नाहि सुभद्रा या वार्तेते ...
अभाग्याचे घरी बाबा कामधेनु आली, या चालीवर
नाहि सुभद्रा या वार्तेते जेव्हा आयकिले ।
सर्वांगाची लाहि होउनि काळिज चरचरले ।नाहि० ॥धृ०॥
एकवार वाटे की क्रोधे तिने प्राण दिधले ।
एकवार वाटे की तिजला पार्थाने नेले ॥
एकवार वाटे तू तिजला कपटे लपवीले ।
ऐसे माझ्या मनात नाना तरंग ते आले ॥नाहि०॥१॥