सौरी
मी सुखाची कन्यका झाले वाढविली घरी ।
देखता पाहता उचलून उचलून नेली चोरी ॥ १ ॥
सौरी झाले बाई आता करू तरी काई ॥ धृ. ॥
निसुगाचा पुत्र झाला जावा नणंदा घरी ॥
पाहतां देखतां उचलून उचलून नेली चोरी ॥ २ ॥
बारा सोळा मुले झाली आले सुना नातू ।
कंबरेवरी हातू ॥ ३ ।
कैची बहीण कैची माय अंतकाळी देखा ।
निदानीचे वेळी तुज देव मारी हाका ॥ ४ ॥
लेकुरवाळी बाईल म्हणे तोंड यांचे झाका ।
एका जनार्दनी म्हणे भवीं भुलू नका ॥ ५ ॥