बलसागर तुम्हि वीरशिरोमणि ...
राग पिलू - ताल धुमाळी
बलसागर तुम्हि वीरशिरोमणि कोठे तरि रमला ।
आश्वासन जिस दिले तिला का विसरुनिया गेला ॥धृ०॥
पेरियले जे प्रीतितरूचे बीज ह्रदयि त्याला ।
अंकुर येउनि सुदृढ तयाचा वृक्ष असे झाला ।
सुंदर तुम्ही मूर्तिमान तच्छायेला बसला ।
चित्र असे ह्रदयांत कोंदता ठाव न अन्याला ॥