दैवयोग दुर्विपाक आजि जाहल...
वासुदेवि रंगतांचि, या चालीवर
दैवयोग दुर्विपाक आजि जाहला
पुण्यबळे प्राप्त लाभ मीच दवडिला ॥धृ०॥
धर्मशद्बभये केलि मनी वानवा ।
नाहि खचित सोडिलि इस भिउनि यादवा
दिधले असतेचि बळी सर्व गांडिवा
काय वदू फसलि गोष्ट मार्ग खुंटला ।दै० ॥१॥