Get it on Google Play
Download on the App Store

मिरी 63

चुलीत ने. म्हणे कोठे नेऊ सामान ! स्वतंत्र खोली करायची काय ग तुला ? सुमित्राबाईंच्या खोलीत राहायला जा. तेथे ने सामान. माझ्या दोन मामेबहिणी नि एक चुलतबहीण अशा तिघी यायच्या आहेत. समजलीस ?'

'जसा हुकूम.'

असे म्हणून मिरी गेली. तिने सुमित्राबाईंच्या कानांवर सारी वार्ता घातली.

'तुमच्या खोलीत अडचण होईल.' ती म्हणाली.

'मिरे, अग, गरीब माणसे एका झोपडीत राहतात. एका खोलीत दहा दहा राहतात. अडचण नाही होत. तुझी मला कधी अडचण का होईल ? सारे सामानही आण. कृपाकाकांची आरामखुर्ची, त्यांचा तो कंदील, आजोबांची काठी, सारे आण. संकोच नको करूस. प्रेमळ वस्तूंचा संग्रह माझ्या खोलीत होऊन ही खोली कृतार्थ होईल, पावन होईल. जा, घेऊन ये सामान. तुझी खाट आण. मोलकरीण मदतीस घे. सुंदराला हाक मार.'

मिरीने सुंदराला हाक मारली.

'कशाला हवी सुंदरा ? ते सामान का तुला नेववत नाही ?'

'खाट नको का धरायला ?'

'बर बाई, सुंदरा जा, आधी तिचे सामान लाव.'

सुंदराने मिरीचे सामान सुमित्राताईंच्या खोलीत नेले. दोघींनी ते नीट लावले. सुंदरा निघून गेली.

आणि राणीसाहेबांच्या त्या लांबच्या-जवळच्या बहिणी आल्या. एकीच नाव प्रेमा, एकीचे मडी, एकीचे लडी. मडी नि लडी या सख्ख्या बहिणी. राणीसाहेबांच्या त्या मामेबहिणी. प्रेमा दूरची चुलत बहीण. राणीसरकारच्या राज्यातील सुख चाखायला त्या आल्या होत्या. तिघी अविवाहित होत्या, उपवर होत्या. त्या शिकत होत्या. त्यांना आता सुट्टी होती. श्रीमंत राणीसाहेबांचे आमंत्रण गेले. त्या आल्या. प्रेमा जरा निराळया वळणाची होती. ती काळीसावळी होती. चेहरा जरा भोळा वाटे. जगात कोणी फसवणारा आहे असे तिला कधी वाटले नसावे. सर्वांवर विश्वास टाकणारे तिचे डोळे होते. तिचे सारे जीवन जणू त्या डोळयांत होते. ती मंद हसे. खो खो हसणे तिला माहित नव्हते. तिचा पोशाखही भडक नव्हता. परंतु मडी नि लडी यांचा निराळाच अवतार होता. त्यांची किती पातळे, किती पोलकी ! दिवसातून चारदा पातळे बदलीत. केशभूषा करण्यात तासनतास दवडीत. मडी गोरी होती. लहानपणी तिचे आईबाप तिला प्रेमाने मडुम म्हणत. हया मडुम शब्दाचा अपभ्रंश होऊन शेवटी मडी हेच तिचे नाव रूढ झाले आणि तिची बहिण लडी लाडावलेली म्हणून ती लडी या नावाने विख्यात झाली.

मिरी

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
मिरी 1 मिरी 2 मिरी 3 मिरी 4 मिरी 5 मिरी 6 मिरी 7 मिरी 8 मिरी 9 मिरी 10 मिरी 11 मिरी 12 मिरी 13 मिरी 14 मिरी 15 मिरी 16 मिरी 17 मिरी 18 मिरी 19 मिरी 20 मिरी 21 मिरी 22 मिरी 23 मिरी 24 मिरी 25 मिरी 26 मिरी 27 मिरी 28 मिरी 29 मिरी 30 मिरी 31 मिरी 32 मिरी 33 मिरी 34 मिरी 35 मिरी 36 मिरी 37 मिरी 38 मिरी 39 मिरी 40 मिरी 41 मिरी 42 मिरी 43 मिरी 44 मिरी 45 मिरी 46 मिरी 47 मिरी 48 मिरी 49 मिरी 50 मिरी 51 मिरी 52 मिरी 53 मिरी 54 मिरी 55 मिरी 56 मिरी 57 मिरी 58 मिरी 59 मिरी 60 मिरी 61 मिरी 62 मिरी 63 मिरी 64 मिरी 65 मिरी 66 मिरी 67 मिरी 68 मिरी 69 मिरी 70 मिरी 71 मिरी 72 मिरी 73 मिरी 74 मिरी 75 मिरी 76 मिरी 77 मिरी 78 मिरी 79 मिरी 80 मिरी 81 मिरी 82 मिरी 83 मिरी 84 मिरी 85 मिरी 86 मिरी 87 मिरी 88 मिरी 89 मिरी 90 मिरी 91 मिरी 92 मिरी 93 मिरी 94 मिरी 95 मिरी 96 मिरी 97 मिरी 98 मिरी 99 मिरी 100 मिरी 101