होतो द्वारकाभुवनी । पाहिल...
कर्पुरधवलांगा, या कर्नाटकी चालीवर
होतो द्वारकाभुवनी । पाहिली प्रिया नयनी । पूर्ण होती मला वशिनी ।
कसा शठ ती वरिल कामिनी । होतो ॥धृ०॥
ती तरुणी मजला निरखुनि वर शशिकर-विकसित कुमुदिनीपरि हरिखुनि किंचित मुरडुनि मधुर स्मित करि करि गमनि ।
होतो० ॥१॥