Get it on Google Play
Download on the App Store

क्रांती 48

ते बिहार व ओरिसा प्रांतात फिरले. जागृत किसानांच्या प्रचंड सभा त्यांनी पाहिल्या. सभेत आले म्हणजे पाव-पाव आणा, अर्धा-अर्धा अणा तेथे मदत म्हणून हजारो किसानांना देत. किसान-संघटनेस मदत हाच त्यांचा दानधर्म, ही त्यांची कीर्तने, हे त्यांचे सप्ताह.

''हे काय फाटकं पत्र वाचता?'' एका खेडेगावात मुकुंदरावांनी विचारले.

''हा आमचा किसानांचा वेद. हे वर्तमानपत्र आहे. त्यातील अक्षर कळतं आहे तोपर्यंत आम्ही वाचू. उरेल तुकडा तो दुसर्‍यास देऊ. एकेक पत्र हजारोंच्या हातून जातं.'' शेतकरी म्हणाला.

''तुमच्या येथे किसानसंघ आहे का?'' मुकुंदरावांनी विचारले.

''हो. हे पहा आमच्या किसानसंघाचे चिटणीस, हे हरिजन आहेत. परंतु शिकलेले आहेत, तेच केले चिटणीस.'' एकाने सांगितले.

''तुम्ही स्पृश्यास्पृश्यता नाही मानीत?'' मुकुंदरावांनी विचारले.

''श्रीमंत गरिबाला अस्पृश्य मानतो. ती एक अस्पृश्यता आम्हाला माहीत आहे. इतर शिवाशिवीची अस्पृश्यता गाडून टाकली. सारी दुःखी व पिडलेली जनता एक.'' एका शेतकर्‍याने सांगितले.

''आमच्या महाराष्ट्रातील शेतकरी तर हरिजनांना दूर ठेवतात.'' मुकुंदराव म्हणाले.

''मग तेथील किसानांचं दुःख कसं दूर होणार? जो दुसर्‍याचा अपमान करतो, दुसर्‍याचं दुःख दूर करीत नाही, त्याचा कसा उध्दार होणार? महाराष्ट्रातील किसानांना आमचा संदेश सांगा की, 'त्या खोटया धर्माला तिलांजली द्या. श्रमणारे सारे एक व्हा, हृदयाशी हृदय जोडा.'' कळकळीने एक किसान म्हणाला.

''तुमच्या महाराष्ट्रात किसानांची सुस्थिती आहे ना?'' एकाने प्रश्न केला.

''नाही. तेथेही सावकाराचे साप किसानाला विळखे देऊन बसले आहेत. शेतकरी पिकवील ते सारे जात आहे. त्यांची दैना आहे.'' मुकुंदराव म्हणाले.

''मग ते उठत का नाहीत?''

''त्यांना कोणी उठवत नाही.''

''तुम्ही उठवा, पेटवा त्यांना.''

''होय. तेच आता काम. त्यासाठीच ही यात्रा मी करीत आहे. आज तुमच्या  गावची यात्रा झाली. स्फूर्ती मिळाली. जातो मी.'' मुकुंदराव म्हणाले.
इतक्यात तेथे पार्वती आली. तिने मुकुंदरावांना फुलांचा हार घातला.

''मागे आम्ही किसानांनी सत्याग्रह केला. या पार्वतीचा पती गोळीबारात मेला, परंतु ती रडत बसली नाही. शेकडो किसान स्त्रिया तिने उठवल्या, पतीचं रक्त तिनं कपाळी लावलं. शूर आहे ही भगिनी. तिनं 'किसान नारीमंडळ' चालवलं आहे.'' एका बंधूने ओळख करून दिली.

मुकुंदरावांनी लवून त्या भगिनीला प्रणाम केला. ''महाराष्ट्रातील किसान नारीस जागृत होण्यास सांगा. नारीची शक्ती जागृत होईल, तेव्हाच क्रांती होईल. त्या खर्‍या माता असतील तर मुलाबाळांना पोटभर खायला मिळावं, राहायला घरदार मिळावं, ज्ञान मिळावं म्हणून त्या क्रांती करायला उठतील, पतींना बरोबर घेतील. रूढी तुडवून, हालअपेष्टा सोसून, उज्ज्वल भविष्यकाळासाठी उभ्या राहतील, ही घ्या लाल कुंकवाची डबी. या कुंकवात पतीचे लाल रक्त मी मिसळलं आहे. मी ते रोज कपाळी लागते. मी विधवा नाही. माझे सौभाग्य अमर आहे. ही डबी महाराष्ट्रात न्या. तेथील किसान नारींच्या कपाळी यातील लाल कुंकू लावा. सांगा की, बिहारमधील सतीची ही भेट आहे.'' पार्वती म्हणाली.

क्रांती

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
क्रांती 1 क्रांती 2 क्रांती 3 क्रांती 4 क्रांती 5 क्रांती 6 क्रांती 7 क्रांती 8 क्रांती 9 क्रांती 10 क्रांती 11 क्रांती 12 क्रांती 13 क्रांती 14 क्रांती 15 क्रांती 16 क्रांती 17 क्रांती 18 क्रांती 19 क्रांती 20 क्रांती 21 क्रांती 22 क्रांती 23 क्रांती 24 क्रांती 25 क्रांती 26 क्रांती 27 क्रांती 28 क्रांती 29 क्रांती 30 क्रांती 31 क्रांती 32 क्रांती 33 क्रांती 34 क्रांती 35 क्रांती 36 क्रांती 37 क्रांती 38 क्रांती 39 क्रांती 40 क्रांती 41 क्रांती 42 क्रांती 43 क्रांती 44 क्रांती 45 क्रांती 46 क्रांती 47 क्रांती 48 क्रांती 49 क्रांती 50 क्रांती 51 क्रांती 52 क्रांती 53 क्रांती 54 क्रांती 55 क्रांती 56 क्रांती 57 क्रांती 58 क्रांती 59 क्रांती 60 क्रांती 61 क्रांती 62 क्रांती 63 क्रांती 64 क्रांती 65 क्रांती 66 क्रांती 67 क्रांती 68 क्रांती 69 क्रांती 70 क्रांती 71 क्रांती 72 क्रांती 73 क्रांती 74 क्रांती 75 क्रांती 76 क्रांती 77 क्रांती 78 क्रांती 79 क्रांती 80 क्रांती 81 क्रांती 82 क्रांती 83 क्रांती 84 क्रांती 85 क्रांती 86 क्रांती 87 क्रांती 88 क्रांती 89 क्रांती 90 क्रांती 91 क्रांती 92 क्रांती 93 क्रांती 94 क्रांती 95 क्रांती 96 क्रांती 97 क्रांती 98 क्रांती 99 क्रांती 100 क्रांती 101 क्रांती 102 क्रांती 103 क्रांती 104 क्रांती 105 क्रांती 106 क्रांती 107 क्रांती 108 क्रांती 109 क्रांती 110 क्रांती 111 क्रांती 112 क्रांती 113 क्रांती 114 क्रांती 115 क्रांती 116 क्रांती 117 क्रांती 118 क्रांती 119 क्रांती 120 क्रांती 121 क्रांती 122 क्रांती 123 क्रांती 124 क्रांती 125 क्रांती 126 क्रांती 127 क्रांती 128 क्रांती 129 क्रांती 130 क्रांती 131 क्रांती 132 क्रांती 133 क्रांती 134 क्रांती 135 क्रांती 136 क्रांती 137 क्रांती 138 क्रांती 139 क्रांती 140 क्रांती 141 क्रांती 142 क्रांती 143 क्रांती 144 क्रांती 145 क्रांती 146 क्रांती 147 क्रांती 148 क्रांती 149 क्रांती 150 क्रांती 151 क्रांती 152 क्रांती 153 क्रांती 154 क्रांती 155 क्रांती 156 क्रांती 157 क्रांती 158 क्रांती 159 क्रांती 160 क्रांती 161 क्रांती 162 क्रांती 163 क्रांती 164 क्रांती 165 क्रांती 166 क्रांती 167 क्रांती 168 क्रांती 169 क्रांती 170 क्रांती 171 क्रांती 172 क्रांती 173