Get it on Google Play
Download on the App Store

क्रांती 119

तुमचा दिलरुबा नीट वाजत नाही. कसा वाजणार? तारा फार पिरगळीत असाल, अती घट्ट करीत असाल किंवा ढिल्या सोडीत असाल. मी आले म्हणजे देईन व्यवस्थित करून. जीवनातील संगीत एकटयाला नाही हो साधत. उगाच ऐट नको. मी खरं सांगू का? पुरुष म्हणजे नुसत्या तारा. स्त्रिया म्हणजे भोपळे-पोकळ भोपळे. पतीच्या जीवनात स्त्रिया सर्वस्व ओततात. स्वतःला स्वतंत्र व्यक्तित्वच जणू त्या ठेवीत नाहीत. पतीच्या डोळयांनी बघतात, पतीच्या जिभेनं खातात, पतीच्या हातानं धर्मकार्य करतात. अशा निरहंकारी, निर्मम झालेल्या स्त्रिया, त्यांच्या जीवनाच्या पोकळ भोपळयाला जेव्हा पुरुषांच्या तारा पवित्र संयमानं व प्रेमानं बांधल्या जातात, तेव्हा संगीत सुरू होतं. नुसते भोपळे, ते कितीही निरंहकारी असले तरी त्यातून संगीत नाही. नुसत्या तारा, त्याही मुक्या. संगीताची शक्यता दोहोंत आहे. परंतु एकत्र येतील तरच ते प्रकट होईल व दोघांसही धन्यता वाटेल. मग एकमेकांस दोघे कधी सोडणार नाहीत. एकमेकांचा कधी अपमान करणार नाहीत. दिवसेंदिवस परस्पर प्रेम व आदर वृध्दिंगतच होत जातील. संगीताच्या मधुर बिंदूचा सिंधू होईल व जीवनात रात्रंदिवस तो उचंबळत राहील. अखंड चंद्रदर्शन व अखंड भरती ! अखंड तान, अखंड गान !

वेडी माया महाराष्ट्रात येत आहे. बंगालची भक्तिभागीरथी महाराष्ट्रातील चंद्रभागेला मिळण्यासाठी येत आहे. ओथंबलेली भावना संयमी विचाराला मिठी मारण्यासाठी येत आहे. भारतीय भावनेचं भारतीय विचाराशी हे लग्न आहे. विचारांचं भावनेशी लग्न नाही, तोवर क्रांती जन्माला येत नाही. खरं ना? मंगल मंगल लग्न, त्रिवार मंगल लग्न.

दयारामच्या आश्रमात आपण गृहस्थाश्रमाची दीक्षा घेऊ. गृहस्थाश्रम खरा आश्रम करू. पवित्र व प्रेममय करू. सेवामय व आनंदमय  करू.

माझ्या हातांवर तुम्ही लिहिलेलं अजून धुतलं गेलं नाही, अजून पुसलं गेलं नाही. शाईनं लिहिलेलं नाहीसं झालं असतं, परंतु हृदयाच्या दौतीतील प्रेमाच्या शाईत भावनेचं बोट बुडवून तुम्ही माझ्या गोर्‍या तांबूस हातावर जे लिहिलंत ते नाही हो कधी पुसलं जाणार. ते जन्मोजन्मी राहील. तुमची पत्रं येवोत वा न येवोत. ते सुंदर गोड पत्र माझ्याजवळ सदैव आहे. ते पत्र मी माझ्या हृदयाशी धरून ठेवते. 'तू माझी, माझी' असं ते पत्र सारखं माझ्या उसळणार्‍या हृदयाला सांगून शांत करतं. तो हात जणू माझा नाही, तुमचा आहे असं मला वाटतं. कागदावर ज्याचं पत्र त्याचा तो कागद.

तुमचा फोटो मी कितीदा तरी काढते बॅगेतून. माझ्या पलंगावर मांडून ठेवते. एखादा उचलते पटकन व माझ्या हृदयाशी धरते. दुसरा एखादा उचलून पटकन पदराखाली झाकते. तिसरा माझ्या मांडीवर ठेवून त्याला थोपटते. चौथा एखादा मस्तकावर घेऊन मी नाचते. पाचवा डोळयांसमोर धरून त्याला खाऊन टाकू लागते. या लहानशा बॅगेतील फोटो मला कितीसे पुरणार? मी ते सारे त्या बॅगेत ठेवून व मग त्या बॅगेला विचारते, ''बॅगे, ऐट नको मिरवूस. तुझ्यामध्ये हृदयदेवाचे १०-२०च  फोटो आहेत; परंतु माझ्या या हृदयाच्या बॅगेत, चैतन्यमय बॅगेत, अनंत रंगांचे, अनंत फोटो आहेत. क्षणाक्षणाला हृदयाचा ठोका पडतो व फोटो निघतो. समजलीस ना? एवढी गर्वानं तू फुगू नकोस. चैतन्यमय हृदयाच्या बॅगेसमोर चामडयाच्या बॅगेनं गर्व करू नये. बाहेरचे फोटो मळतात, फाटतात. परंतु आतील फोटो- ते उत्तरोत्तर उज्ज्वल होत जातात. अधिकच दृढतर होत जातात. जीवनाच्या दिवाणखान्यात, संयमाच्या सुंदर चौकटीत, पावित्र्याची काच बसवून, तुमचे प्रेममय फोटो मी लावून ठेवले आहेत. अभंग-चिर-मंगल फोटो.

क्रांती

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
क्रांती 1 क्रांती 2 क्रांती 3 क्रांती 4 क्रांती 5 क्रांती 6 क्रांती 7 क्रांती 8 क्रांती 9 क्रांती 10 क्रांती 11 क्रांती 12 क्रांती 13 क्रांती 14 क्रांती 15 क्रांती 16 क्रांती 17 क्रांती 18 क्रांती 19 क्रांती 20 क्रांती 21 क्रांती 22 क्रांती 23 क्रांती 24 क्रांती 25 क्रांती 26 क्रांती 27 क्रांती 28 क्रांती 29 क्रांती 30 क्रांती 31 क्रांती 32 क्रांती 33 क्रांती 34 क्रांती 35 क्रांती 36 क्रांती 37 क्रांती 38 क्रांती 39 क्रांती 40 क्रांती 41 क्रांती 42 क्रांती 43 क्रांती 44 क्रांती 45 क्रांती 46 क्रांती 47 क्रांती 48 क्रांती 49 क्रांती 50 क्रांती 51 क्रांती 52 क्रांती 53 क्रांती 54 क्रांती 55 क्रांती 56 क्रांती 57 क्रांती 58 क्रांती 59 क्रांती 60 क्रांती 61 क्रांती 62 क्रांती 63 क्रांती 64 क्रांती 65 क्रांती 66 क्रांती 67 क्रांती 68 क्रांती 69 क्रांती 70 क्रांती 71 क्रांती 72 क्रांती 73 क्रांती 74 क्रांती 75 क्रांती 76 क्रांती 77 क्रांती 78 क्रांती 79 क्रांती 80 क्रांती 81 क्रांती 82 क्रांती 83 क्रांती 84 क्रांती 85 क्रांती 86 क्रांती 87 क्रांती 88 क्रांती 89 क्रांती 90 क्रांती 91 क्रांती 92 क्रांती 93 क्रांती 94 क्रांती 95 क्रांती 96 क्रांती 97 क्रांती 98 क्रांती 99 क्रांती 100 क्रांती 101 क्रांती 102 क्रांती 103 क्रांती 104 क्रांती 105 क्रांती 106 क्रांती 107 क्रांती 108 क्रांती 109 क्रांती 110 क्रांती 111 क्रांती 112 क्रांती 113 क्रांती 114 क्रांती 115 क्रांती 116 क्रांती 117 क्रांती 118 क्रांती 119 क्रांती 120 क्रांती 121 क्रांती 122 क्रांती 123 क्रांती 124 क्रांती 125 क्रांती 126 क्रांती 127 क्रांती 128 क्रांती 129 क्रांती 130 क्रांती 131 क्रांती 132 क्रांती 133 क्रांती 134 क्रांती 135 क्रांती 136 क्रांती 137 क्रांती 138 क्रांती 139 क्रांती 140 क्रांती 141 क्रांती 142 क्रांती 143 क्रांती 144 क्रांती 145 क्रांती 146 क्रांती 147 क्रांती 148 क्रांती 149 क्रांती 150 क्रांती 151 क्रांती 152 क्रांती 153 क्रांती 154 क्रांती 155 क्रांती 156 क्रांती 157 क्रांती 158 क्रांती 159 क्रांती 160 क्रांती 161 क्रांती 162 क्रांती 163 क्रांती 164 क्रांती 165 क्रांती 166 क्रांती 167 क्रांती 168 क्रांती 169 क्रांती 170 क्रांती 171 क्रांती 172 क्रांती 173