Get it on Google Play
Download on the App Store

मायलेकरे 2

ज्या घरात पाळणा नाही ते घर शून्य. दिव्यात वात, शिंपल्यात मोती, झाडाला फूलफळ, तसे घराला मूल, पाळण्यात बाळाला निजवताना अंथरूणसुध्दा किती छान केलेले असते :

अंथरूण केलें            पांघरूण शेला
निजविते तुला                तान्हें बाळा ॥
आंथरूण केले            जाईमोगर्‍यांचे
सख्या गोजिर्‍याचे            अंग मऊ ॥
बाळासाठी केली            चिमणीशी गादी
बाळाचे सारें आधी            कवतूक ॥

अशा पाळण्यात बाळ निजते. एकटे तान्हें बाळ पाळण्यात असते. आई कामधंदा करीत असते. बाळाला कोण सांभाळील, पाळण्याकडे कोण पाहील ? आई म्हणते :

निज रे बाळका            आपुल्या पालखी
तुला रक्षण जानकी            रघुनाथ ॥

पाळणा म्हणजे जणू देवाची मांडी. रामराया तुझे रक्षण करील. नीज हो बाळ. सीतामाई तुला सांभाळील.

पहाटेची वेळ असावी. आई उठते. परंतु बाळ रडते. माता म्हणते “नको रे उठू सकाळी, सासूबाई रागावतील, ही कामाची ही राजा वेळ. आईची फजिती नको करूस.”

सकाळच्या वेळी            किती असे कामधंदा
नको रडूं रे गोविंदा            तान्हे बाळा ॥
नीज रे राजसा            नको रडूं उजाडत
येतील ओरडत                सासूबाई ॥

बाळाला आईची दया येते. तो झोपल्यासारखे करतो. आई पाळण्यात डोकावते ते खुदकन् हसतो लबाड :

मला वाटे बाळ            आहे पालखी नीजले
जाऊन बघतें                तोच खुद्कन् हांसले ॥
उघडून डोळे            पाय घालून तोंडांत
होते तान्हुले खेळत            पाळण्यांत ॥

असे हे गोरे-गोमटे आईचे बाळ. त्याला माऊली किती जपते. तिला वाटते याला दृष्ट झाली. दृष्टीच्या ओव्या किती तरी आहेत: बाळ दिसते सुंदर. का नाही दृष्ट पडणार ?

तान्ह्या रे तान्हीका        बाळा रे माणीका
तुझ्या रे श्रीमुखा                लिंबलोण ॥
दृष्ट मी काढूं किती        मीठमोहर्‍या काळी माती
गोरेपणा जणूं किती            तान्हे बाळाच्या ॥

बाळाचे गोरेपण- म्हणून दृष्ट पडते. हे गोरेपण कसे लपवायचे ? मुलाकडे कोणी टक लावून पाहू लागले की मातेच्या हृदयाचे पाणी पाणी होते :

नका बाळाकडे            असे पाहूं टकामका
चित्ताला लागे धका            माउलीच्या ॥

बाप मुलाला घेऊन सभेमध्ये गेला. तेथल्या लोकांची दृष्ट लागली बाळाला:

माळयाला ताकीद        विसबंदाच्या रोपांची
तान्ह्या बाळा दृष्ट लागली        सभेमधल्या लोकांची ॥

विसबंदीच्या पाल्याने दृष्ट काढतात. विसबंद म्हणजे मेंदी. दृष्टीचे विष बंद करणारा वेल. कोणी जर विचारले उगीच का शंका घेता दृष्ट पडली म्हणून, तर आई म्हणते, हातातल्या मनगट्या बघा सैल झाल्या :

कोणें दृष्ट केली            तान्हेबाळा सोनटक्क्या
बिंदुली मनगटया            सैल झाल्या ॥

बाळाला सोनटक्क्या म्हटले आहे. सोनटक्क्याचे फूल अति सुकुमार व सुवासिक असते. ते क्षणात कोमेजते. काही काही दृष्टीच्या ओव्या वाचा :

हात रे कुतर्‍या            छुत रे मांजरा
तान्हे बाळाच्या काजळा            दृष्ट पडे ॥
जळो जळो दृष्ट            मीठाचे झालें पाणी
बाळ माझें फुलावाणी            कोमेजलें ॥

स्त्रीजीवन

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
बहिण-भाऊ 1 बहिण-भाऊ 2 बहिण-भाऊ 3 बहिण-भाऊ 4 बहिण-भाऊ 5 बहिण-भाऊ 6 बहिण-भाऊ 7 बहिण-भाऊ 8 बहिण-भाऊ 9 बहिण-भाऊ 10 बहिण-भाऊ 11 बहिण-भाऊ 12 बहिण-भाऊ 13 बहिण-भाऊ 14 बहिण-भाऊ 15 बहिण-भाऊ 16 बहिण-भाऊ 17 बहिण-भाऊ 18 बहिण-भाऊ 19 बहिण-भाऊ 20 बहिण-भाऊ 21 बहिण-भाऊ 22 बहिण-भाऊ 23 बहिण-भाऊ 24 बहिण-भाऊ 25 मायलेकरे 1 मायलेकरे 2 मायलेकरे 3 मायलेकरे 4 मायलेकरे 5 मायलेकरे 6 मायलेकरे 7 मायलेकरे 8 मायलेकरे 9 मायलेकरे 10 मायलेकरे 11 मायलेकरे 12 मायलेकरे 13 मायलेकरे 14 मायलेकरे 15 मायलेकरे 16 मायलेकरे 17 मायलेकरे 18 मायलेकरे 19 मायलेकरे 20 मायलेकरे 21 मायलेकरे 22 मायलेकरे 23 मायलेकरे 24 मायलेकरे 25 मायलेकरे 26 मायलेकरे 27 मायलेकरे 28 मायलेकरे 29 मायलेकरे 30 मायलेकरे 31 मायलेकरे 32 मायलेकरे 33 मायलेकरे 34 मायलेकरे 35 मायलेकरे 36 मायलेकरे 37 मायलेकरे 38 मायलेकरे 39 मुलगी 1 मुलगी 2 मुलगी 3 मुलगी 4 मुलगी 5 मुलगी 6 मुलगी 7 मुलगी 8 मुलगी 9 मुलगी 10 मुलगी 11 मुलगी 12 मुलगी 13 मुलगी 14 मुलगी 15 मुलगी 16 मुलगी 17 मुलगी 18 मुलगी 19 मुलगी 20 मुलगी 21 सुखदु:खाचे अनुभव 1 सुखदु:खाचे अनुभव 2 सुखदु:खाचे अनुभव 3 सुखदु:खाचे अनुभव 4 सुखदु:खाचे अनुभव 5 सुखदु:खाचे अनुभव 6 सुखदु:खाचे अनुभव 7 सुखदु:खाचे अनुभव 8 सुखदु:खाचे अनुभव 9 सुखदु:खाचे अनुभव 10 सुखदु:खाचे अनुभव 11 सुखदु:खाचे अनुभव 12 सुखदु:खाचे अनुभव 13 सुखदु:खाचे अनुभव 14 सुखदु:खाचे अनुभव 15 सुखदु:खाचे अनुभव 16 सुखदु:खाचे अनुभव 17 सुखदु:खाचे अनुभव 18 सुखदु:खाचे अनुभव 19 सुखदु:खाचे अनुभव 20 सुखदु:खाचे अनुभव 21 सुखदु:खाचे अनुभव 22 सुखदु:खाचे अनुभव 23 सुखदु:खाचे अनुभव 24 सुखदु:खाचे अनुभव 25 सुखदु:खाचे अनुभव 26 सुखदु:खाचे अनुभव 27 सुखदु:खाचे अनुभव 28 सुखदु:खाचे अनुभव 29 सुखदु:खाचे अनुभव 30 सुखदु:खाचे अनुभव 31 सुखदु:खाचे अनुभव 32 सुखदु:खाचे अनुभव 33 सुखदु:खाचे अनुभव 34 सुखदु:खाचे अनुभव 35 सुखदु:खाचे अनुभव 36 सुखदु:खाचे अनुभव 37 सुखदु:खाचे अनुभव 38 सुखदु:खाचे अनुभव 39 सुखदु:खाचे अनुभव 40 देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 1 देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 2 देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 3 देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 4 देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 5 देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 6 देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 7 देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 8 देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 9 देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 10 देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 11 देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 12 देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 13 देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 14 देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 15 देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 16 देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 17 देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 18 देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 19 देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 20 देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 21 तीर्थक्षेत्रे, पुरेपट्टणे 1 तीर्थक्षेत्रे, पुरेपट्टणे 2 तीर्थक्षेत्रे, पुरेपट्टणे 3 तीर्थक्षेत्रे, पुरेपट्टणे 4 तीर्थक्षेत्रे, पुरेपट्टणे 5 तीर्थक्षेत्रे, पुरेपट्टणे 6 तीर्थक्षेत्रे, पुरेपट्टणे 7 तीर्थक्षेत्रे, पुरेपट्टणे 8 तीर्थक्षेत्रे, पुरेपट्टणे 9 तीर्थक्षेत्रे, पुरेपट्टणे 10 तीर्थक्षेत्रे, पुरेपट्टणे 11 तीर्थक्षेत्रे, पुरेपट्टणे 12 तीर्थक्षेत्रे, पुरेपट्टणे 13 ऐतिहासिक व देशाच्या 1 ऐतिहासिक व देशाच्या 2 ऐतिहासिक व देशाच्या 3 ऐतिहासिक व देशाच्या 4 ऐतिहासिक व देशाच्या 5 ऐतिहासिक व देशाच्या 6 ऐतिहासिक व देशाच्या 7 ऐतिहासिक व देशाच्या 8 ऐतिहासिक व देशाच्या 9 ऐतिहासिक व देशाच्या 10 व्रते, सण वगैरे 1 व्रते, सण वगैरे 2 व्रते, सण वगैरे 3 व्रते, सण वगैरे 4 व्रते, सण वगैरे 5 व्रते, सण वगैरे 6 ऋतुवर्णन, सृष्टिवर्णन 1 ऋतुवर्णन, सृष्टिवर्णन 2 ऋतुवर्णन, सृष्टिवर्णन 3 ऋतुवर्णन, सृष्टिवर्णन 4 ऋतुवर्णन, सृष्टिवर्णन 5 ऋतुवर्णन, सृष्टिवर्णन 6 ऋतुवर्णन, सृष्टिवर्णन 7 ऋतुवर्णन, सृष्टिवर्णन 8 पहिली माझी ओवी 1 पहिली माझी ओवी 2 पहिली माझी ओवी 3 पहिली माझी ओवी 4 पहिली माझी ओवी 5 पहिली माझी ओवी 6 सुभाषिते 1 सुभाषिते 2 सुभाषिते 3 सुभाषिते 4 सुभाषिते 5 सुभाषिते 6 सुभाषिते 7 संकीर्ण 1 संकीर्ण 2 संकीर्ण 3 संकीर्ण 4 संकीर्ण 5 संकीर्ण 6 संकीर्ण 7 संकीर्ण 8 संकीर्ण 9 संकीर्ण 10 संकीर्ण 11 सुंदर पत्रे 31 भारतीय संस्कृती 52