Get it on Google Play
Download on the App Store

स्वातंत्र्याच्या युध्दांत 15

ताईचें लक्ष त्यांत नव्हतें. ती पंढरीला पहात होती. मनांत, स्वप्नांत. कोठें गेला तो ? मध्यरात्र होती. ताई एकटी गच्चींत होती. आकाशांतील तार्‍यांकडे बघत होती. विचारमग्न होती. मध्येंच बसे. मध्येंच फिरे. रात्र संपली. पहांटेचा गार वारा आला. बागेंतील फुलांचा मधुर सुगंध येत होता. दंवबिंदु टपटप पडत होते. तिकडे आगगाडी आली.

''पंढरी का आला'' ताई बोलली.
गच्चीच्या टोंकाजवळ येऊन कोणाची तरी मार्गप्रतीक्षा करीत. ती उभी होती. अंधारांतून कोणी येतें का बघत, तो पहा एक टांगा येत आहे. इकडे का येत आहे ? खरेंच, इकडेच येत आहे. ताई गहिंवरली. ती हळूच परंतु लगबगीनें खालीं आली. तिनें हलकेच दार उघडलें. ती अंगणाच्या फाटकांत उभी राहिली. टांगा थांबला. एक मूर्ति उतरली.

''पंढरी'' तिनें हांक मारली.
''ताई'' तो म्हणाला.
टांगा गेला. तीं दोघें आंत गेलीं.
''उठवूं नको कोणाला'' तो हळूच म्हणाला.
''वर जाऊं गच्चींत'' ती म्हणाली.
तीं दोघें गच्चींत गेलीं. बसलीं.
''रंगा बरा आहे ?''
''तो देवाकडे गेला.''
कोण बोलणार ? त्याचे डोळे भरुन आले.
''मी कशाला वांचलो !''
''माझ्यासाठीं. या अभागिनीसाठीं. पंढरी, नीज. माझ्या मांडीवर डोकें ठेवून नीज. तूं एकटा नाहींस. तुझ्या पाठोपाठ मी रणांगणावर होतें. तूं स्वप्नांत येऊन म्हणस मी येतों. रडूं नको. हे डोळे आशेनें होतें. तूं आझाद सेनेंत होतास. होय ना ?''

''हो.''
''धन्य तूं. नेताजींचा तूं मानसपुत्र. आगींतून आलास. या अभागिनीला सुखी कर. तूं मागें निरोप घेऊन गेलास. आणि माझें हृदय घेऊन गेलास. तूं आगगाडींत फोटो दिलेस. हा बघ तुझा फोटो. या हृदयाजवळ तो असतो. मी ज्याला शोधित होतें तो मला मिळाला. तूं माझा आहेस. भ्रम नाहीं, वेड नाहीं. रंगा तुझ्या माझ्या भारताच्या जीवनांत भरलेला आहे. नीज, राया नीज. शूर वीरा, प्रियकरा नीज. याच गच्चींत रंगाचें नि नयनाचें मी लग्न लावलें. मरणोन्मुख रंगा. नयना म्हणाली तुझी म्हणून जगांत जगूं दे. तुझ्या आत्म्याशीं लग्न लागो. थोर नयना ! असें प्रेम कोठें दिसणार ? त्याच या गच्चींत मी या पहांटे तुझ्याशीं लग्न लावित आहें. माझें जीवन तुझ्यांत ओतींत आहें. हा बघ सुगंधी वारा ! हें बघ दंवबिंदूंचें गुलाबपाणी ! तें बघ जरा तांबडें फुटत आहे ! जणूं सत्याची ज्वाला दिसत आहे ! प्रभातकाळचा पवित्र मुहूर्त. माझ्या जीवनांतील अंधार सरो, प्रभात येवो. माझ्या वाळवंटांत पंढरी येवो. तेथें आनंदाची चंद्रभागा उचंबळो; नीज, माझा होऊन माझ्या मांडीवर नीज. मी तुला गाणें म्हणूं ? भारताच्या मुक्तीचें गाणें ?''

चित्रकार रंगा

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
बाल्य 1 बाल्य 2 बाल्य 3 बाल्य 4 बाल्य 5 बाल्य 6 मामाकडे 1 मामाकडे 2 मामाकडे 3 मामाकडे 4 मामाकडे 5 मामाकडे 6 आधार मिळाला 1 आधार मिळाला 2 आधार मिळाला 3 आधार मिळाला 4 आधार मिळाला 5 आधार मिळाला 6 आधार मिळाला 7 ताटातूट 1 ताटातूट 2 ताटातूट 3 ताटातूट 4 ताटातूट 5 ताटातूट 6 ताटातूट 7 ताटातूट 8 *आई गेली 1 *आई गेली 2 *आई गेली 3 *आई गेली 4 *आई गेली 5 *आई गेली 6 *आई गेली 7 रंगाचें आजारीपण 1 रंगाचें आजारीपण 2 रंगाचें आजारीपण 3 रंगाचें आजारीपण 4 रंगाचें आजारीपण 5 मुंबईला 1 मुंबईला 2 मुंबईला 3 मुंबईला 4 मुंबईला 5 मुंबईला 6 नवीन अनुभव 1 नवीन अनुभव 2 नवीन अनुभव 3 नवीन अनुभव 4 नवीन अनुभव 5 नवीन अनुभव 6 नंदलालांच्याजवळ 1 नंदलालांच्याजवळ 2 नंदलालांच्याजवळ 3 नंदलालांच्याजवळ 4 नंदलालांच्याजवळ 5 निष्ठुर दैव 1 निष्ठुर दैव 2 निष्ठुर दैव 3 निष्ठुर दैव 4 निष्ठुर दैव 5 मित्राचें पत्र 1 मित्राचें पत्र 2 मित्राचें पत्र 3 मित्राचें पत्र 4 मित्राचें पत्र 5 सुनंदाची तपश्चर्या 1 सुनंदाची तपश्चर्या 2 सुनंदाची तपश्चर्या 3 सुनंदाची तपश्चर्या 4 सुनंदाची तपश्चर्या 5 मुंबईस 1 मुंबईस 2 मुंबईस 3 मुंबईस 4 मुंबईस 5 मुंबईस 6 मुंबईस 7 मुंबईस 8 मुंबईस 9 मुंबईस 10 ताईची भेट 1 ताईची भेट 2 ताईची भेट 3 ताईची भेट 4 ताईची भेट 5 ताईची भेट 6 ताईची भेट 7 ताईची भेट 8 ताईची भेट 9 वादळ 1 वादळ 2 वादळ 3 वादळ 4 वादळ 5 भारत-चित्रकला-धाम 1 भारत-चित्रकला-धाम 2 भारत-चित्रकला-धाम 3 भारत-चित्रकला-धाम 4 भारत-चित्रकला-धाम 5 भारत-चित्रकला-धाम 6 भारत-चित्रकला-धाम 7 भारत-चित्रकला-धाम 8 भारत-चित्रकला-धाम 9 भारत-चित्रकला-धाम 10 भारत-चित्रकला-धाम 11 भारत-चित्रकला-धाम 12 भारत-चित्रकला-धाम 13 भारत-चित्रकला-धाम 14 भारत-चित्रकला-धाम 15 भारत-चित्रकला-धाम 16 भारत-चित्रकला-धाम 17 रंगाचें निधन 1 रंगाचें निधन 2 रंगाचें निधन 3 रंगाचें निधन 4 रंगाचें निधन 5 रंगाचें निधन 6 रंगाचें निधन 7 स्वातंत्र्याच्या युध्दांत 1 स्वातंत्र्याच्या युध्दांत 2 स्वातंत्र्याच्या युध्दांत 3 स्वातंत्र्याच्या युध्दांत 4 स्वातंत्र्याच्या युध्दांत 5 स्वातंत्र्याच्या युध्दांत 6 स्वातंत्र्याच्या युध्दांत 7 स्वातंत्र्याच्या युध्दांत 8 स्वातंत्र्याच्या युध्दांत 9 स्वातंत्र्याच्या युध्दांत 10 स्वातंत्र्याच्या युध्दांत 11 स्वातंत्र्याच्या युध्दांत 12 स्वातंत्र्याच्या युध्दांत 13 स्वातंत्र्याच्या युध्दांत 14 स्वातंत्र्याच्या युध्दांत 15 भारताची दिगंत कीर्ति 1 भारताची दिगंत कीर्ति 2 भारताची दिगंत कीर्ति 3 भारताची दिगंत कीर्ति 4 भारताची दिगंत कीर्ति 5