॥ २ ॥
जातां कोणी आडवाटें । दाविती गोमटें रूप त्यासी ॥ ३ ॥
शरण एका जनार्दनीं । त्याची पायवणी वंदीन ॥ ४ ॥