पावना वामना या मना । दे...
गर्भाच्या चालीवर
पावना वामना या मना ।
दे तव भजनी निरंतर
वासना ॥धृ०॥
श्रीवत्सांकित कौस्तुभधारिन ।
योगिजनांतररंजना ॥१॥
भो प्रर्हादपरा हरिरूपा ।
मत्तनिशाचरकंदना ॥२॥
नवतुलसीदलमालाभूषी ।
बलवद्भवभयभंजना ॥३॥