प्रियकर माझे भ्राते मजवरी...
पडता वेणुरव कानी, या चालीवर
प्रियकर माझे भ्राते मजवरी निष्ठुरता ह्रदयी धरिती ।
कर्मगति अशी कैशी झाली आप्त सर्व वैरी होती ॥धृ०॥
आशा बहु कृष्णावरती । होती निष्फळ झाली ती ।
माताताताची गणती ।
वृद्ध म्हणुनि कोणी न करिती । सर्वही दादाच्या हाती ।
त्याला कोणी नच वदती ।
अंधसुताने वरण्याहुनि मज मृत्यु बरा वाटे चित्ती ।प्रि० ॥१॥