पाईक
काळ गणना कोण लेखे । जो या देखे विठ्ठला ॥ १ ॥
बळीवंत हरीचे दास । आहेती उदास जीवासी ॥ २ ॥
नेणती कांहीं भेदाभेद । अंतर शुद्ध निर्मळ ॥ ३ ॥
एका जनार्दनीं त्यांचा दास । पुरवा आस पायाची ॥ ४ ॥