Get it on Google Play
Download on the App Store

निष्ठुर दैव 2

रंगा आंतल्या खोलींत जाऊन आईजवळ बोलत बसला. त्यांनी त्याला खायला दिलें. शेवटी सर्वांचा निरोप घेऊन तो निघाला.

''रंगा, पत्र पाठवित जा. विश्वभारतींत तूं जाणार. मोठा हो. भारताची कीर्ति दिगंतांत नेणारा थोर चित्रकार हो.''

''तुमचे आशीर्वाद मला तारतील, मोठा करतील.'' रंगा गेला. बापुसाहेब पत्नीला म्हणाले ''किती निर्मळ व उदार वृत्तीचा प्रेमळ मुलगा !''

मुंबईहून सारें सामान घेऊन रंगा दुधगांवला आला. मुंबईस त्याचें लक्षच लागत नव्हतें. ताई व लिली यांची त्याला आठवणं यायची. नाही तर दोनतीन महिन्यांनी एक परीक्षा आणखी झाली असती. परंतु परीक्षेकडे त्याचें लक्ष नव्हतें. तो घरीं आला. दोन महिन्यांनी विश्वभारतींत जायचें या विचारानें तो मस्त होता.

तो वासुकाकांजवळ होता. दोन महिन्यांनी लांब जाणार होता. वासुकाका सकाळी, रात्रीं शिकवण्या करित. रंगाला पुढे पैसे लागतील. त्याची ते तरतूद करित होते. परिक्षा झाल्या. शाळांना सुट्या लागल्या. वासुकाकाहि आतां घरीच असत. ते रंगाला भारतीय इतिहासांतील अनेक प्रसंग रंगवायला सांगत. ध्येयवादी भारत म्हणून एक चित्रसंग्रह पुढें तूं कर असें ते म्हणत. प्राचीन काळापासून, ध्रुव प्रल्हादांच्या काळापासून तों आतांच्या काळापर्यंतचे शेपन्नास उदात्त प्रसंग त्यांनी त्याला सांगितले. रात्र झाली म्हणजे वासुकाका, सुनंदा, रंगा वरतीं गच्चींत बसत. आणि वासुकाका त्या थोर गोष्टी शब्दांनी रंगवून सांगत. जणूं तीं भारतीय संस्कृतीवरची प्रवचनें होती. रंगा रंगून जाई. ते अनेक प्रसंग वर्णिलेले ऐकतांना तो रोमांचित होई.

आनंदांत दिवस जात होते. परंतु प्रभूच्या मनांत निराळेंच होतें. या विश्वरचनेंतील त्याच्या योजना कोणाला कळणार ? वासुकाका आजारी पडले. भयंकर उन्हाळा होत होता. एक उष्णतेची लाट त्या टापूंत येऊन गेली. परंतु तो उष्णतेचा प्रहार नव्हता. त्यांना ताप आला नि ते निपचित पडून राहिले. मानेच्या पाठीमागचा भाग दुखे. डोकें दुखे. स्मृति नाहीं असे वाटे. तो मेंदूचा ताप ठरला. गंभीर दुखणें.

''दुधगांवच्या डॉक्टरांनी उपाय चालविले. परंतु यश येईल असें वाटेना. वासुकाकांनी खरी परिस्थिती ओळखली.

''रंगा, तुला आतां देवाचा आधार. सुनंदाला तूं आहेस. तुझी आईच ती. मोठा हो. ध्येय कधीं सोडूं नको.''

चित्रकार रंगा

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
बाल्य 1 बाल्य 2 बाल्य 3 बाल्य 4 बाल्य 5 बाल्य 6 मामाकडे 1 मामाकडे 2 मामाकडे 3 मामाकडे 4 मामाकडे 5 मामाकडे 6 आधार मिळाला 1 आधार मिळाला 2 आधार मिळाला 3 आधार मिळाला 4 आधार मिळाला 5 आधार मिळाला 6 आधार मिळाला 7 ताटातूट 1 ताटातूट 2 ताटातूट 3 ताटातूट 4 ताटातूट 5 ताटातूट 6 ताटातूट 7 ताटातूट 8 *आई गेली 1 *आई गेली 2 *आई गेली 3 *आई गेली 4 *आई गेली 5 *आई गेली 6 *आई गेली 7 रंगाचें आजारीपण 1 रंगाचें आजारीपण 2 रंगाचें आजारीपण 3 रंगाचें आजारीपण 4 रंगाचें आजारीपण 5 मुंबईला 1 मुंबईला 2 मुंबईला 3 मुंबईला 4 मुंबईला 5 मुंबईला 6 नवीन अनुभव 1 नवीन अनुभव 2 नवीन अनुभव 3 नवीन अनुभव 4 नवीन अनुभव 5 नवीन अनुभव 6 नंदलालांच्याजवळ 1 नंदलालांच्याजवळ 2 नंदलालांच्याजवळ 3 नंदलालांच्याजवळ 4 नंदलालांच्याजवळ 5 निष्ठुर दैव 1 निष्ठुर दैव 2 निष्ठुर दैव 3 निष्ठुर दैव 4 निष्ठुर दैव 5 मित्राचें पत्र 1 मित्राचें पत्र 2 मित्राचें पत्र 3 मित्राचें पत्र 4 मित्राचें पत्र 5 सुनंदाची तपश्चर्या 1 सुनंदाची तपश्चर्या 2 सुनंदाची तपश्चर्या 3 सुनंदाची तपश्चर्या 4 सुनंदाची तपश्चर्या 5 मुंबईस 1 मुंबईस 2 मुंबईस 3 मुंबईस 4 मुंबईस 5 मुंबईस 6 मुंबईस 7 मुंबईस 8 मुंबईस 9 मुंबईस 10 ताईची भेट 1 ताईची भेट 2 ताईची भेट 3 ताईची भेट 4 ताईची भेट 5 ताईची भेट 6 ताईची भेट 7 ताईची भेट 8 ताईची भेट 9 वादळ 1 वादळ 2 वादळ 3 वादळ 4 वादळ 5 भारत-चित्रकला-धाम 1 भारत-चित्रकला-धाम 2 भारत-चित्रकला-धाम 3 भारत-चित्रकला-धाम 4 भारत-चित्रकला-धाम 5 भारत-चित्रकला-धाम 6 भारत-चित्रकला-धाम 7 भारत-चित्रकला-धाम 8 भारत-चित्रकला-धाम 9 भारत-चित्रकला-धाम 10 भारत-चित्रकला-धाम 11 भारत-चित्रकला-धाम 12 भारत-चित्रकला-धाम 13 भारत-चित्रकला-धाम 14 भारत-चित्रकला-धाम 15 भारत-चित्रकला-धाम 16 भारत-चित्रकला-धाम 17 रंगाचें निधन 1 रंगाचें निधन 2 रंगाचें निधन 3 रंगाचें निधन 4 रंगाचें निधन 5 रंगाचें निधन 6 रंगाचें निधन 7 स्वातंत्र्याच्या युध्दांत 1 स्वातंत्र्याच्या युध्दांत 2 स्वातंत्र्याच्या युध्दांत 3 स्वातंत्र्याच्या युध्दांत 4 स्वातंत्र्याच्या युध्दांत 5 स्वातंत्र्याच्या युध्दांत 6 स्वातंत्र्याच्या युध्दांत 7 स्वातंत्र्याच्या युध्दांत 8 स्वातंत्र्याच्या युध्दांत 9 स्वातंत्र्याच्या युध्दांत 10 स्वातंत्र्याच्या युध्दांत 11 स्वातंत्र्याच्या युध्दांत 12 स्वातंत्र्याच्या युध्दांत 13 स्वातंत्र्याच्या युध्दांत 14 स्वातंत्र्याच्या युध्दांत 15 भारताची दिगंत कीर्ति 1 भारताची दिगंत कीर्ति 2 भारताची दिगंत कीर्ति 3 भारताची दिगंत कीर्ति 4 भारताची दिगंत कीर्ति 5