महारीण
पायां पडत्यें महारीण आली ॥ध्रु०॥
महारिणीचे बोल ऐका । गांव वसाड पाडूं नका । हकनाक बसेल धक्का । इतुकें तुम्ही मनीं तर्का ॥ १ ॥
ब्रह्मा विष्णु दोन्ही बाळ । महाकाळाचे हे काळ । मज देखतां गोपाळ । ते मज महारिणीपासोनी ॥ २ ॥
एका जनार्दनीं महारीण झालें । सद्गुरूला शरण गेलें । यानें आपुलें स्वहित केलें । जन्ममरण विसरलें ॥ ३ ॥