Get it on Google Play
Download on the App Store

क्रांती 32

5. प्रयाण

रामदासची सातवी यत्ता संपली; पुढे काय करावयाचं? एके दिवशी मुकुंदराव व तो रामपूरच्या नदीतीरी बोलत बसले होते. बहुळा नदीचा प्रवाह मोठा सुंदर दिसत होता. एके ठिकाणी लहानसा धबधबा पडत होता. ध्येयाला मिळवण्यासाठी नदी निःशंकपणे उडी घेत होती. स्वच्छ पाण्याचा फेस तेथे उसळत होता. नदीतील दिव्यता तेथे प्रकट होत होती.

''दगडधोंडयांशी टक्कर घेतल्याशिवाय ही दिव्यता दिसली असती का? नदीचं हे निर्मल यश बाहेर उसळत आहे. तिच्या त्यागातून हे वैभव प्रकट होत आहे. तिच्या मरणातून तिला अमर जीवन मिळत आहे.'' मुकुंदराव म्हणाले.

''ध्येयप्राप्तीसाठी मार्गावरील सर्व विरोधांवर निकराचा हल्ला चढवला पाहिजे.'' रामदास म्हणाला.

''मग तू तुझ्या ध्येयप्राप्तीचं काय ठरविलंस ! हिंदुस्थानातील सर्व मोठ-मोठे आश्रम पाहून येणार ना? निरनिराळया महान संस्थांतून थोडेथोडे दिवस राहून येणार ना? महात्माजींच्या तत्त्वाप्रमाणे चालणारे आश्रम पाहा. गुरुकुलं पाहा. रामकृष्ण परमहंसांच्या शिष्यांनी चालविलेल्या संस्था पाहा. गुरुदेव रवींद्रनाथांच्या विश्वभारतीत जाऊन तेथील वास घेऊन ये. जा. विशाल दृष्टीचा, मोठया मनाचा होऊन ये. विशाल भारताचा परिचय करून घे. विशाल भारतात ठायी ठायी कशी कामं चालली आहेत. ठिकठिकाणी कसे प्रश्न आहेत ते पाहा. बिहारमधील किसानांची संघटना बघ. कानपूर, कलकत्ता येथील कामगारांच्या पोलादी संघटना पाहून घे. नवीन ओळखी जोड. नवीन भाषा शिक. नवभारताला संकुचित प्रांताभिमान नको आहे. आपल्या पूर्वजांनी पूजेमधील कलशात सारा हिंदुस्थान पाहावयास आपणास शिकवले आहे.

गंगे च यमुने चैव गोदावरि सरस्वति
नर्मदे सिंधुकावेरि जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु ॥


असे आपण म्हणतो. सार्‍या नद्या देवघरातील त्या तांब्यात मी पाहतो. माझ्या या मस्तकात सार्‍या हिंदुस्थानचा विचार हवा. रामदास, हे ध्येय तुझे. तू त्यासाठी जग. त्यासाठी मर.'' मुकुंदराव सांगत होते.

''मी आधी विश्वभारतीत जाईन. तेथे काही वर्षं राहून मग हिंडेन फिरेन म्हणतो. संगीतवादनाचा काही अभ्यास करावा असंही मनात आहे. बंगालमधील अभयाश्रम, खादीप्रतिष्ठान वगैरेही सुटीत पाहीन. परंतु मुख्य केंद्र विश्वभारती. तुम्ही याल का माझ्याबरोबर? तुम्ही चला. येथे तरी तुम्ही कोठे राहणार?''

''रामदास, शेतकर्‍यांत व कामगारांत वणवा पेटवून द्यावा, असं माझ्या मनात येत आहे. त्यांची हलाखी पाहून हृदयाचं पाणी होतं. मी आता विश्वभारतीत येणं म्हणजे तो माझा बौध्दिक विलास होईल.'' मुकुंदराव म्हणाले.

''थोडे दिवस या. मी एकदा तेथे रुळेपर्यंत या. मला नाही म्हणू नका. तुम्ही मग निघून जा. मी आग्रह करणार नाही.'' रामदासने प्रार्थना केली.

''बरं तर, येईन. थोडे दिवस त्या पवित्र स्थानी राहून परत येईन.'' मुकुंदराव म्हणाले.

नदीतीरावरील शिवालयात घंटा वाजली.

''घंटा वाजली, देवानं संमती दिली.'' रामदास म्हणाला.

''तुझे गोविंदराव फार आढेवेढे नाही ना घेणार?'' मुकुंदरावांनी विचारले.

क्रांती

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
क्रांती 1 क्रांती 2 क्रांती 3 क्रांती 4 क्रांती 5 क्रांती 6 क्रांती 7 क्रांती 8 क्रांती 9 क्रांती 10 क्रांती 11 क्रांती 12 क्रांती 13 क्रांती 14 क्रांती 15 क्रांती 16 क्रांती 17 क्रांती 18 क्रांती 19 क्रांती 20 क्रांती 21 क्रांती 22 क्रांती 23 क्रांती 24 क्रांती 25 क्रांती 26 क्रांती 27 क्रांती 28 क्रांती 29 क्रांती 30 क्रांती 31 क्रांती 32 क्रांती 33 क्रांती 34 क्रांती 35 क्रांती 36 क्रांती 37 क्रांती 38 क्रांती 39 क्रांती 40 क्रांती 41 क्रांती 42 क्रांती 43 क्रांती 44 क्रांती 45 क्रांती 46 क्रांती 47 क्रांती 48 क्रांती 49 क्रांती 50 क्रांती 51 क्रांती 52 क्रांती 53 क्रांती 54 क्रांती 55 क्रांती 56 क्रांती 57 क्रांती 58 क्रांती 59 क्रांती 60 क्रांती 61 क्रांती 62 क्रांती 63 क्रांती 64 क्रांती 65 क्रांती 66 क्रांती 67 क्रांती 68 क्रांती 69 क्रांती 70 क्रांती 71 क्रांती 72 क्रांती 73 क्रांती 74 क्रांती 75 क्रांती 76 क्रांती 77 क्रांती 78 क्रांती 79 क्रांती 80 क्रांती 81 क्रांती 82 क्रांती 83 क्रांती 84 क्रांती 85 क्रांती 86 क्रांती 87 क्रांती 88 क्रांती 89 क्रांती 90 क्रांती 91 क्रांती 92 क्रांती 93 क्रांती 94 क्रांती 95 क्रांती 96 क्रांती 97 क्रांती 98 क्रांती 99 क्रांती 100 क्रांती 101 क्रांती 102 क्रांती 103 क्रांती 104 क्रांती 105 क्रांती 106 क्रांती 107 क्रांती 108 क्रांती 109 क्रांती 110 क्रांती 111 क्रांती 112 क्रांती 113 क्रांती 114 क्रांती 115 क्रांती 116 क्रांती 117 क्रांती 118 क्रांती 119 क्रांती 120 क्रांती 121 क्रांती 122 क्रांती 123 क्रांती 124 क्रांती 125 क्रांती 126 क्रांती 127 क्रांती 128 क्रांती 129 क्रांती 130 क्रांती 131 क्रांती 132 क्रांती 133 क्रांती 134 क्रांती 135 क्रांती 136 क्रांती 137 क्रांती 138 क्रांती 139 क्रांती 140 क्रांती 141 क्रांती 142 क्रांती 143 क्रांती 144 क्रांती 145 क्रांती 146 क्रांती 147 क्रांती 148 क्रांती 149 क्रांती 150 क्रांती 151 क्रांती 152 क्रांती 153 क्रांती 154 क्रांती 155 क्रांती 156 क्रांती 157 क्रांती 158 क्रांती 159 क्रांती 160 क्रांती 161 क्रांती 162 क्रांती 163 क्रांती 164 क्रांती 165 क्रांती 166 क्रांती 167 क्रांती 168 क्रांती 169 क्रांती 170 क्रांती 171 क्रांती 172 क्रांती 173