Get it on Google Play
Download on the App Store

द्रौपदी-सत्यभामा-संवाद

पांडव वनात राहत असताना अनेक श्रेष्ठ ब्राह्मण व ऋषी त्यांच्या भेटीस येत. धौम्य, नारद, व्यास, मार्कंडेय अशा श्रेष्ठ मुनींशी युधिष्ठिराचा संवाद झाला व त्याला त्यांच्या उपदेशातून धर्म व नीतीविषयीचे विपुल ज्ञान मिळाले. एकेकाळी राजवैभवात लोळणारे पाच पांडव दैवगतीमुळे द्वैत, काम्यक अशा वनातून भ्रमण करीत कष्टमय जीवन जगत होते. अर्जुनाचे अस्त्रप्राप्तीसाठी प्रयाण, किरातार्जुनयुद्ध, नलोपाख्यान, अजगरापासून भीमाची सुटका इत्यादी विषयांच्या विवेचनानंतर श्रीकृष्ण भार्यांसह पांडवांकडे आलेला असताना सत्यभामा व द्रौपदी यांचा एका रात्री एकांतात जो संवाद होतो त्याचे वर्णन आले आहे. सत्यभामेने अगदी मार्मिक प्रश्न विचारला आहे. द्रौपदीने आपल्या पाचही पतींना इतके कसे बरे वश करुन घेतले आहे----हा तो प्रश्न ! द्रौपदी तिला उत्तर देते आणि आपले रहस्य सांगते.

द्रौपदी-सत्यभामा-संवाद

तुला सांगते मी पती वश कशाने

सुखी ठेविले मी तयां शुश्रुषेने ॥धृ॥

असे पांडवांची सखे पट्टराणी

परी वर्तने सेविका गे म्हणोनी

पती श्रेष्ठ त्यांची मने ती धरोनी

सदा चालले मी सखे नम्रतेने ॥१॥

पहाणे तसे बोलणे चालण्यात

दिसावा न त्या दोष माझ्या कृतीत

असे वागणे ठेविले जीवनात

तयां प्रीय जे तेच केले श्रमाने ॥२॥

रुचीयुक्‍त त्यांना सदा अन्न देते

गृहा स्वच्छ ठेवून त्या भूषवीते

अनुकूल त्या तेच मी आचरीते

असे धर्म माझा तयां तोषवीणे ॥३॥

जरी अन्य भार्या असती तयांना

तरी द्वेष त्यांचा कधी वाटला ना

सदा पाळिले मी कुळाच्या रितींना

मला सोपिल्या ज्या स्वये त्या पृथेने ॥४॥

असो देव, गंधर्व, नरवीर, ज्ञानी

कधी या मनासी रुचला न कोणी

पतीधर्म हा मी सदा श्रेष्ठ मानी

पतींना दिले सर्व माझे मनाने ॥५॥

पती दूर जाता कधी गे प्रवासा

करी वर्ज्य मी लेप, पुष्पे, सुवासा,

सदा वाढवी आमुच्या प्रेमपाशा

पतीच्या हिताची सखे पाहि स्वप्ने ॥६॥

कुणाही स्त्रियेसी पती हाच देव

पती-कार्य हे आपुले गे सदैव

खरा धर्म स्त्रीचा असे एकमेव

पतीच्या सदा राहवे आश्रयाने ॥७॥

पतींना सदा भोजने तोषवीले

मुखी हास्य ठेवून गृहकृत्य केले

मनी दुःख ते अंतरी ठेवियेले

सदा इंद्रप्रस्थी दिली मी ग दाने ॥८॥

पतिंच्या अधी मी उठे गे प्रभाती

निजे ना तयांच्या अधी हीच रीती

करी कष्ट घेऊन कर्तव्यपूर्ती

सुखी होतसे मी तयांच्या सुखाने ॥९॥

गीत महाभारत

महर्षी व्यास
Chapters
प्रस्तावना व्यासांची संहिता कुरुकुळातील देवव्रत भीष्मप्रतिज्ञा सत्यवतीची चिंता भीष्माचे प्रत्युत्तर व्यासजन्मकथन व्यासांना विनंती गांधारी-विवाह कुंतीचा कर्णासाठी शोक पांडव-जन्मकथन पांडू राजाचे निधन द्रोणांची शिष्यपरीक्षा प्रेक्षणगृह-प्रसंग भीम-विषप्रयोग लाक्षागृहदाह विदुर-संदेश हिडिम्बेचे निवेदन ब्राह्मणाचा निश्चय बकासुरवध द्रौपदीस्वयंवर दुर्योधनाचे बेत कृष्णाची अग्रपूजा दुर्योधन मयसभेत द्यूतप्रसंग द्रौपदी-वस्त्रहरण अनुद्यूत आणि वनवास कुंतीचा शोक द्रौपदीचा संताप द्रौपदी-सत्यभामा-संवाद द्रौपदीचे अपहरण सूर्याचे आवाहन कर्णाचे सूर्यास उत्तर यक्षप्रश्न कीचकवध कृष्ण्साहाय्य संजय-भाषण युधिष्ठिराचा निरोप युधिष्ठिराची चिंता कृष्णाचे उत्तर कृष्णशिष्टाई धृतराष्ट्राचा उपदेश गांधारीचा उपदेश दुर्योधनाचे उत्तर कुंतीचे मनोगत कर्णाचे कृष्णास उत्तर कुंती-कर्ण-संवाद कर्णाचे कुंतीला उत्तर शिखण्डीचे वृत्त भगवंताची अमरवाणी अनन्यभक्‍तीचा मार्ग धर्माला आशीर्वाद भीष्मपतन भीष्म-कर्ण-भेट भीष्मांचा दुर्योधनाला उपदेश अभिमन्यु प्रताप द्रोणनिधन कर्णार्जुनयुद्ध दुर्योधन-कृप-संवाद युद्धाचा अंतिम दिन दुर्योधनाचे पलायन भीम-दुर्योधन-गदायुद्ध दुर्योधनाचे अंतिम शब्द कृष्णाचे सडेतोड उत्तर अश्वत्थाम्याचा कट द्रौपदीचा विलाप गांधारीचा शोक धर्माचा शोक युधिष्ठिराचे मनोगत अर्जुनाचे आवाहन विदुराचा अंत धृतराष्ट्र निधन यादवांचा नाश स्वर्गाकडे प्रयाण स्वर्ग प्रवेश अंतिम गती परिक्षिताचा अंत कृष्णाला अभिवादन आदर्श पुरुष थोर स्त्रिया