बघुनि सुभद्रेला । कसा यति...
अस्तमान झाला, टाकुनि युद्ध राम आला, या चालीवर
बघुनि सुभद्रेला । कसा यति वेडावुन गेला ॥धृ०॥(चाल)
हस्तांतिल ती गोमुखि गळली । आशीर्वचनी जिव्हा चळली ।
नासिकाग्र दृष्टीही वळली (चाल) निर्लज्जचि झाला ।
टकमक मुख ते बघण्याला । बघुनि० ॥१॥