Android app on Google Play

 

जोहार

 

जोहार मायबाप जोहार । मी कसबे कायापुरीचा महार । या गांवचा कारभार उठावणीस आणिला की जी मायबाप ॥ १ ॥

कसबे कायापुर शहर । शंभर खेडें दहा बाजार । परि या अहंकार पाटलाचा कारभार । कांहीं धड नाहीं की० ॥ २ ॥

मनाजीपंत कुळकर्णी गिरस्त । कामक्रोध देसाई जबरदस्त । धन्यासी पोंचत नाही रस्त । मधींच वस्त लुटिती की० ॥ ३ ॥

बुधाई आवा पाटलीण जरा । देती टाकडा टुकडा चारा चुरा । परि या म्हातारीच्या कारभारा । कोण मानितो की० ॥ ४ ॥

एक धनी नाहीं मेले । जागोजागीं तकूब जाहले । भ्रमाजीबावा घाईस आले । कुडवाड रस्ते की० ॥ ५ ॥

हरीपंतानें कौल द्यावा । शिवाजी बाजीनें लुटून न्यावा । यमाजी कोतवाल यांनीं दंड द्यावा की० ॥ ६ ॥

म्हणोनी मच्छराव कूर्मराव आले । वर्‍हाबाजी दडाले । धरत्री बुडती की० ॥ ७ ॥

नरसोबापा तापाड । हिरण्यकश्यपा दिधली थोबाड । वामनोजी बुवा लहान वाड । परी थोरासी न गणिती की० ॥ ८ ॥

परसोजी बुवा रागांत शिरले । एकवीस वेळां क्षेत्र मारिले । अखेर अमोद विघ्न बसविलें । रामाजी घुसले जग फिरूं की० ॥ ९ ॥

कृष्णाजीपंत कारकून भले । ते बायकामुलानींच भुलविले । ख्याल तमाशे फार केले । अखेर आमदाणींतच गेले की० ॥ १० ॥

बौधाजीबुवा जंगली राजा । कलंकोजी बुवाचा मोठा आवाजा । त्यानें घोडा केला ताजा । फिराद दुरदुर केली की० ॥ ११ ॥

मनीजीपंत ठाणेदार जाड । मुलुख अवघा केला उजाड । दाही पेट्यांचा बाजार जड । उच्यापतीखालीं बेजार केला की० ॥ १२ ॥

चरणपेट्यांची हाल पैल मोडली । सुराबाजीची चऊ उडाली । कर्णपुरी बधीर झाली । मार मारुनी की० ॥ १४ ॥

शेसफुल खालवले राट । मांड्यापुरास घासन दाट । लिंगपेटा भनभनाट । बोचरा केला की० ॥ १५ ॥

टेरीवाडी टांचापूर । एके ठायीं न होती दूर । आतां गांडापुरानें टाराटूर । करोनी काय होते की० ॥ १६ ॥

दाढापुर बत्तीस पेट । कटकटीमुळें उपटलें बेट । गांव नाशापूर हनुवट । खलबता पळाव्या करीत की० ॥ १७ ॥

कंबर बाजीस दाटी भारी । हलकल्लोळ बकापुरी । तळांत गांव टेक न धरी । कामीटगांव कमजोर झालें की० ॥ १८ ॥

सर्वांगनें केली पळती । आपान पेट्यास पडली वोढनी । धुरळे उडती की० ॥ १९ ॥

फारदापूरक निट पेट । टेक वाट झाली सपाट । गुडघापूर कोपरगांव नीट । कुठवर सोसेल की० ॥ २० ॥

वाटवोडी हालवली देठ । नागीन पेट्याचे उकललें बेट । कंठ सरोवर राट । कांपे थरथरा की० ॥ २१ ॥

जीवन झरीस पडली आट । वांचे गांवचें उकललें बेट । चांदपूर तीन वाट । पळावया खलबत करीत की० ॥ २२ ॥

येथें वसूल बाकींत राहिलें काय । हिशोबाचा नाहीं ठाय । जिवाजीपंतानें पसरले पाय । मज नफरासी बोल नाहीं की० ॥ २३ ॥

एका जनार्दनीं जोहार । मी धन्याचा राबता महार । झाडीन साहेबाचा दरबार । निवालों खाऊन की जी मायबाप ॥ २४ ॥

 

भारुडे

स्तोत्रे
Chapters
आंधळा
चिरंजीव जिवाजीपंत ठाणेदार...
अंबा
अयोध्येचा हो देव्हारा
माझे कुळीची कुळस्वामिनी
बहिरा जालो या या जगी
संसार नगरी बाजार भरला भाई
अलक्ष लक्ष मी भिकारी
आम्ही परात्पर भिकारी
चौदेहांची घेऊनी दीक्षा
चिन्मय चिद्रुप अक्षय डोळा
अलक्ष लक्ष पाहवेना
आम्ही परात्पर देशी
नाहं जोगी नाहं भॊगी नाहं जोशी संन्याशी
भूत जबर मोठे गं बाई
आंधळा पांगळा
आंधळा पांगळा झालो मी अंधपंगु
आंधळा पांगळा दाते बहु असती परि
भवानी मी तुझा भुत्या खरा ...
पंधरा सतरांचा सतरांचा हा ...
चोपदार आला चोपदार आला ॥धृ...
मोडकेसे घर तुटकेसे छप्पर ...
सुंदरे, चिद्‌‍घने, माझे र...
एडका मदन तो केवळ ॥ध्रु॥ ...
सफेद कलंदर फकीर ।बाबा सफे...
फकीर
फकीर
फकीर
गाय
अगा ते परम शुभ ऐक । लाभ द...
आरता येरे धाकुट्या मुला ।...
संचित बरवें लिहिलें । भाग...
जोहार मायबाप जोहार । सकळ ...
जोहार मायबाप जोहार । मी स...
अयोध्येचा हो देव्हारा । आ...
चल चल चल । निरंजन जंगलका ...
पलखम्यानें चार जुग ज्यावे...
संसार बाजेगिरी देख । दुरल...
चल चल चल । याद करो गुरु ग...
सुनो संत सज्जन भाई । हम त...
प्राप्ती एक भजन विरुद्ध ।...
सगरमें बाजी पतालमें बाजी ...
संचित बरवें लिहिलें । भाग...
लगे ढोल लगे ढोल । जरी तुझ...
श्रीकृष्ण माया जी पाहे । ...
गौळण
गौळण
गौळण
होळी
जागल्या
जागर
जंगम
जोगवा
जोहार
जोशी
जोशी
जोशी
अष्टपदी
भटीण
भटीण
बैल
छापा
डोहो
गाय
गोपाळ
हळदुली
कहाणी
कंजारीण
कोल्हाटीण
कुंटीण
कुत्रें
लग्न
मुलगी
नीति
पांखरू
पिंगळा महाद्वारीं बोली बो...
पिंगळा
पिंगळा
पिंगळा
पोपट
रहाट
सर्प
सासुरवास
सासुरवास
शंखीण डंखीण
शंखीण डंखीण
शिमगा
सौरी
सौरी
सौरी
सौरी
सौरी
सौरी
सौरी
स्वप्न
थट्टा
टिटवी
विंचू
व्यापार
आडबंग
बाहुलें
भूत
भूत
धांवा
धांवा
द्रौपदीचा धांवा
किल्ला
कोडें
कोडें
कोडें
नवल
नवल
नवल
नवल
नवल
नवल
नवल
पाईक
पाईक
पाईक
पाईक
पाईक
पाईक
पाईक
पाईक
पाईक
पाईक
पाईक
पाईक
पाळणा
पाळणा
पाळणा
पाळणा
अभयपत्र
अर्ज
अर्जदस्त
विनंतीपत्र
थाक
टिळा
अभयपत्र
अर्जाचा जाब
जोहार
जोहार
जोहार
जोहार
जोहार
जोहार
जोहार
जोहार
जोहार
जोहार
जोहार
जोहार
जोहार
जोहार
जोहार
जोहार
जोहार
जोहार
जोहार मायबाप जोहार । याच ...
जोहार
जोहार
जोहार
जोहार
जोहार
जोहार
जोहार
जोहार
जोहार
जोहार
जोहार
जोहार
जोहार
जोहार
जोहार
जोहार
जोहार
ताकीदपत्र
पत्र
कौलपत्र
कौल
जमाखर्च
जाबचिठ्ठी
नानक
नानक
जोगी
चिरंजीवपद
बुलबुल
भांड
भांड
भांड
भांड
फुलवरा
फकीर
फकीर
फकीर
मेसाबाई
हुशारी
हापसी
गारुडी
गारुडी
गारुडी
गारुडी
गारुडी
गारुड
गावगुंड
गावगुंड
दरवेश
यलमा
सटवाई
मरीआई
महालक्ष्मी
महालक्ष्मी
गोंधळ
गोंधळ
गोंधळ
गोंधळ
गोंधळ
गोंधळ
गोंधळ
गोंधळ
गोंधळ
गोंधळ
गोंधळ
अंबा
महारीण
महारीण
महारीण
महारीण
महारीण
महारीण
महारीण
महारीण
महारीण
महारीण
जागल्या
जागल्या
डौर
अक्कल
बेटकुळी
बेटकुळी
बेटकुळी
बेटकुळी
बेटकुळी
बेटकुळी
बेटकुळी
फुगडी
फुगडी
वैदीण
वैदू
कानोबा
खेळिया
कोडे
कोल्हाटी
कोल्हाटीण
मल्हारी
माळी
मानभाव
मानभाव
मांग
मुका
नकटी
नानक
नवलाई
पिसा
पिसा
पोर
संसार
संन्यास
सर्प
सौरी
सौरी
वाघ्या
वासुदेव
वासुदेव
वासुदेव
वासुदेव
वासुदेव
वासुदेव
वटवाघूळ
वेणु