नाही झाले षण्मास मला राज्...
राग झिंझोटी - ताल दादरा
नाही झाले षण्मास मला राज्य सोडुनी ।
तोच विपरीत हे काय ऐकण्यात ये जनी । नाही० ॥धृ०॥
काय माझा तो भाग अंधपुत्र सेवितो ।
काय देवकिचा तनय कृष्ण वचन मोडितो ।
काय हलधर नवरत्न मर्कटासि अर्पितो ।
नवल हेचि मन्मनी । नाही० ॥१॥