जी जी कर्मे त्या योग्याच्...
भूपाळीच्या चालीवर
जी जी कर्मे त्या योग्याच्या हस्ताने घडती
निष्कामत्वे सहजपणे ती झालीशी दिसती
हासे बोले विषयि जनांसह परि ती त्याचि मती
गुंतुनि गेली ऐसे वाटे सद्रूपावरती
ब्रह्मानंदी मग्न सदा तो भान व तनुवरती
डुलुनि राहिला सौख्यसागरी सेवित भरभरती ॥१॥