गुरुजी तुमच्या प्रीतिस पा...
उधोजी प्यारे दिलकी दिलमें रही, या चालीवर
गुरुजी तुमच्या प्रीतिस पार नसे, प्रीतिस पार नसे ।गुरु० ॥धृ०॥
आळ कठिण मजवर की होता मुक्तचि केले असे ।गुरु० ॥१॥
शिष्यतापहरिणी तव वाणी भरली अमृतरसे ।गुरु० ॥२॥
कोण दयाधन तुजसम आहे तारक जो विलसे ।गुरु०॥३॥