Get it on Google Play
Download on the App Store

मिरी 27

सुमित्राताई नि कृष्णचंद्र गेले. मिरी कृपाकाकांचे हात-पाय शेकवी. प्रेमाने जवळ बसे. त्यांच्याकडे प्रेमाने बघे. मुरारीही मधूनमधून जवळ असे.

'मिरे, बाळ, तू मनाने तयार आहेस ना ? आज-उद्या मला देवाचे बोलावणे येईल. खालचे दिवे लावणारा वर देवाच्या घरी देवाच्या राज्यात दिवे लावायला जाईल. तू शोक करू नकोस. सुमित्राताई आता तुला नेणार आहेत. त्या आता तुझ्या. मुरारी आहे. चांगली हो. तू आहेसच चांगली. मी वरून तुला आशीर्वाद पाठवीत जाईन.'

'कृपाकाका, पुन्हा मी एकटी होईन.'

'नाही, बाळ. सुमित्राताई आहेत. कितीतरी इतर प्रेमळ मंडळी आहेत. मुरारी तुला अंतर देणार नाही.'

'तुमचे प्रेम ते तुमचे.'

'प्रभूचे प्रेम सर्वांच्या हृदयांत आहे. त्याचा सुगंध सर्वांच्या जीवनात आहे. जरा प्रकार निराळे. त्यातच मौज. सुखी हो. सद्‍गुणी हो. देवाला आठव. सर्वांची आवडती हो. अधिक काय सांगू बाळ ?

कृपाकाका शांत होते. यशोदाआई आल्या. मुरारी आला. नानाही बाजूस येऊन बसले. जमनीही आली आणि सर्वांच्या प्रेमळ सान्निध्यात त्या देवमाणसाने राम म्हटला.

'कृपाकाका, कृपाकाका' मिरीने हंबरडा फोडला.

'नको रडूस मिरे, कृपाकाकांच्या आत्म्याला क्लेश होतील. नको रडूस; आम्ही आहोत तुला. पूस डोळे. आपण शांत राहू.' मुरारी स्फुंदत म्हणाला.

'तुलासुध्दा रडू येत आहे. मग मला रे किती येईल ?' मिरी त्याच्या खांद्यावर मान ठेवून हुंदके देत म्हणाली.

कृष्णचंद्र आले. इतर मंडळी आली. मंडईतील मित्र आले. त्या एकाकी माणसाचे शेकडो मित्र होते. आणि सर्व जातीजमातींतील.

हुसेनभाई, रामा महार, गोविंदा गवळी... ते बघा सारे आले आहेत आणि ते गोटीराम बघा ! त्यांच्या डोळयांतून पाणी येत आहे. भजन करीत, फुले उधळीत कृपाकाकांचा देह नेण्यात आला. मुरारी आज मिरीजवळ बसून होता. तो सद्‍गदित होऊन म्हणाला.

'मिरे, उद्या मला कामाला जायला हवे. मी रविवारी येईन. तू रडू नकोस. काही दिवस आमच्याकडे राहा. पुढे सुमित्राताईंकडे जायचे झाले तर पाहू. दहा दिवस होऊ देत, हो मिरे ! हा कृपाकाकांचा कंदील ! याला जप. ही त्यांची काठी. त्यांच्या वस्तू आपण जपून ठेवू. त्यांनी आपल्या सर्वांच्या हृदयात तर अभंग कंदील लावलेच आहेत, खरे ना ? मिरे, तूही माझी आहेस. मी तुझा होईन. मी तुला अंतर देणार नाही. मी मोठा होईन. आपण सुखी होऊ. सर्वांना सुखी करू हो मिरे !'

मिरी

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
मिरी 1 मिरी 2 मिरी 3 मिरी 4 मिरी 5 मिरी 6 मिरी 7 मिरी 8 मिरी 9 मिरी 10 मिरी 11 मिरी 12 मिरी 13 मिरी 14 मिरी 15 मिरी 16 मिरी 17 मिरी 18 मिरी 19 मिरी 20 मिरी 21 मिरी 22 मिरी 23 मिरी 24 मिरी 25 मिरी 26 मिरी 27 मिरी 28 मिरी 29 मिरी 30 मिरी 31 मिरी 32 मिरी 33 मिरी 34 मिरी 35 मिरी 36 मिरी 37 मिरी 38 मिरी 39 मिरी 40 मिरी 41 मिरी 42 मिरी 43 मिरी 44 मिरी 45 मिरी 46 मिरी 47 मिरी 48 मिरी 49 मिरी 50 मिरी 51 मिरी 52 मिरी 53 मिरी 54 मिरी 55 मिरी 56 मिरी 57 मिरी 58 मिरी 59 मिरी 60 मिरी 61 मिरी 62 मिरी 63 मिरी 64 मिरी 65 मिरी 66 मिरी 67 मिरी 68 मिरी 69 मिरी 70 मिरी 71 मिरी 72 मिरी 73 मिरी 74 मिरी 75 मिरी 76 मिरी 77 मिरी 78 मिरी 79 मिरी 80 मिरी 81 मिरी 82 मिरी 83 मिरी 84 मिरी 85 मिरी 86 मिरी 87 मिरी 88 मिरी 89 मिरी 90 मिरी 91 मिरी 92 मिरी 93 मिरी 94 मिरी 95 मिरी 96 मिरी 97 मिरी 98 मिरी 99 मिरी 100 मिरी 101