Get it on Google Play
Download on the App Store

मिरी 73

'मिरीला तेथे येण्यात आनंद वाटत नव्हता.'

'मिरा !'

'काय ?'

'तू माझा तिरस्कार का करतेस ?'

'मी कोणाचा तिरस्कार करीत नाही.'

'तू माझे हृदय ओळखतेस ?'

'तुमचे प्रेमावर प्रेम आहे.'

'खोटे, साफ खोटे.'

'तुम्ही तिला फुले देता, तिच्याबरोबर फिरायला जाता, तिला प्रेमपत्रे लिहिता. ते सारे का खोटे?''
खोटे, साफ खोटे. माझे तुझ्यावर प्रेम आहे.'

'हेही खोटे कशावरुन नाही ? तुमच्यावर विश्वास कोणी काय म्हणून ठेवावा ? प्रेमावर प्रेम दाखवता हे जर नाटक असेल, तर माझ्यावर प्रेम आहे असे म्हणता, हेही नाटक कशावरून नाही ?'

'तुझ्या हृदयातील ईर्षाजागृत व्हावी म्हणून मी प्रेमाकडे अधिक लक्ष देऊ लागलो. मी प्रेमाकडे अधिक वळत आहे असे पाहून स्त्री-स्वभावानुसार तू माझ्याकडे अधिक लक्ष देशील असे मला वाटले. मिरी, माझ्या हृदयात प्रेमाला स्थान नाही. तेथे मिरी आहे. मिरीने माझे जीवन व्यापले आहे. तू माझा तिटकारा करू नकोस. माझा स्वीकार कर.'

'रमाकांत, या क्षणापर्यंत मी तुमचा तिरस्कार करीत नव्हते. परंतु आता मात्र तुमची किंमत मला कळली. एका भोळया मुलीला फसवून माझ्यापासून तुम्ही आदराची, प्रेमाची अपेक्षा करता तरी कशी ? प्रेमाने आपले हृदय दिले. तुमच्यावर तिने विश्वास ठेवला. किती आनंदाने नटून ती वसंतोत्सवास गेली ! मी तिला सजविले. तुम्ही तेथे येणार म्हणून ती उत्सुकतेने गेली आणि तुम्ही इकडे निघून आलात ! रमाकांत ! मानवी हृदयाची, स्त्रीच्या पहिल्या पवित्र प्रेमाची अशी वंचना करणे फार भयंकर आहे. थोर भावनांची, कोमल, अमोल, पहिल्या प्रेमाच्या मोहोराची अशी टिंगल करणे पाप आहे. तुम्ही का प्रेमाचा खेळ मांडला आहे ? तुम्ही अत्यंत नीच वर्तन केले आहे.'

'मिरी, तुझ्या प्रेमासाठी हे सारे नाटक मला करावे लागले. कठोर नको होऊस. क्षमा कर !'

मिरी

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
मिरी 1 मिरी 2 मिरी 3 मिरी 4 मिरी 5 मिरी 6 मिरी 7 मिरी 8 मिरी 9 मिरी 10 मिरी 11 मिरी 12 मिरी 13 मिरी 14 मिरी 15 मिरी 16 मिरी 17 मिरी 18 मिरी 19 मिरी 20 मिरी 21 मिरी 22 मिरी 23 मिरी 24 मिरी 25 मिरी 26 मिरी 27 मिरी 28 मिरी 29 मिरी 30 मिरी 31 मिरी 32 मिरी 33 मिरी 34 मिरी 35 मिरी 36 मिरी 37 मिरी 38 मिरी 39 मिरी 40 मिरी 41 मिरी 42 मिरी 43 मिरी 44 मिरी 45 मिरी 46 मिरी 47 मिरी 48 मिरी 49 मिरी 50 मिरी 51 मिरी 52 मिरी 53 मिरी 54 मिरी 55 मिरी 56 मिरी 57 मिरी 58 मिरी 59 मिरी 60 मिरी 61 मिरी 62 मिरी 63 मिरी 64 मिरी 65 मिरी 66 मिरी 67 मिरी 68 मिरी 69 मिरी 70 मिरी 71 मिरी 72 मिरी 73 मिरी 74 मिरी 75 मिरी 76 मिरी 77 मिरी 78 मिरी 79 मिरी 80 मिरी 81 मिरी 82 मिरी 83 मिरी 84 मिरी 85 मिरी 86 मिरी 87 मिरी 88 मिरी 89 मिरी 90 मिरी 91 मिरी 92 मिरी 93 मिरी 94 मिरी 95 मिरी 96 मिरी 97 मिरी 98 मिरी 99 मिरी 100 मिरी 101