मी कुमार तीहि कुमारी असता...
उद्धवा शांतवन कर जा, या चालीवर
मी कुमार तीहि कुमारी असताना जागी एका ।
वाढलो खेळलो प्रेमे प्रिय झालो एकमेका ।
वरिल ती सुभद्रा मजला हा निश्चय सर्वा लोका ।
(चाल) तैशांत रामकृष्णांनी ।
वडिलांचे मत घेवोनी ।
मज दिधलीऐसे म्हणुनि ।
शेवट मग केला हा का (चाल) जो प्रीतितरु वाढविला ।
त्यांनीच कसा तोडविला ॥१॥