लग्नाला जातो मी द्वारकापु...
राग बिहाग - ताल दादरा
लग्नाला जातो मी द्वारकापुरा ।
देतो निज भगिनि राम कौरवेश्वरा ॥धृ०॥
उत्सव बहु थोर होत । मिळतिल भूपाल अमित ।
सुर नर मुनि सर्व येत । नट नर्तक सकल जमत ।
न मिळे अशि मौज पुन्हा पाहण्या नरा ॥१॥