Get it on Google Play
Download on the App Store

क्रांती 160

२६. सुटका

रामदासकडे मायेकडून जेवण जात असे. प्रथम ती स्वतः नेऊन देत असे. रामदासजवळ कुशलावार्ता बोलू शकत असे. परंतु पुढे ते बदलले. माया रामदासच दृष्टीस पडू शकत नसे. शिपाई पुढे येई व डबा घेऊन नेऊन देई. माया बाहेर बसे. प्रद्योतसंबंधीची वार्ता रामदासला कळली नाही, 'वकील वगैरे काही नको', पुढे पाहू' रामदास म्हणे.

आंनदमोहन अलीकडे धनगावातलच होते. त्यांनी रमेशबाबू व अक्षयकुमार यांना निघून येण्याविषयी लिहीले. त्यांचे मायेला 'येत आहोत,' असे पत्र आले. दयाराम सोनखेडीहून आला होता. रमेशबाबूंशी त्याचा परिचय होता. मायेच्या विवाहाच्या वेळचा परिचय, दयाराम स्टेशनवर गेला. त्याने दोघांना मायेच्या खोलीत आणले. मायेला रडू आले. रमेशबाबूंनी तिला शांत केले. मायेने प्रद्योतची सर्व हकीगत घरी कळविलीच होती. आनंदमोहन यांनी प्रद्योत व माया यांची बोलणी, प्रद्योतच परिवर्तन सर्व काही बाहेरून पाहिले होते. त्यांनीही साद्यंत वृत्त अक्षयबाबूंस लिहिले होते. शेवटी सारे चांगले होईल असे भविष्य कळविले होते.

''माया, प्रद्योतला शेवटी तू मुक्त केलंस. वेडेपणातून मुक्त केलंस. आमचे उपाय हरले होते. परंतु तुझी पुण्याई उपयोगी पडली.'' अक्षयबाबू म्हणाले.

''माझी पुण्याई नाही अक्षयकाका. ही तुमची पुण्याई. स्वतःच्या मुलाची निराशा दिसत असूनही तुम्ही मला आग्रह केला नाही. माझ्या लग्नाला आशीर्वाद दिलात. 'तुझा संसार सुखाचा होवो' असं मोठया मनानं म्हटलंत. त्या आशीर्वादाच्या बळावर हे सारं होत आहे. त्या आशीर्वादानं ही संकटं आम्ही तरून जाऊ.'' माया म्हणाली.

इतक्यात आनंदमोहन तेथे आले. मित्रांनी त्यांचे स्वागत केले.

''माया, हे आनंदमोहन, माझे जुने मित्र. यांच्यामुळे हे सारं शेवटी गोड होणार आहे. यांची मदत.'' अक्षयकुमार म्हणाले.

''माया, माझ्या बहिणीशी शेवटी प्रद्योतचं लग्न लावून दे बरं का, तू नाही केलंस तर नाही. परंतु दुसरी बायको त्याला देशील की नाही? मृणालिनी चांगली आहे, तुला आवडेल.'' आनंदमोहन म्हणाले.

''कोण मृणालिनी? ती महापुराच्या वेळेला स्वयंसेविका झाली होती का?'' मायेने विचारले.

''हो. झाली होती. तिच्या मामाबरोबर ती गेली होती. तिचे मामा महापूर साहाय्यक समितीत होते.''

''मृणालिनी आहे माझ्या ओळखीची. प्रथम तिचं व माझं भांडण होई. ती बंगालची अभिमानी ! महाराष्ट्रीय लोकांना नावं ठेवी. परंतु पुढे मत पालटलं. ती व मी मैत्रिणी झालो. तिच्या मनात एका महाराष्ट्रीय मजुराच्या आलेल्या शर्टानं क्रांती केली. मृणालिनी सुंदर आहे. बाबा, तुमच्या मायेपेक्षा ती किती तरी सुंदर आहे.  प्रद्योतला बंगालचा अभिमान, मृणालिनीलाही तसाच अभिमान. दोघांची जणू पत्रिका जुळली. परंतु प्रद्योतचं लग्न मृणालिनीशी होण्यापूर्वी मी तुम्हाला अट घालीन ती पार पाडली पाहिजे.'' माया म्हणाली.

''नोकरी सोडण्याशिवाय इतर कोणतीही अट घाल.'' आनंदमोहन म्हणाले.

क्रांती

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
क्रांती 1 क्रांती 2 क्रांती 3 क्रांती 4 क्रांती 5 क्रांती 6 क्रांती 7 क्रांती 8 क्रांती 9 क्रांती 10 क्रांती 11 क्रांती 12 क्रांती 13 क्रांती 14 क्रांती 15 क्रांती 16 क्रांती 17 क्रांती 18 क्रांती 19 क्रांती 20 क्रांती 21 क्रांती 22 क्रांती 23 क्रांती 24 क्रांती 25 क्रांती 26 क्रांती 27 क्रांती 28 क्रांती 29 क्रांती 30 क्रांती 31 क्रांती 32 क्रांती 33 क्रांती 34 क्रांती 35 क्रांती 36 क्रांती 37 क्रांती 38 क्रांती 39 क्रांती 40 क्रांती 41 क्रांती 42 क्रांती 43 क्रांती 44 क्रांती 45 क्रांती 46 क्रांती 47 क्रांती 48 क्रांती 49 क्रांती 50 क्रांती 51 क्रांती 52 क्रांती 53 क्रांती 54 क्रांती 55 क्रांती 56 क्रांती 57 क्रांती 58 क्रांती 59 क्रांती 60 क्रांती 61 क्रांती 62 क्रांती 63 क्रांती 64 क्रांती 65 क्रांती 66 क्रांती 67 क्रांती 68 क्रांती 69 क्रांती 70 क्रांती 71 क्रांती 72 क्रांती 73 क्रांती 74 क्रांती 75 क्रांती 76 क्रांती 77 क्रांती 78 क्रांती 79 क्रांती 80 क्रांती 81 क्रांती 82 क्रांती 83 क्रांती 84 क्रांती 85 क्रांती 86 क्रांती 87 क्रांती 88 क्रांती 89 क्रांती 90 क्रांती 91 क्रांती 92 क्रांती 93 क्रांती 94 क्रांती 95 क्रांती 96 क्रांती 97 क्रांती 98 क्रांती 99 क्रांती 100 क्रांती 101 क्रांती 102 क्रांती 103 क्रांती 104 क्रांती 105 क्रांती 106 क्रांती 107 क्रांती 108 क्रांती 109 क्रांती 110 क्रांती 111 क्रांती 112 क्रांती 113 क्रांती 114 क्रांती 115 क्रांती 116 क्रांती 117 क्रांती 118 क्रांती 119 क्रांती 120 क्रांती 121 क्रांती 122 क्रांती 123 क्रांती 124 क्रांती 125 क्रांती 126 क्रांती 127 क्रांती 128 क्रांती 129 क्रांती 130 क्रांती 131 क्रांती 132 क्रांती 133 क्रांती 134 क्रांती 135 क्रांती 136 क्रांती 137 क्रांती 138 क्रांती 139 क्रांती 140 क्रांती 141 क्रांती 142 क्रांती 143 क्रांती 144 क्रांती 145 क्रांती 146 क्रांती 147 क्रांती 148 क्रांती 149 क्रांती 150 क्रांती 151 क्रांती 152 क्रांती 153 क्रांती 154 क्रांती 155 क्रांती 156 क्रांती 157 क्रांती 158 क्रांती 159 क्रांती 160 क्रांती 161 क्रांती 162 क्रांती 163 क्रांती 164 क्रांती 165 क्रांती 166 क्रांती 167 क्रांती 168 क्रांती 169 क्रांती 170 क्रांती 171 क्रांती 172 क्रांती 173