बघुनि उपवना विरहाग्नीची ज...
राग पिलु - ताल धुमाळी
बघुनि उपवना विरहाग्नीची ज्वाला भडके उरी
पुष्पांचा तो सुगंध माझ्या शूल निपजवी शिरी
कोकिल - कूजित ऐकुनि वाटे वीज कडाडे वरी
कारंजाचे तुषार भासति अग्निकणाचे परी
सुमंद शीतल सुगंध मारुत येता अंगावरी
थरथर काळिज कापे वाटे डाग बसति अंतरी
(चाल) पक्ष्यांचि जोडपी खेळति नानापरी
दे तंतुस हंसही स्त्रीच्या वदनांतरी
सुखवाया कांता मोर सुनृत्या करी (चाल)
जिकडे-तिकडे पाहुनी ऐसे होते मी घाबरी
मजला मग घायळचि करितो मन्मथ आपुल्या शिरी ॥१॥