अर्जुन तर संन्यासि होउनि ...
शिवाज्ञेची वाट न पाहता, या चालीवर
अर्जुन तर संन्यासि होउनि रैवतकी बसला ।
झालि सुभद्रा नष्ट असा ग्रह त्याच्या मनि ठसला ।
वैराग्याचा पुतळा केवळ सांप्रत तो बनला ।
ब्रह्मनिष्ठ वेदान्ती होउनि तुच्छ मानितो विषयाला ।
प्राणायामे कुंभक करुनी साधित योगाला ।
सुभद्रेची मूर्ती ह्रदयी धरुनि करितसे ध्यानाला ॥चाल॥
ही एक गोष्ट मज अनुकूलचि जाहली । की ढोंग नसुनि खरि वृत्ति यतिस साधली ।
नासिकाग्र दृष्टी सर्वकाल लागली ॥चाल॥
भोळे अमुचे दादा तेथे जाति दर्शनाला ।
तरी खचित सांगतो तयाच्या लागति नादाला ॥१॥