मांग
हयात मायबाप हयात । गांव असतां वस पडले ।
घर असता जळून गेले । जोडे असता टेकां मोडले ।
ते माझ्या जाळीत सापडले । हयात मायबाप हयात ॥ १ ॥
गांवचे पाटील मरून गेले । त्याचे नारीने चुडे भरले ।
त्याचे वाड्याचे बुरुज ढासळले । ते पोर चोरीत सापडले ।
हयात मायबाप हयात ॥ २ ॥
एका जनार्दनी मांग । पाटील आपुले नारीला सांग ।
सांगितले तर काम । नाहीतर उरफाट्या झाडासी टांग ।
हयात मायबाप हयात ॥ ३ ॥
N/A