Get it on Google Play
Download on the App Store

क्रांती 146

२४. तू माझा भाऊ हो

मायेला काय करावे समजेना.  घरी वडिलांना तार करावी असे तिच्या मनात आले. परंतु उगीच घाबरतील असे पुन्हा मनात येऊन तिने तार केली नाही. सर्व हकीगतीचे पत्र तिने लिहिले. येथे धीर देण्यास मुकुंदराव, मोहन, दयाराम, आनंदमूर्ती किती तरी माणसे आहेत, घाबरू नको; परंतु तिकडे काही चौकशी करा. धागादोरा काही सापडतो का पाहा, वगैरे तिने लिहिले होते.

रामदासचा भयंकर अपराध म्हणून त्याला जामिनावर सोडण्यास सरकार तयार होईना. धनगावच्या लॉकअपमध्ये रामदास होता. माया आता धनगावला राहावयास आली. मुकुंदरावांच्या खोलीशेजारीच तिने दोन खोल्या घेतल्या होत्या. ती रोज पतीला जेवण घेऊन जाई. तिला वाईट वाटे. पती तिला धीर देई. आनंदमूर्तीही मायेची करमणूक करीत तिला हसवीत.

घरी पत्र मिळाल्यावर रमेशबाबू सचिंत झाले. बंगालमध्ये असताना रामदास क्रान्तिकारकांत सामील झाला होता की काय?

परंतु दहशतवादी क्रान्तिकारक आता उरले नव्हते. पूर्वीचे दहशतवादी आता साम्यवादी होऊन किसानकामगारांत कामे करीत होते. परंतु असतील कोणी अद्याप त्या विचाराचे, कोणास ठाऊक. मायेची माता तर रडू लागली.

''कोठली पोरीला दुर्बुध्दी सुचली महाराष्ट्रीय तरुणाशी लग्न करायची; चांगला प्रद्योत होता; गावातील होता; दिवसातून चारदा माहेरी येती-जाती. परंतु दैवी नाही.'' वगैरे विलाप ती करू लागली.

मायेचा विवाह झाल्याचे कळले. त्या दिवसापासून प्रद्योत घरातून निघून गेला. त्याचा पत्ता नव्हता. वृध्द पित्याने किती तरी शोध केला. परंतु मागमूस कळेना. धागादोरा सापडेना. शेवटी ईश्वरी इच्छा म्हणून ते शांत राहिले. त्यांच्या खोलीत प्रद्योतचा मोठा फोटो होता. त्या फोटोवरच त्यांचे समाधान. शरीर म्हणजे तरी काय? मातीचा बोलका फोटो. शरीराचा हा फोटो धुळीत जातो व शेवटी कागदी फोटोच आपल्याजवळ उरतो.

रमेशबाबू अक्षयकुमारांकडे आले. अक्षयकुमार चैतन्यचरित्रामृत वाचीत होते. त्यांनी मित्राचे स्वागत केले. परंतु मित्राचा आज हसरा चेहरा नव्हता. रमेशबाबू म्हणजे जरा रंगेल माणूस. तोंडात सदा पान असायचे. आनंदी दिसायचे. एखादे गाणे गुणगुणत यावयाचे. परंतु आज तोंडात तांबूल नव्हता, ओठावर गाणे नव्हते. चेहर्‍यावर आनंदाची सहज छटा नव्हती.

''आज असे का बरं दिसता? आणि आता अवेळी का बरं आलात? मायेकडे खुशाल आहे ना? प्रद्योतचा पत्ता नाही. तुमची माया तरी सुखी असू दे.'' अक्षयबाबू म्हणाले.

रमेशबाबूंनी मायेचे पत्र मित्राच्या हाती दिले. मित्राने वाचले. दोघे स्तब्ध व सचिंत बसले.

''काय आता उपाय? मी जाऊ का मायेकडे? तिला धीर दिला पाहिजे. परप्रान्तात एकटी रडत असेल बिचारी.'' रमेशबाबू जवळजवळ रडतच बोलले.

''तुम्ही इतक्यात नका जाऊ. तेथे मयाला धीर देणारी माणसे आहेत. ते मुकुंदराव आहेत आणि माया धीराची मुलगी आहे. रडकी असती तर इतकी लांब जातीच ना.'' अक्षयबाबूंनी सांगितले.

''मग का स्वस्थ राहावयाचं? जे जे होईल ते ते नशिबावर सोपवून बसायचं? तुम्हीच काय ते सांगा. तुम्हीही दुःखी व मीही दुःखी.'' रमेशबाबू म्हणाले.

क्रांती

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
क्रांती 1 क्रांती 2 क्रांती 3 क्रांती 4 क्रांती 5 क्रांती 6 क्रांती 7 क्रांती 8 क्रांती 9 क्रांती 10 क्रांती 11 क्रांती 12 क्रांती 13 क्रांती 14 क्रांती 15 क्रांती 16 क्रांती 17 क्रांती 18 क्रांती 19 क्रांती 20 क्रांती 21 क्रांती 22 क्रांती 23 क्रांती 24 क्रांती 25 क्रांती 26 क्रांती 27 क्रांती 28 क्रांती 29 क्रांती 30 क्रांती 31 क्रांती 32 क्रांती 33 क्रांती 34 क्रांती 35 क्रांती 36 क्रांती 37 क्रांती 38 क्रांती 39 क्रांती 40 क्रांती 41 क्रांती 42 क्रांती 43 क्रांती 44 क्रांती 45 क्रांती 46 क्रांती 47 क्रांती 48 क्रांती 49 क्रांती 50 क्रांती 51 क्रांती 52 क्रांती 53 क्रांती 54 क्रांती 55 क्रांती 56 क्रांती 57 क्रांती 58 क्रांती 59 क्रांती 60 क्रांती 61 क्रांती 62 क्रांती 63 क्रांती 64 क्रांती 65 क्रांती 66 क्रांती 67 क्रांती 68 क्रांती 69 क्रांती 70 क्रांती 71 क्रांती 72 क्रांती 73 क्रांती 74 क्रांती 75 क्रांती 76 क्रांती 77 क्रांती 78 क्रांती 79 क्रांती 80 क्रांती 81 क्रांती 82 क्रांती 83 क्रांती 84 क्रांती 85 क्रांती 86 क्रांती 87 क्रांती 88 क्रांती 89 क्रांती 90 क्रांती 91 क्रांती 92 क्रांती 93 क्रांती 94 क्रांती 95 क्रांती 96 क्रांती 97 क्रांती 98 क्रांती 99 क्रांती 100 क्रांती 101 क्रांती 102 क्रांती 103 क्रांती 104 क्रांती 105 क्रांती 106 क्रांती 107 क्रांती 108 क्रांती 109 क्रांती 110 क्रांती 111 क्रांती 112 क्रांती 113 क्रांती 114 क्रांती 115 क्रांती 116 क्रांती 117 क्रांती 118 क्रांती 119 क्रांती 120 क्रांती 121 क्रांती 122 क्रांती 123 क्रांती 124 क्रांती 125 क्रांती 126 क्रांती 127 क्रांती 128 क्रांती 129 क्रांती 130 क्रांती 131 क्रांती 132 क्रांती 133 क्रांती 134 क्रांती 135 क्रांती 136 क्रांती 137 क्रांती 138 क्रांती 139 क्रांती 140 क्रांती 141 क्रांती 142 क्रांती 143 क्रांती 144 क्रांती 145 क्रांती 146 क्रांती 147 क्रांती 148 क्रांती 149 क्रांती 150 क्रांती 151 क्रांती 152 क्रांती 153 क्रांती 154 क्रांती 155 क्रांती 156 क्रांती 157 क्रांती 158 क्रांती 159 क्रांती 160 क्रांती 161 क्रांती 162 क्रांती 163 क्रांती 164 क्रांती 165 क्रांती 166 क्रांती 167 क्रांती 168 क्रांती 169 क्रांती 170 क्रांती 171 क्रांती 172 क्रांती 173