प्राप्त होय जे निधान करि ...
अभाग्याच्या घरी बाबा कामधेनु आली, या चालीवर
प्राप्त होय जे निधान करि ते दवडु नये वाया ।
चार मास गृहि ठेवुनि घेऊ सुखदा यतिराया ।प्रा० ॥धृ०॥
आयासावाचुनि ती आम्हा सत्संगति घडते ।
दुर्मिळ जे वच गृहस्थासि ते सहज कानि पडते ।
सूर्योदय होतांचि तमापरि पातक ते दडते (चाल) होय नित्य दर्शन त्याचे तरि सार्थक जन्मुनिया प्रा०॥१॥
वसंती बघुनि मेनकेला । गाधिजमुनिने निज सुतपावरि उदकांजलि दिधला । पराशर मोहुनिया गेला ।
नौकेमाजी धीवर-कन्यासंगोत्सुक झाला । वसिष्ठहि ब्रह्मनिष्ठ कसला ।
परि स्नुषेवरि लोभ धराया मनि नच तो विटला ॥१॥