देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 17
राम गेले वना मारिले रावणा
राज्य दिलें बिभीषणा सोनियाचें १८१
सीता सांगे स्वप्न ऐक रे शहाण्या
सवतीवरी कन्या देऊं नये १८२
सीता सांगे स्वप्न ऐक मंदोदरी
राम लंकेवरी स्वार झाले १८३
सीता सांगे स्वप्न ऐक मंदोदरी
इंद्रजीत मारी लक्षुमण १८४
सीता सांगे स्वप्न ऐक मंदोदरी
राक्षस वानरी संहारीले १८५
सीतेच्या श्रापानें डोंगर जळती
वानर म्हणती रामनाम १८६
सीतेच्या श्रापानें लंकेची झाली होळी
तोंडें झाली काळी वानरांचीं १८७
आधी नमन करूं अंजनीच्या सुता
मारुति हनुमंता रामभक्ता १८८
आधी नमन करूं अंजनीबाईला
मग मारुतिरायाला तिच्या पुत्रा १८९
अंजनीबाई म्हणे बाळ माझा बंळीवंत
द्रोणागिरी पर्व उचलीला १९०
घडीत आणीला पर्वताचा चेंडू
हनुमंत वंदू रामदूत १९१
मनाचाही वेग मारुतींच्या मागें
लंकेला रागे रागें जाळीतसे १९२
एकाच उडीत समुद्र ओलांडी
जाऊनी सीता वंदी रामदूत १९३
रामाचा सेवक मारुतिराय तो मानाचा
विडा पिकल्या पानांचा सुकुनी गेला १९४
पहाटेच्या प्रहर रात्री मला वेशीकडे जाणें
त्याचे दर्शन आहे घेणें मारुतिरायाचें १९५
राम राम म्हणत दारावरून कोण गेला
रामराया तुझा चेला मारुतिराय १९६
राम राम म्हणुनी नदींत कोण गेला
रामराया तुझा चेला मारुतिराय १९७
माझा ग दयाळू वेशीच्या बाहेर उभा
मारुतिरायाचा शेंदरी लाल झगा १९८
रामाच्या बैसली अर्धांगी सीता नारी
सेवेला ब्रह्मचारी मारुतिराय १९९
धन्य ग यशोदा नेसली कशीदा
मांडीये मुकुंदा न्हाणीयेले २००