महारीण
पायां पडते महारीण आली ॥ध्रु०॥
महारीण गेली वरच्या आळी । महारणीनें दिली हारळी । जवळ आली काळाची फेरी ॥ १ ॥
माझें महारणीचें ऐका । जागे असा निजूं नका । काळ करीतसे लेखा गा ॥ २ ॥
एका जनार्दनीं महारीण । करा चंद्रभागें स्नान । घ्यावें पुंडलीक दर्शन । पाहवे विठ्ठलचरण ॥ ३ ॥